अन्नपूर्णा जयंती २०१८: अन्नपूर्णा देवीची कथा, पूजा विधी व महत्व


ह्या दिवशी स्वयंपाक घराची होते पूजा 

मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेस अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. ह्या वर्षी २२ डिसेंबर २०१८ रोजी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाईल. तसे पाहू गेल्यास अन्नाचा अनादर कधीच करू नये, परंतु ह्या दिवशी विशेष काळजी घेतली पाहिजे. ह्या दिवशी स्वयंपाक घर, चूल इत्यादींचे पूजन केल्याने घरात कधीही धन - धान्याची कमतरता भासत नाही व देवीची कृपा होते असा एक समज आहे. 

अन्नपूर्णा देवीच्या पूजेने अन्न व पाण्याची कमतरता भासत नाही 

अशी एक मान्यता आहे कि पृथ्वीवर अन्नधान्याचा तुटवडा झाला होता, तेव्हा माता पार्वतीने, माता अन्नपूर्णा देवीचे रूप धारण करून पृथ्वीतला  वर अन्नाची प्राप्ती करून देऊन लोकांचे रक्षण केले होते. ज्या दिवशी माता अन्नपूर्णाची उत्पत्ती झाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेचा होता. त्यामुळेच मार्गशीर्ष पौर्णिमा हि अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरी केली जाते. ह्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा तथा त्रिपुरा भैरवी जयंती सुद्धा साजरी केली जाते. ह्या दिवशी दानधर्म करणे हे विशेष महत्वाचे समजले जाते. 

अन्नपूर्णा देवीची उत्पत्ती - अन्नपूर्णा देवीची कथा 

एकदा जेव्हा पृथ्वीतलावर अन्न व पाण्याचा साठा संपत आला तेव्हा त्याने त्रस्त झालेल्या लोकांनी त्रासमुक्त  होण्यासाठी भगवान ब्रह्मा व विष्णू ह्यांची स्तुती करण्यास आरंभ केला. लोकांचा त्रास बघून ब्रह्मा व विष्णूने भगवान शंकराची आराधना करून त्यांना योगमुद्रेतून जागे केले व घटनेची माहिती दिली. नंतर भगवान शंकरानी पृथ्वी भ्रमण केले. त्या नंतर माता पार्वतीने अन्नपूर्णा रूप व भगवान शंकराने भिक्षूचे रूप धारण केले. त्या नंतर भगवान शंकरानी माता अन्नपूर्णेकडून भिक्षा घेऊन पृथ्वी वासियांत त्याचे वितरण केले. त्यामुळे ह्या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते. 

अन्नपूर्णा जयंती पूजा विधी 

माता अन्नपूर्णा देवी हि अन्नाची देवी आहे. ह्या दिवशी स्वयंपाक घर स्वच्छ ठेवले जाते. त्या नंतर गंगाजळ शिंपडून घराचे शुद्धीकरण करून चुलीची पूजा केली जाते. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी माता पार्वती व भगवान शंकर ह्यांची पूजा - अर्चा केली जाते. माता अन्नपूर्णेच्या पूजनाने घरात केव्हाही अन्न व पाण्याचा तुटवडा भासणार नाही. 

अन्नपूर्णा जयंती २०१८ दिनांक - २२ डिसेंबर २०१८ 
पौर्णिमा तिथी आरंभ - २२ डिसेंबर २०१८ रोजी ०२.०९ 
पौर्णिमा तिथी समाप्ती - २२ डिसेंबर २०१८ रोजी २३.१८

गणेशजींच्या आशिर्वादासह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम