गणेश चतुर्थी - गणपतीची आराधना करण्यास असलेला एक महत्वाचा हिंदू सण


गणेश चतुर्थी म्हणजे काय ?

गणेश चतुर्थी हा दहा दिवस चालणारा हिंदू उत्सव आहे, ज्यात हत्तीचा तोंडावळा असलेल्या श्रीगणपतीस त्याच्या जन्म दिवशी मानवंदना देण्यात येते. भगवान शंकर व माता पार्वती ह्यांचा हा धाकटा मुलगा आहे. 

२०१८ मध्ये गणेश चतुर्थी केव्हा आहे?

गणेश चतुर्थी हि हिंदू महिन्याच्या भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीस येते. साधारणपणे इंग्रजी महिन्याच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ती येत असते. साधारणपणे हा सण १० दिवस साजरा केला जातो, ज्यात शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीस  मोठ मोठाल्या देखाव्यांचा समावेश असतो. २०१८ मध्ये गणेश चतुर्थी हि १३ सप्टेंबरला तर, अनंत चतुर्दशी हि २३ सप्टेंबर रोजी येत आहे. 

श्रीगणेश व गणेश चतुर्थीचे महत्व 

भगवान श्रीगणेश हे भारतातील सर्वात प्रमुख असे एक दैवत असून विघ्न नाशक आणी बुद्धी प्रदान व भरभराट  करणारे दैवत आहे. कला व विज्ञान तसेच बुद्धिदायक असे श्रीगणेश हे दैवत आहे. कोणत्याही कार्याचा आरंभ करणारे हे दैवत असल्याने प्रत्येक धार्मिक विधी व समारंभापूर्वी त्यास मानवंदना दिली जाते. प्रामुख्याने त्यास गणपती किंवा विनायक असे हि संबोधले जाते. गणेश चतुर्थी हा भारतात साजरे होत असलेल्या सणांपैकी लोकमान्य, सुंदर व प्रमुख असा एक सण आहे. श्रीगणेश ह्यांची १०८ नांवे असून ज्ञान, बुद्धिमत्ता व भाग्य ह्यांची सर्वोच्च अशी देवता आहे. शुभ कार्याचा आरंभ हा श्रीगणेश ह्यापासून होतो. गणेश चतुर्थी उत्सव उत्तर, पश्चिम व दक्षिण भारतातील कुटुंबे, सार्वजनिक स्थळे आणि मंदिरे येथे उत्साहपूर्ण वातावरणात,यथा शक्ती व भक्तिभावाने साजरा केला जातो. हा श्रीगणेशाचा जन्म दिवस  आहे. या लेखातील गणेश चतुर्थी उत्सवाबद्दल अधिक जाणून घेऊ या.

गणेश चतुर्थी उत्सवाच्या मागील कथानक  

परंपरेनुसार, गणेश चतुर्थीवर विशिष्ट वेळी चंद्र पाहण्याची गरज नाही, हे महत्त्वाचे आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन घेऊ नये असे म्हणतात. ह्या दिवशी जर चंद्र दर्शन केले व विशिष्ट मंत्रांचा जप केला नाही तर चोरीचा आळ येतो किंवा समाजाकडून त्या व्यक्तीला अपमानास्पद वागणूक मिळण्याचा संभव असतो. असे भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत सुद्धा घडले होते, त्यांच्यावर किंमती दागिने चोरण्याचा आळ आला होता. नारदमुनीने श्रीकृष्णास भाद्रपद शुक्ल चतुर्थीला (गणेश चतुर्थीला) चंद्र दर्शन करण्यास सांगितले होते व त्यामुळे हा आळ आला होता. ह्याव्यतिरिक्त इतर कोणी जरी ह्या दिवशी चंद्र दर्शन केले तर त्याचे सुद्धा तसेच होऊ शकते.   

या उत्सवाचा शुभ समय (मुहूर्त)

शुभ, लाभ किंवा अमृत चोघडिया दरम्यान घरी मूर्ती आणण्याचा सल्ला देण्यात येत आहे. गणेश चतुर्थीसाठी 12 सप्टेंबर, 2018 रोजी घरी आणण्यासाठी आपण इच्छित असाल, तर शुभ वेळ खालील प्रमाणे असल्याची नोंद घ्यावी.   
लाभ वेळ: सकाळी ६.२९ ते ८.०१  
अमृत ​​वेळ: सकाळी ८.०१ ते ९.३२ 
शुभ वेळ: सकाळी ११.०४ ते दुपारी १२.३६
संध्याकाळचे मुहूर्त ह्या प्रमाणे:१७.११ ते १८.४३ 
गणेश मूर्तीची स्थापना: 13 सप्टेंबर 2018 रोजी, ह्या वेळेत केली जाऊ शकते:
लाभ वेळ: दुपारी १२.३५ ते १४.०७
शुभ  वेळ: संध्याकाळी १७.१० ते १८.४२
श्रीगणेशाचा जन्म दुपारी झालेला असल्याने दुपारी १२.४२ ते १४.१६ दरम्यान गणेश पूजन करणे जास्त चांगले होय.
 
गणेश चतुर्थीवर महत्त्वाचा मंत्र

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । 
निर्विध्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

ह्या मंत्राचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:

हे गणपतिदेवा, आम्ही आपणास वंदन करतो. ज्या देवाची सोंड वाकडी, भव्य शरीरयष्टी, सूर्यासारखे तेज, व जो सर्वांच्या दुःखाचे हरण करून त्यांना समृद्धी प्रदान करतो त्या देवतेचा आम्ही जयजयकार करतो. हे गणपती देवा, मला माझ्या सर्व समस्यांना सामोरे जाण्याचे बळ देऊन माझे चोहोबाजूने रक्षण कर व नेहमी प्रमाणे मार्गदर्शन कर. हे देवा, वाईट शक्तीं पासून माझे सदैव रक्षण आपण कराल असा माझा विश्वास आहे.   

 
गणेश चतुर्थी उत्सव कसा साजरा करावा?

घरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी श्रीगणेशाची सुबक मूर्ती स्थापित करा.

षोडशोपचार पूजा करून देवतेची प्रतिष्ठापना करा.

गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाच्या मूर्ती समोर केळी, आंबा, डाळिंब किंवा फणस इत्यादी सारखी फळे व सुवासिक फुले ठेवा.  
 
प्रथम, शुद्ध पाण्याने कलश भरा

सुपारी, १ रुपयाची किंवा २५ पैश्यांची नाणी, हळद , सुवासिक तेल, ५ विड्याची पाने, नारळ.

नारळावर व विड्याच्या पानांवर हळद वाहा. 
 
तांदळावर एक नाणे ठेवून त्यावर एक सुपारी ठेवा. 

आता ह्यावर गणपतीची मूर्ती ठेवा. 
 
"गणपती बाप्पा मोरया" असा नाद करा.

पूजेची सुरुवात मूर्तीपासून सुरू होते.

आता 5 पानांच्या पानांना पसरवा.

प्रत्येक विड्याच्या पानावर, प्रत्येक पानावर सुपारी ठेवा आणि मग हळद वाहा. 

आता गणपतीच्या मूर्तीवरील आच्छादन काढून टाका. 

त्याला मुकुट, हार, जानवे व वस्त्र अर्पण करा. 

२१ दुर्वा, २१ मोदक व २१ फुले गणपतीस अर्पण करा. २१ संख्येचे महत्व असे - ५ पंचेंद्रिये, ५ प्राण (पंचप्राण), ५ तत्व (पंचतत्त्व), ५ कर्मेंद्रिये व १ मन.

गणपतीच्या कपाळावर रक्त चंदनाचा टिळा लावा.

ताम्हन, निरांजन, कापूर व अत्तर इत्यादी घेऊन आरतीची तयारी करा.

 गणपतीला 108 वेळा नमस्कार करा किंवा गणेश उपनिषद वाचा.

"जय गणेश जय गणेश" चा नाद करा.

शेवटी, सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रीगणेशाचा आशीर्वाद घ्या.

२०१९, २०२० व २०२१ मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे?

२०१९ मध्ये गणेश चतुर्थी २ सप्टेंबरला आहे. अनंत चतुर्दशी १२ सप्टेंबरला आहे.
२०२० मध्ये गणेश चतुर्थी २२ ऑगस्ट रोजी आहे. अनंत चतुर्दशी १ सप्टेंबरला आहे.
२०२१ मध्ये गणेश चतुर्थी १० सप्टेंबरला आहे. अनंत चतुर्दशी१९ सप्टेंबरला आहे.

काही विशेष उत्पादने कि जी आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा व आनंद निर्माण करतील:

पवित्र गणेश मूर्ती. 
ह्या गणेश चतुर्थीला श्री. बेजान दारूवाला ह्यांनी अभिमंत्रित केलेली गणेशमूर्ती आपल्या घरी आणून आपले जीवन आनंदी, सुखाचे, भरभराटीचे व आरोग्यदायी बनवा.

रूद्राक्ष:
आठ मुखी रूद्राक्ष
आठमुखी रुद्राक्ष श्रीगणेशाचे व केतू ह्या ग्रहाचे प्रतीक आहे. ह्या गणेश चतुर्थीला आपण ज्या कोणाला हे आठ मुखी रुद्राक्ष गणेशा स्पीक्स. कॉम कडून घेऊन द्याल त्याला किंवा तीला ज्ञान, बुद्धी व संपत्ती श्रीगणेश नक्कीच देईल.  
 
यंत्र:
गणेश यंत्र
कोणत्याही कामाची सुरवात करण्यापूर्वी गणेशपूजा आवश्यक आहे. गणेशमूर्ती बरोबरच गणेश यंत्र सुद्धा अभिमंत्रित केले जाते व त्याच्या वापराने कामात, व्यवसायात, उपक्रमात  यशप्राप्ती व इच्छापूर्ती होते. 
गणेशा आपणास गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या भरभराटीची शुभेच्छा देत आहे. 

गणेशकृपेने, 

आपल्या वैयक्तिक समस्यांच्या निराकरणासाठी ज्योतिषांशी आताच बोला.