प्रबोधिनी एकादशी एवं तुळशी विवाहारंभ - २०१८


प्रबोधिनी एकादशी पासून मंगल कार्यास होते सुरवात 

कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच दिवाळी नंतर येणारी एकादशी ह्यास देवोत्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. देवशयनी एकादशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशी पासून भगवान श्री विष्णू हे चार महिन्यांसाठी झोपी जातात, ज्यास देव शयनी एकादशी म्हणतात व ज्या दिवशी ते झोपेतून जागे होतात त्यास देवोत्थान एकादशी असे संबोधले जाते. ह्यास प्रबोधिनी एकादशी सुद्धा म्हणतात. हा शुभ दिवस कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी हा असतो. असे म्हटले जाते कि भगवान श्री विष्णू जे क्षीरसागरात झोपले होते ते चार महिन्या नंतर जागे झाले होते. भगवान श्री विष्णू जेव्हा झोपलेले असतात तेव्हाच्या चार महिन्यात विवाह इत्यादी मंगल कार्यांचे आयोजन करणे वर्जित मानले जाते. भगवान श्री विष्णू जागे झाल्यावरच म्हणजेच ह्या प्रबोधिनी एकादशी पासूनच सर्व शुभ कार्यास सुरवात करता येते. ह्या वर्षी हि एकादशी १९ नोव्हेंबर २०१८ रोजी आहे. 

प्रबोधिनी एवं देवोत्थान एकादशी बद्धल पौराणिक माहिती 

असे मानले जाते कि चातुर्मासात एकाच ठिकाणी स्थित होणे आवश्यक आहे. ह्या दिवसात साधू, संन्याशी कोणत्याही एका नगरात वास्तव्यास जाऊन धर्म प्रचाराचे कार्य करतात. ह्या चार महिन्यात अनेक धार्मिक कार्ये केली जातात. प्रबोधिनी एकादशीला ह्या चातुर्मासाची समाप्ती होते व पौराणिक मान्यतेनुसार ह्या दिवशी देव जागे होतात. देवतांचा शयन काळ मानून चातुर्मासात विवाह, नवीन निर्मिती किंवा व्यवसाय इत्यादी सारखी शुभ कार्ये केली जात नाहीत. 

देवोत्थान एवं प्रबोधिनी एकादशी व्रत कथा 

एकदा भगवान नारायण ह्यांना लक्ष्मी देवींनी सांगितले कि आपण दिवस रात्र जागे राहता व जेव्हा झोपता तेव्हा लाखो - करोडो वर्ष झोपता व त्या दरम्यान सर्व चराचराचा नाश सुद्धा करत असता. तेव्हा आपण दरवर्षी नियमितपणे झोप घेतल्यास मला सुद्धा आराम करण्यास वेळ मिळू शकेल. लक्ष्मी देवींचे म्हणणे ऐकून भगवान नारायण स्मित हास्य करून म्हणाले कि मी जागा झाल्यावर सर्व देवतांना व विशेषतः तुला खूप त्रास होतो. तुला माझ्या सेवेतून बिलकुल विश्रांती मिळत नाही. तेव्हा तुझ्या कथनानुसार आज पासून मी दरवर्षी चार महिने वर्षा ऋतू असता झोप घेत जाईन. ह्या दरम्यान तुला व समस्त देवतांना विश्रांती मिळेल. माझी हि निद्रा अल्पनिद्रा व प्रलयकालीन निद्रा महानिद्रा अशा प्रकारे ओळखली जाईल. माझी अल्पनिद्रा हि भक्तांसाठी मंगलकारी, उत्सवप्रद व पुण्यवर्धक असेल. ह्या दरम्यान जे भक्त माझ्या झोपे दरम्यान माझी सेवा करतील तसेच शयन व उत्थापन ह्यास आनंदपूर्वक उत्सव साजरा करतील त्यांच्या घरी मी तुझ्यासह निवास करीन. 

तुळशी विवाह 

काही लोक ह्या दिवशी तुळशी व शाळीग्राम ह्यांच्या विवाहाचे आयोजन करतात. तुळशीचे झाड व शाळीग्राम ह्यांचा विधिवत उत्साहाने व आनंदाने विवाह करतात. देव जेव्हा जागे होतात तेव्हा सर्व प्रथम हरिवल्लभ तुळशीचीच प्रार्थना ऐकतात. म्हणूनच तुळशी विवाहास देव जागरणाचा पवित्र मुहूर्त मानले जाते. तुळशी विवाहाचा सोपा अर्थ तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन करणे असा होतो. शास्त्रात सुद्धा असे सांगितले आहे कि ज्या दांपत्यास कन्या नसेल, त्यांनी जीवनात एकदा तरी तुळशीचा विवाह लावून कन्यादानाचे पुण्य प्राप्त करून घ्यावे.  

देवोत्थान एकादशी तिथी व मुहूर्त २०१८ 
एकादशी प्रारंभ - दुपारी १.३४ (१८ नोव्हेंबर)
एकादशी समाप्ती - दुपारी २.३० (१९ नोव्हेंबर)

नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ दरम्यान एकादशी व्रत तिथी 
प्रबोधिनी एकादशी (कार्तिक शुक्ल एकादशी) - सोमवार , १९ नोव्हेंबर २०१८.
उत्पन्ना एकादशी (कार्तिक कृष्ण एकादशी) - सोमवार, ३ डिसेंबर २०१८.
मोक्षदा एकादशी (मार्गशीर्ष शुक्ल एकादशी) - मंगळवार , १८ डिसेंबर २०१८.