कालाष्टमी २०१८ : काल भैरव पूजा - विधी व उपायकालाष्टमी २०१८ : काल भैरव पूजेने होतील सर्व कामे साध्य, राहू सुद्धा होई शांत 

भगवान श्री भैरवनाथ ह्यांना खुश करणे खूपच सोपे आहे. येथे आम्ही कालाष्टमीच्या दिवशी काल भैरवास प्रसन्न करून लाभप्राप्तीचे उपाय सुचवीत आहोत, ज्यांचा उपयोग करून आपण भैरवनाथास प्रसन्न करून लाभ पदरी पाडून घेऊ शकता. 

१.रविवार, बुधवार किंवा गुरुवार ह्या दिवशी एक पोळी आपल्या तर्जनी व मध्यमा ह्यात धरून तेलात बुडवून एक रेष आखा व हि पोळी कोणत्याही दोन रंग असलेल्या कुत्र्यास किंवा काळ्या रंगाच्या कुत्र्यास खायला घाला. जर कुत्र्याने पोळी खाल्ली तर असे समजा कि आपणास भैरवनाथांचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे. जर कुत्रा हि पोळी न खाता नुसता त्याचा वास घेऊन पुढे गेला तर घाबरू नका, हीच प्रक्रिया आठवड्यातील तीन दिवस चालूच ठेवा. 
२.शनिवारी रात्री तेलात उडदाची भजी तळा, व रात्रभर त्यास झाकून ठेवा. सकाळी म्हणजेच रविवारी लवकर उठून सकाळी ६ ते ७ च्या  दरम्यान गुपचूप घरातून निघून रस्त्यात दिसणाऱ्या पहिल्या कुत्र्यास हि भजी खायला घाला. भजी दिल्या नंतर मागे वळून पाहू नका. 
३.शनिवारच्या दिवशी गावातील कोणत्याही अशा एखाद्या भैरवनाथाच्या मंदिरात जा कि जेथे लोक पूजेस येत नसतील. रविवारी सकाळी सेंदूर, तेल, नारळ, फुले व जिलेबीने त्यांची पूजा करा. अपूज्य भैरवाच्या पूजेने भैरवनाथ विशेष प्रसन्न होतात. 
४.दर गुरुवारी कुत्र्यास गूळ खावयास घाला. 
५.रेल्वे स्टेशन वर जाऊन एखाद्या कुष्ट रोगी व भिकारी व्यक्तीस दारूची बाटली दान करा. 
६.बुधवारी भैरवनाथास सव्वा किलो जिलेबीचा प्रसाद दाखवून कुत्र्यास खायला घाला. 
७.रविवारी किंवा शुक्रवारी कोणत्याही  भैरवाच्या मंदिरात जाऊन गुलाब, चंदन व गुगळयुक्त सुगंधी ३३ उदबत्त्या लावा. 
८.भैरवजीस पाच लिंबे, पाच गुरुवार पर्यंत वाहावीत. 
९.सव्वाशे ग्राम काळे तीळ, सव्वाशे ग्राम उडीद, सव्वा अकरा रुपये, सव्वा मीटर काळ्या कपड्यात गुंडाळून भैरवनाथाच्या मंदिरात बुधवारच्या दिवशी अर्पण करावेत.

कालाष्टमी २०१८:मंगळ दोष निवारणासह राहू - केतू सुद्धा होती शांत 
कालाष्टमीचे व्रत सप्तमीस सुद्धा करता येते. धार्मिक ग्रंथांनुसार ज्या वेळेस अष्टमी तिथी रात्री प्रबळ असते त्या दिवशी कालाष्टमीचे व्रत केले पाहिजे. हे भगवान शंकराच्या भैरव रूपास समर्पित आहे. ह्या दिवशी भोलेनाथाच्या भैरव रूपाची पूजा केली जाते. ह्या दिवशी दुर्गा मातेच्या पूजेचा सुद्धा प्रघात आहे. अकाली मृत्यूचे भय दूर करण्यासाठी कालाष्टमीच्या दिवशी काल भैरवाची पूजा करण्यात येते. कार्तिक कृष्ण अष्टमीस कालाष्टमी पर्व साजरा करण्यात येतो, जे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या एकाच तारखेस येतो. ह्या वर्षी डिसेंबर महिन्यात कालाष्टमी २९ डिसेंबर ह्या दिवशी आहे. 

काल भैरव पूजेने होणारे लाभ 
-जर आपणास वारंवार वाहन अपघात होत असले तर भगवान भोलेनाथास पंचामृताचा अभिषेक करावा. त्याने दुर्घटनेची शक्यता दूर होते व कठीणाहून कठीण रोगाचे सुद्धा निवारण होते. 
-अग्निभय व चोरीचा त्रास होत असल्यास कालाष्टमीच्या दिवशी भगवान भोलेनाथास पंचामृताने अभिषेक करावा. 
-धन संपदेच्या प्राप्तीसाठी कालाष्टमीच्या दिवशी भगवान शंकरास  पांढरा फेटा घालून, पांढऱ्या रंगाच्या  मिठाईचा प्रसाद दाखविल्याने अतुलनीय धन संपदा प्राप्त होईल. 
-कालाष्टमीस भगवान शंकरास १०८ बिल्वपत्र, २१ धोतऱ्याची फुले व भांग अर्पित केल्याने खटल्यात विजय प्राप्त होऊन शत्रू  शांत होतात. 
-कालाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली बसून महामृत्युंजय मंत्राच्या ७ माळांचा जप केल्याने सर्वत्र रक्षण होते. 
-विशेष कामना पूर्तीसाठी कालाष्टमीच्या दिवशी दृष्टिहीन मुलांना दुधा पासून तयार केलेली मिठाई किंवा खीर खावयास घालावी. असे केल्याने २१ दिवसात आपली इच्छा पूर्ण होईल. 
-आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबीयांवर भूत - प्रेत किंवा कोणाची वाईट नजर असल्यास कालाष्टमीच्या रात्री शंकराच्या मंदिरातून एक बिल्व पत्र घेऊन यावे व कुटुंबातील सर्वांच्या मस्तकावरून घडयाळाच्या काट्यांच्या दिशेने सात वेळा फिरवून कोणत्याही पाण्यात प्रवाहित करावे. 
-जर आपणास अतुलनीय धन संपदा प्राप्त करावयाची असेल किंवा स्वतःचे घर होत नसेल तर कालाष्टमीच्या रात्री एखाद्या निर्जन स्थळी असलेल्या शंकराच्या मंदिरात जाऊन तेथील दिव्यात रात्रभर टिकून राहील इतके तेल भरून तो दिवा लावावा. 
-कालाष्टमीच्या दिवशी भैरवनाथास श्रीफळ व जिलेबीचा नैवेद्य दाखवून तो तेथील भक्तजनांना व गरिबांना वाटल्यास कार्यात सफलता प्राप्त होते. 
-भैरवनाथास दारू प्रिय आहे. त्यांना   पिवळ्या रंगाच्या दारूचा अभिषेक करून एखाद्या सफाई कामगारास ती दिल्याने जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण होते. 
-काल भैरवाच्या पूजेने आपल्यावर कोणत्याही काळ्या जादूचा परिणाम  होणार नाही. जर अशी काही समस्या असली तर त्यातून सुटका होऊ शकेल. 
-जन्म कुंडलीत जर मंगळ दोष असेल तर काल भैरवाची पूजा केल्यास ह्या दोषाचे निवारण होऊ शकते. राहू - केतूच्या शांतीसाठी सुद्धा भैरव पूजा लाभदायी ठरते. काळे तीळ व उडीद ह्यापासून बनलेली मिठाई, दही वडे, दूध व मेव्याचा नैवेद्य दाखविल्याने भैरव प्रसन्न होतात.
 
गणेशजींच्या आशिर्वादासह,
गणेशास्पीक्स डॉट कॉम