कार्तिक पौर्णिमेचे महत्व व लक्ष्मी प्राप्तीचे उपाय


प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्व असते, परंतु कोजागिरी पौर्णिमे प्रमाणेच कार्तिक पौर्णिमेस सुद्धा अतिशय महत्व आहे. असे म्हटले जाते कि सृष्टीच्या निर्माणा पासूनच कार्तिक पौर्णिमेचे मोठे महत्व राहिले आहे. ह्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान पुण्य करण्याचे व श्री सत्यनारायण पूजा करून त्याची कथा श्रवण करणे हे अधिक महत्वाचे आहे. 

शिव परिवाराची पूजा अवश्य करावी 

उत्तर भारतातील काही शहरांच्या तीर्थ स्थानी ह्यास त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा म्हटले जाते. असे म्हटले जाते कि ह्याच दिवशी भगवान श्री शंकराने त्रिपुरासुर नावाच्या एका महाभयानक राक्षसाचा वध केला होता. ह्या राक्षसाच्या वधा नंतरच भगवान श्री शंकर हे त्रिपुरारी नावाने प्रसिद्ध झाले. कार्तिक पौर्णिमेस कार्तिकेय पूजेचे सुद्धा महत्व आहे. ते सहा कृत्तिकांचे प्रिय पुत्र असल्याचे मानण्यात येते. शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृत्तिकांचे कार्तिक पौर्णिमेस पूजन केल्याने भगवान श्री शंकर व त्यांच्या परिवाराची विशेष अनुकंपा प्राप्त होते. ह्या व्यतिरिक्त भगवान श्री शंकर व माता पार्वती ह्यांच्यासह कार्तिकेय व श्रीगणेश ह्यांचे सुद्धा ह्या दिवशी पूजन करणे आवश्यक आहे. शिव परिवारावर मध व दुधाने अभिषेक केला असता अक्षय फल प्राप्ती होते. 

पौर्णमेस मिळेल माता लक्ष्मी देवीची कृपा 

ह्या वर्षी ह्या पवित्र सणाचे एक वैज्ञानिक महत्व सुद्धा आहे. चंद्र आपल्या सामान्य आकाराहून बराच मोठा दिसेल. ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. अशा वेळेस कार्तिक पोर्णिमेसह सर्व पौर्णिमेस चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची सुद्धा प्रथा आहे. माता लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी ह्या दिवशी भगवान श्री विष्णुसह माता लक्ष्मी देवीची पूजा करावी. श्रीसूक्त पठण व श्री सत्यनारायणाची पूजा करावी. 

कार्तिक पौर्णिमेचे सोपे उपाय 

- पौर्णिमेच्या दिवशी गरिबास पांढऱ्या वस्त्रासह दूध, मिठाई व तांदूळ ह्यांचे दान जरूर करावे. जर आपण ह्या वस्तू एखाद्या गरिबास देऊ शकला नाहीत तर त्या एखाद्या मंदिरात सुद्धा दान करू शकता. 
- कार्तिक पौर्णिमेस भगवान श्री शंकरासह माता पार्वती व कार्तिकेय ह्यांची पूजा अवश्य करावी. हा दिवस कार्तिकेयाचा जन्म दिवस असल्याचे मानण्यात येते. त्यांना सर्व बाबतीत विजयी होण्यासाठी प्रार्थना करावी. 
- माता लक्ष्मीसह चंद्रास तांदळाच्या खीरीचा नैवेद्य दाखविल्याने माता लक्ष्मी विशेष रूपाने प्रसन्न होते. 
- पौर्णिमेस सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडास गोड दूध व पाणी ह्यांचा अभिषेक करावा. 
- ह्या दिवशी देव दिवाळी पण साजरी केली जाते. ज्या प्रमाणे दिवाळीत घराची सजावट केली जाते तशीच सजावट ह्या दिवशी सुद्धा करावी. त्याने देवता प्रसन्न होतात व घरास आशीर्वाद देतात. 
- कार्तिक पौर्णिमेस घरी सत्यनारायणाची पूजा केल्याने शुभ फलांची प्राप्ती होते.  

श्री गणेशाचे आशीर्वाद आपणास लाभो 
गणेशास्पीक्स डॉट कॉम मराठी