दिवाळी, वर्षातील शेवटचा व तेजस्वी दिवस.

संपूर्ण भारतभर अश्विन महिन्यातील अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. ह्यास "प्रकाशाचा सण" असेही संबोधण्यात येते. हा सण लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो.

हिंदू धर्मातील सर्व सणांमध्ये दिवाळीचे एक आगळेवेगळे असे महत्व आहे. असंख्य दिवे, पणत्या, कंदील ह्यांच्या झगमगाटामुळे अमावास्येच्या अंधाराचे रूपांतर तेजस्वी अशा प्रकाशात होते. ह्या सणाचा प्रत्येक भारतीयाचा उत्साह उल्लेखनीय असा आहे. दिवाळी आनंद, उत्साह, विजय व प्रगतीचे प्रतीक आहे.

दिवाळीशी संबंधित अनेक दंतकथा आहेत. असे समजले जाते कि ह्या दिवशी प्रभू रामाने रावणावर विजय प्राप्त करून आपले सिंहासन परत मिळविले. काही लोकांच्या मते लक्ष्मीदेवी समुद्रातून प्रकट होऊन भगवान विष्णूंशी ह्या दिवशीच विवाहबद्ध झाली. काहींच्या मतानुसार प्रभू वामनदेव ह्यांनी बळी राजावर प्रसन्न होऊन त्यास नादिरच्या सिंहासनाची भेट दिली व इंद्रदेवाने तूपाचे दिवे प्रज्वलित केले. ह्याच दिवशी राजा विरुंदित्य ह्याने आपले स्वतःचे संवत सुरु करण्याचा निर्णय घेतला. ह्याच दिवशी महर्षी दयानंद व जैन तीर्थंकर महावीर स्वामी ह्यांची पुण्यतिथी असते.

फटाके व आतषबाजी हे दिवाळीचे प्रमुख आकर्षण असते. आबालवृद्ध फटाक्यांच्या आतषबाजीने ह्या शुभदिवसाचा आनंद साजरा करतात. 

असे असले तरी अनेक संघटना फटाके व आतषबाजी पासून होत असलेल्या वायू व ध्वनी प्रदूषणा विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येतात. आपण सर्वांनी ह्यात सहभागी होऊन हा सण प्रदूषण विरहित साजरा करावा.


गणेश कृपेने,
धर्मेश जोशी. 
ध गणेशास्पीक्स टीम.