लक्ष्मी पूजन : दिवाळीतील एक महत्वपूर्ण अंग.

GaneshaSpeaks.com

लक्ष्मी पूजन:
स्वभावतः देवी लक्ष्मी आपल्याजवळ काही काळच रहाते. ती आपल्यावर आनंद व समृद्धीचा वर्षाव करत असते. ती सोन्यासारखी तेजस्वी असून तीला चार हात असतात. "वरद मुद्रा" व "अभय मुद्रा" करीत हाती कमळ धारण केलेले असते. डोक्यावरील मुकुटामुळे तसेच सुंदर वस्त्र व अलंकार धारण केल्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडते. ती कमळावर विराजमान होते.

वैकुंठपती श्री नारायण ह्यांनी लक्ष्मीपूजनाची विधी सांगितली आहे. देव व दानव ह्यांच्यातील युद्धात इंद्राचा पराभव होऊन त्याचे राज्य व वैभव नष्ट झाले. तेव्हां सर्व देवतांनी पर्वताचा आश्रय घेतला होता. त्यावेळेस ब्रह्मदेवाने शंकर, विष्णू व इंद्र ह्यांना लक्ष्मीदेवीची आराधना करण्यास सूचविले. ह्या लक्ष्मी पूजन वा आराधनेमुळे इंद्राला गतवैभव प्राप्त झाले.

भगवती महालक्ष्मीचा मंत्र :

भक्ताची ईच्छापूर्ती होऊन त्यास समृद्धी लाभ होतो.

लक्ष्मी पूजन व सरस्वती पूजन:

जेथे गती नाही तेथे अंधार, अज्ञान व संपत्तीची कमतरता भासते. ज्ञान मिळविण्यास गती लागतेच. "गायत्री ह्रदय" ह्यात सरस्वतीदेवीचे माहात्म्य सांगितले आहे. त्यात म्हटले आहे की वेदांचा उगम हा सरस्वतीदेवी कडूनच झाला आहे. देवीने पांढराशुभ्र वस्त्र परिधान केले असून तिच्या एका हातात वीणा व दुसऱ्या  हातात पुस्तक आहे. पांढरा रंग, साधेपणा व मोक्षाचे प्रतीक आहे. निव्वळ पुस्तकी ज्ञान हे संपूर्ण नसून इतर विषयांचे ज्ञान सुद्धा आवश्यक आहे असे वीणा दर्शविते. पुस्तके व वीणानाद हे आपले ज्ञान वाढविते.   

दररोज प्रातःकाळी उठल्यावर प्रथम आपल्या उजव्या हाताचे दर्शन घेऊन खालील मंत्र मनातल्या मनात म्हणावा.

सरस्वती हि शिक्षण,बुद्धिमत्ता व संगीताची देवी आहे.  जर तुम्ही तिची किंवा तिच्या यंत्राची मनोभावे पूजा केली वा मंत्रपठण केलेत तर तुमची एकाग्रता, बुद्धिमत्ता व ग्रहणशक्ती ह्यात वाढ होताना दिसून येईल. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत तुम्ही सहज यशस्वी व्हाल.   

मनोबल वाढेल. जर तुम्ही सरस्वती देवीचे भक्तिभावाने नियमितपणे पठण केलेत तर तुमची धार्मिकता सुद्धा वाढेल. शब्दांवर नियंत्रण राहून ज्ञान वाढेल. तुम्ही मृदुभाषी व समृध्दिवान व्हाल.


ह्या दिवाळीत लक्ष्मीदेवीला आपल्याघरी आयुष्यभरासाठी निमंत्रित करा. त्यासाठी "श्री यंत्र" किंवा "मेरुपृष्ठ श्री यंत्र" ह्यांची दिवाळीतील धनत्रयोदशी, दिवाळी किंवा बलिप्रतिपदा ह्या पैकी एका मुहूर्तावर पूजा करा. तुमचे घर किंवा कार्यालयात त्याची स्थापना करा. नित्यनेमाने श्री यंत्र पूजन केल्यास लक्ष्मीदेवी स्वतः आपल्यास आनंद, सुखसमृद्धी व सुयश ह्यांची प्राप्ती करून देईल.

गणेश कृपेने,
धर्मेश जोशी.
धी गणेशास्पीक्स टीम.