शनी जयंती - प्रबळ शनीचा जन्मदिवस


हा दिवस शनी देव ह्या ग्रहाचा जन्मदिवस असल्याचे समजण्यात येत असल्याने प्रबळ अशा शनी देवाच्या सन्मानार्थ शनी जयंती ही साजरी करण्यात येते. शनिदेवाची पूजा करण्यासाठी ती वैशाख महिन्याच्या अमावास्येस साजरी करण्यात येते. स्त्रिया ह्या दिवशी उपवास करतात व वट सावित्रीचे व्रत करतात. ह्या वर्षी शनी जयंती हि १५ मे २०१८ रोजी साजरी करण्यात येईल. 

शनी विषयी काही उपयुक्त माहिती. 
राज्यकर्ता - ब्रह्मदेव 
रंग - काळा
चव - तुरट 
शनीचा शरीराच्या अवयवांवरील अंमल - स्नायू 
क्रमांक - ८
धातू - लोखंड तसेच शिसे व कथिल
शनी हा अवकाशातील मंदगतीचा ग्रह म्हणून ओळखला जातो. ज्योतिषशास्त्रात ह्यास खूपच महत्व आहे. 

शनी हा मुख्यत्वे नकारात्मक ग्रह म्हणून ओळखला जातो - त्यामुळे अनेक जण त्याला व त्याच्या परिणामांना घाबरतात. मात्र, ही मान्यता संपूर्णपणे खरी नाही - शनी हा शिस्तीचा असून नकारात्मक परिणाम देणारा ग्रह नाहीच - तो मंदगती ग्रह असल्याने सतत परिश्रम, नित्य शिस्त, नियमित कठोर श्रम व अनेकदा अडथळे व झगडल्या नंतरच त्याचे यश मिळते. शनी एखाद्या व्यक्तीस चांगले किंवा वाईट फळ त्याच्या पूर्वीच्या व सध्याच्या कर्मानुसार देतो. शनी हा एक प्रभावी असा ग्रह आहे. विशेषतः शनी त्याचा प्रभाव साडेसाती दरम्यान व्यक्तीस दाखवतो. आपण सध्या साडेसातीच्या अंमलाखाली आहात का? आमचा साडेसाती विषयक अभिप्राय व त्यावरील उपाय जाणून घ्या. 
दुसर्या शब्दात सांगावयाचे म्हणजे, शनी हा आपल्या आयुष्यात शिक्षक किंवा न्यायाधीशाची भूमिका बजावतो. एखाद्याच्या कुंडलीत जर शनी प्रतिकूल अवस्थेत स्थित असला तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते व संघर्षमय व तणावयुक्त जीवन जगावे लागते. विशेषतः कुंडलीत विशिष्ट स्थानी अशुभ अवस्थेत तो असताना ह्याची प्रचिती येते. 

वैदिक ज्योतिषशास्त्रा नुसार कुंडलीत शनी हा द्वितीयात, सप्तमात, तृतीयात, दशमात व लाभात असता शुभ समजला जातो, ह्या उलट जर तो चतुर्थात, पंचमात व अष्टमात असता अशुभ समजला जातो. शनी हा पश्चिमेचा राजा असून, मंद, यम, छायासुनू, कृष्णग, कपिलाक्ष, नील व सौरी ह्या नावाने सुद्धा ओळखला जातो. कुंडलीत शनी हा सप्तमात असता अतिशय शक्तिशाली असा मानला जातो. ह्या व्यतिरिक्त, वैदिक ज्योतिषशास्त्र प्रत्येक व्यक्ती आयुष्यात साडेसाती व पनोतीच्या प्रभावातून जात असल्याचे सांगते, व त्या दरम्यान व्यक्तीस कठीण परिस्थिती, संघर्ष किंवा प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागते. मात्र, वैदिक ज्योतिषशास्त्राने हे शोधून सिद्ध केले आहे कि शनी व्यक्तीस नेहमीच जीवनात दुःख देतो असे नाही. ज्यांच्यावर शनीची कृपा होते त्यांना आयुष्यात आव्हानांस सामोरे जावे लागत नाही, इतकेच नव्हे तर त्यांचे यश हे योग्य मार्गाने मिळविलेले असल्याने ते त्यांच्या जवळ कायमी स्वरूपात राहाते. ह्या व्यतिरिक्त, शनी महाराज, अशा व्यक्तींना अकल्पित प्राप्ती व उत्तम संधी प्राप्त करून देतात. शनी हा जसा हानिकारक आहे तसाच तो मदत करणारा सुद्धा आहे. आपल्या जीवनातील विविध गोष्टींवर ज्यात कारकीर्द समाविष्ट आहे, त्याचा प्रभाव असतो. आपल्या कारकिर्दीवर शनीचा प्रभाव किती आहे ते जाणून घ्या. शनीच्या भ्रमणाचा कारकिर्दीवर होणार्या प्रभावाचा अहवाल मागवून घ्या. 

आयुष्य, मृत्यू, संपत्ती, घर, संतती, कायदेशीर लढाईचे परिणाम, चोरी, आतड्यांशी संबधित आजार इत्यादींवर शनीचे वर्चस्व असते. थोडक्यात, जर शनी एखाद्याच्या कुंडलीत अनुकूल स्थानी स्थित असला तर आश्चर्यकारक परिणाम मिळवून देतो, मात्र नकारात्मक ग्रहांच्या सान्निध्यात स्थित किंवा अशुभ स्थानी स्थित असला तर खूपच त्रासदायी ठरतो. 

आख्यायिका काय सांगते:

शनी हा सूर्य व छाया ह्यांचा पुत्र आहे. शनी हा एक असा ग्रह आहे कि ज्यास त्याच्या पत्नीने व माता पार्वतीने  शाप दिला आहे. आपली चूक समजताच माता पार्वतीने शनीला उ:शाप दिला कि जोवर शनी कोणास दैवी शक्तीची मदत करीत नाही तोवर व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची कार्ये मग ती त्याच्या भ्रमणा शिवाय किंवा विशिष्ठ स्थानावरील दृष्टी शिवाय होणार नाहीत. आख्यायिका अशी हि आहे कि शनी हा यमा (मृत्यू देवता) चा मोठा भाऊ आहे व त्यामुळे काहीवेळा यमाची भूमिका बजावतो व एखाद्याच्या आयुष्याचा शेवटही करतो. त्यामुळे, जर प्रतिकूल दशा असेल व त्यात शनीचे भ्रमण सुद्धा प्रतिकूल असेल तर व आयुष्याचा शेवट जवळ आला असेल तर शनी अवश्य मृत्यू देतो. त्याच प्रमाणे, ह्याच पद्धतीनुसार शनी विभक्तपणा किंवा शेवट ह्यांचे प्रतिनिधित्व करतो. शनीला आध्यात्म व त्याचे शिक्षण ह्यांची जोड सुद्धा आहे. कुंडलीत बलवान व योग्य भावात शनी स्थित असल्या शिवाय संत जन्मास येत नाहीत. 

ज्योतिषशास्त्रानुसार शनीचे महत्व: 

उत्तर कलामृतानुसार शनीचे महत्व हे खालील प्रमाणे आहे. -
(१)प्रकृती अस्वास्थ्य (२)अडथळे (३)रोग (४)शत्रुत्व (५)दुःख (६)मृत्यू (७)नोकर / चाकर (८)मालमत्ता (९)जाती भिन्नता (१०)आयुष्यमान (११)षंढपणा (१२)वारा (१३)वृद्धत्व (१४)मलीन कपडे (१५)काळा रंग (१६)रात्री जन्म झालेल्यांच्या वडिलांचे कारकत्व (१७)शूद्रत्व (१८)तामसी वृत्तीचे ब्राह्मण (१९)वेडे वाकडे केस (२०)यमाची आराधना (२१)खाली पहाणे (२२)खोटे बोलणे (२३)चोरी व निष्ठुरता (२४)प्रवाही तेल (२५)शिकारी (२६)पंगुत्व. 
वर निर्देशन केल्या प्रमाणे कुंडलीतील बलवान किंवा अनुकूल शनी असता चांगले परिणाम मिळतात, मात्र तो जर बलहीन असला तर त्यात कमतरता किंवा त्रास होऊ शकतो, जे खाली दर्शविल्या प्रमाणे असते.
 

ज्योतिषशात्रानुसार इतर विचार:

वैदिक ज्योतिषशात्राच्या प्राचीन मतानुसार मकर व कुंभ ह्या दोन राशींचे स्वामित्व हे शनी कडे जाते. तो तुळेत २० अंशावर उच्चीचा तर मेषेत २० अंशावर निचीचा होतो. त्याची मुलत्रिकोण राशी हि कुंभ आहे. शनी हा दुःखाचा कारक ग्रह आहे. 
ग्रहांच्या मंत्री मंडळात, शनी नोकराचे प्रतिनिधित्व करतो. त्याचा रंग काळा आहे. त्याचे लिंग नपुसंक आहे. पंच महाभूतात तो वायूचे प्रतिनिधित्व करतो. त्याचा वर्ण शूद्र मानला जात असून त्यात तामसी वृत्तीचे प्राबल्य असते. शनी शरीराने कृश व उंच, त्याचे डोळे मधाळ, तुफानी प्रवृत्तीचा, मोठाल्या दातांचा, सुस्तावलेला, पांगळा व ओबड घोबड केसांचा असतो असे मानले जाते. तो नेहेमी लंगडा, गंभीर व कठोर असा असतो. अशी प्रवृत्ती आपणास शनीच्या प्रभावाखालील व्यक्तीमध्ये दिसून येते. शनी एक वर्ष निर्देशित करतो. तो पश्चिमेकडे प्रबळ असतो. तो बुध व शुक्र ह्यांचा मित्र , तर रवी, चंद्र व मंगळ ह्यांचा शत्रू आहे. गुरु हा त्यास तटस्थ असून, राहू व केतू हे छाया ग्रह त्याचे मित्र असल्याचे मानले जाते. 

शनीचे परिणाम

शनी बाबत खाली महत्वाचे काही मुद्दे दिले आहेत ते आपण जाणून घ्यावेत -
शनीचे अनुकूल परिणाम मिळण्यासाठी त्याचे २३,००० जप करणे आवश्यक आहे. 
शनी हा एक प्रबळ ग्रह असल्याची नोंद घेणे आवश्यक असून त्याचा सर्व साधारण मानवी जीवनावर मोठा परिणाम दिसून येतो. शनी हा मंदगतीचा ग्रह असून त्याचे एका राशीतील भ्रमण हे अडीच वर्षांचे असते, व त्यामुळे संपूर्ण कालचक्र फिरण्यास त्याला तीस वर्षे लागतात. 
जन्म पत्रिकेत शनी ज्या स्थानी असेल त्याहून तो तिसर्या, सातव्या व दहाव्या स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो. जेव्हां तो कुंडलीतील चंद्राच्या व्ययातून भ्रमण करतो तेव्हां जातकाची मोठी पनोती म्हणजेच साडेसाती सुरु होते. जेव्हां शनी, चंद्राच्या चतुर्थातून भ्रमण करतो तेव्हां छोटी पनोती सुरु होते जी अडीच वर्षाची असते. तसेच जेव्हा शनी, चंद्राच्या अष्टमातून भ्रमण करतो तेव्हा सुद्धा छोटी पनोती सुरु होते. हि सुद्धा अडीच वर्षाची असते. 

शनी संघर्षाचा कारक ग्रह आहे. त्याच्या प्रभावाखाली व्यक्तीस अवघड अश्या आव्हानास सामोरे जावे लागते किंवा आयुष्यात बदल घडतात, जे सर्वतोपरी त्या व्यक्तीच्या अंतर्मनाच्या शक्तीवर व तो किंवा ती आव्हानास कसे सामोरे जातात त्यावर अवलंबून  असते. ह्याची उज्ज्वल बाजू म्हणजे व्यक्ती आध्यात्माकडे झुकते, त्यास परिपकवता येते व आयुष्यातील कोणत्याही आव्हानास सामोरे जाण्याची शक्ती निर्माण होते. बलवान शनी कुंडलीत असता व्यक्ती शांत, दृढनिश्चयी, स्वस्थ, नम्र, काळजीवाहू, हुशार, कौशल्यवान, व्यवस्थापक व उत्तम अंमल बजावणी करणारी अशी असते. तो जातकास आध्यात्माकडे जाण्यास प्रवृत्त करतो. शनी हा गहन व गूढ विद्येचा कारक ग्रह आहे.       

शनी हा शोक, मंदपणा, आळस, गंभीरता, रुढमार्गी, निष्ठूरपणा, दारिद्र्य, आयुष्यमान, आत्मा,   श्वासोस्च्छवास, वृद्धापकाळ, नोकर, मंत्र, तांत्रिक ज्ञान, खोली, दुष्टता, उशीर, नोकरी, जगातील आनंदा पासून स्वातंत्र्य, त्याग, संशय, युक्तिवाद, लोखंड, चामडे, लोखंडी सामान, खनिज, रसायन, कोळसा, गवत, वस्तू,  खाण, बांधकाम साहित्य, जमीन, व्यापारी बातमी, राख, काळी धान्ये, खडतर नशीब, रखरखीतपणा, धान्याची शेती, किराणा माल व त्याची साठवणूक ह्या सर्वांचा कारक ग्रह आहे. 
जरी अशुभ स्थितीत असलेल्या शनीचा व्यक्तीच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होत असला तरी त्याचा अर्थ असा नाही कि व्यक्तीला जीवनभर सतत कठीण वेळ येत असते. जर शनी हा कुंडलीत स्वराशीस किंवा उच्चीचा असेल तर तो व्यक्तीस आयुष्यात वरिष्ठ पद, संपत्ती सुख, प्रगती व शक्ती प्रदान करतो. जर शनी बलवान असेल तर पनोती मग ती छोटी किंवा मोठी असली तरी व्यक्तीच्या जीवनात एक विशेष असे स्थान मिळवून देतो. 
शनी जयंतीस आपण शनिदेवास प्रसन्न करण्यासाठी खालील उपाय करू शकता -
जर आपल्या कुंडलीत शनी अशुभ स्थानी असेल व आपणास काही त्रास होत असेल तर, आपण अभिमंत्रित केलेले शनी यंत्र खरेदी करून आपल्या घरात किंवा कार्यालयात ठेवा. रोज त्याची पूजा करून उत्तम असे परिणाम मिळवा. 
शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवास प्रसन्न करण्यासाठी शनी यंत्रासह खालील पैकी एखादी गोष्ट करा. 
१. गुळ व तिळाचे मिश्रण जमिनीवर इतरत्र पसरवा. मुंग्यांच्या वारुळापाशी सुद्धा आपण ते ठेवू शकता. 
२. जैन धर्मियांनी माळा घेऊन हा मंत्र म्हणावा - ओम र्हीम मुनिसुव्रतप्रभो नमोस्थुभ्यं मामः शांतिः शांतिः 
३. दिवसा पुराणोक्त मंत्राचा जप करा. पुराणोक्त मंत्र:-
    नीलांजन समाभासं रवीपुत्र यमाग्रजम !
   छाया मार्तंड संभूतं तम् नमामि शनैश्चरम !!
४. "ओम शं शनश्चर्य नमः " ह्या मंत्राच्या ११ माळांचा जप करा. 
५. काळे तीळ, तेल, छत्री, कांबळी, पादत्राणे, लोखंडी वस्तू, पैसे, खाद्य पदार्थ ह्या सारख्या वस्तू गरिबास दान करा. 
६. शनी स्तोत्राचे पठन करा. 
७. दक्षिणमुखी मारुतीची पूजा शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी करा. मारुतीच्या मूर्तीवर तेल व सात  काळे तीळ वहा. 
८. आपण दशरथ उवाच स्तोत्र व पिप्लाद उवाच स्तोत्राचे पठन करू शकता. 
पूजा व प्रार्थना करून आपण आपल्या समस्या व झगडण्यापासून मुक्ती मिळवू शकता. शनीच्या आशीर्वादाने आपण वाद विवादात यश मिळवू शकता. जे लोखंडाशी संबंधित, अवजड यंत्र सामुग्री, व इतर कारखानदारी व्यवसायात असतील त्यांना ह्या उपायांनी यश व प्रगती गाठता येईल. 

श्री गणेशकृपेने, 
धी गणेशास्पीक्स. कॉम टीम 

आपल्या मनात आयुष्य विषयक काही प्रश्न आहेत का? मग सतत साशंक का राहता? आत्ताच ज्योतिषांशी बोलून उपाय मिळवा.