सोनम कपूर व आनंद आहूजा ह्यांच्या विवाहानंतरचे भविष्य जाणून घ्या


अनेक दिवसां पासून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर व प्रसिद्ध व्यावसायिक आनंद आहूजा ह्यांच्या विवाहाविषयी बरीच अटकळ होत होती. अखेर दोघेही ८ मे २०१८ रोजी विवाहबद्ध झाले व आता त्यांच्या नव्या आयुष्यास सुरवात झाली. सोनम कपूर व आनंद आहूजा ह्यांची एकजूट हि एक विलक्षण अशी बाब एवढ्यासाठी आहे कि दोघेही आपापल्या क्षेत्रात म्हणजे अनुक्रमे बॉलिवूड व व्यापारी जगात नावाजलेले आहेत. सोनम ह्या एक उत्तम अभिनेत्री आहेत. तर आनंद आहूजा ह्यांनी आपल्या व्यापारी जगात एक अशक्यप्राय व नवीन अशी उंची गाठलेली आहे. त्याच्या एकत्रित येण्याने त्यांच्या आयुष्यात नवीन व मोठाले बदल निष्पन्न होतील का ? गणेशाने त्यांचे रवी कुंडली व अंक शास्त्राच्या आधारे विश्लेषण केले आहे. त्याचे काही शोध असे आहेत:   

सोनम कपूरची जन्म विषयक माहिती:
जन्म दिनांक:९ जून १९८५.
जन्म वेळ:उपलब्ध नाही. 
जन्म स्थळ:मुंबई, महाराष्ट्र, भारत. 

आनंद आहूजाची जन्म विषयक माहिती:
जन्म दिनांक:७ जुलै १९८३.
जन्म वेळ:उपलब्ध नाही. 
जन्म स्थळ:नवी दिल्ली, दिल्ली, भारत. 

सोनम कपूर हि प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अनिल कपूर व सुनीता कपूर ह्यांची कन्या आहे हे लक्षात घ्यावे. तसेच आनंद आहूजा हे शाही एक्सपोर्टसचे मॅनेजिंग डिरेक्टर हरीश आहूजा व प्रिया आहूजा ह्यांचे पुत्र होय. 

अंकशाश्त्र काय सांगते:

सोनम कपूर संबंधी:
सोनम कपूरची जन्म तारीख ९-६-१९८५. त्यामुळे, अंकशास्त्रानुसार, तिचा मूलांक ९ हा होय. ९ हा अंक मंगळाचा आहे. तिचा भाग्यांक ०+९+०+६+१+९+८+५=३८=३+८=११=१+१=२ येतो. २ हा अंक चंद्राचा आहे. आता जर आपण तिचा नामांक इंग्रजी स्पेलिंग नुसार काढला तर १+६+५+१+४=१७ व २+१+७+६+६+९=३१. अखेर १७+३१=४८=४+८=१२=१+२=३. ३ हा अंक गुरूचा आहे. 

आपणास आपल्या वैवाहिक जीवनाविषयी काही विचारावयाचे आहे का ? वैवाहिक जीवनाचा अहवाल मागवून उत्तर मिळवा. 

आनंद आहूजा संबंधी:
अंकशास्त्रानुसार, त्याचा मूलांक, ०+७=७ हा होय. ७ हा अंक केतूचा आहे. त्याचा भाग्यांक, ७+७+१+९+८+३=३५=३+५=८ हा होय. ८ हा अंक शनीचा आहे. आता जर आपण त्याचा नामांक इंग्रजी स्पेलिंग नुसार काढला तर, १+५+१+५+४=१६ व १+८+३+१+१=१४. अखेर १६+१४=३०=३+०=३. ३ हा अंक गुरूचा आहे. 

विवाहाच्या तारखे संबंधी:
त्यांच्या विवाहाची तारीख ८-५-२०१८ हि होय. त्यामुळे त्याचा मूलांक हा ०+८=८ हा येतो. ८ हा अंक शनीचा आहे. तर भाग्यांक हा ०+८+०+५+२+०+१+८=२४=२+४=६ हा येतो. ६ हा अंक शुक्राचा आहे. 

आता, सोनम कपूरचा मूलांक ९ हा असून तो मंगळ ह्या ग्रहास निर्देशित करतो. दुसरीकडे, आनंद आहूजाचा मूलांक ७ हा असून तो केतू ह्या ग्रहास निर्देशित करतो. मंगळ व केतू ह्यांच्यात बरेचसे साम्य असल्याने सोनम कपूर व आनंद आहूजा हे एकमेकांप्रती आकर्षित व ओढले जातील. ह्या व्यतिरिक्त सोनमचा भाग्यांक २ (चंद्र) व आनंदचा भाग्यांक ८(शनी) असा असल्याने त्यांच्यात मतभेद घडण्याची शक्यता दिसत आहे. 

आपणास आर्थिक प्रश्न सतावीत आहेत का ? आपला २०१८ चा आर्थिक अहवाल फुकटात मिळवून  उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन घ्या. 

त्यांच्या संबंधाचे भाकीत:
जेव्हां आपण त्यांच्या संबंधाची उज्ज्वल बाजू बघतो तेव्हां असे दिसून येते कि जर त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असला तर ते सर्वशक्तीने पुढे वाटचाल करतील. मात्र जेव्हां ग्रहांची प्रतिकूलता असेल तेव्हां जर त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक राहिला तर त्यांच्यात मतभेद उदभवतील. अशा परिस्थितीत त्यांच्या संबंधात कटुता व नकारात्मकता निर्माण होईल. मात्र, जर आपण त्यांच्या नामांकांचा अभ्यास केला तर असे दिसून येते कि दोघांचाही नामांकन ३ असून तो गुरूचा अंक आहे. त्यामुळे त्यांच्या प्रार्थमिक विचारसरणीत ऐक्य असेल. त्यांच्या विवाहाचा भाग्यांक हा ६ असून तो शुक्रास निर्देशित करतो. सोनम कपूरचा मूलांक हा ९ आहे, जो मंगळास निर्देशित करतो. मंगळ व शुक्र हे दोघे मित्र ग्रह आहेत. आनंद आहुजाचा मूलांक हा ८ आहे, जो शनीस निर्देशित करतो. शुक्र व शनी हे सुद्धा मित्र ग्रह आहेत. 

त्यामुळे, आमच्या लक्षात आले कि त्यांची विवाहाची तारीख व त्या दोघांचे भाग्यांक हे एकमेकास पूरक असेच आहेत. हे त्यांचे वैवाहिक जीवन सुखी असल्याचे दर्शविते. 

ग्रहांचे म्हणणे काय आहे:
सोनम कपूरच्या रवी कुंडली नुसार, तीचा शुक्र हा मेषेचा आहे, तर आनंद आहूजाचा शुक्र हा सिंहेचा आहे. म्हणजेच ह्या दोघांच्या शुक्रात नवपंचम योग झालेला आहे. हे दृढ संबंध, एकमेकांविषयी प्रेमभावना व आकर्षण दर्शवित आहे. त्या दोघांच्याही कुंडलीत मंगळ हा मिथुनेचा आहे. तो त्या दोघांना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवेल. राहू, ज्याचा प्रेमाशी एकप्रकारे संबंध येतो तो, सोनमच्या कुंडलीत मेषेचा असून आनंदच्या कुंडलीत मिथुनेचा आहे. हे त्यांच्यातील ऐक्य टिकवून ठेवण्यास महत्वाचे आहे. ह्या व्यतिरिक्त विवाहा नंतर ते आपापल्या क्षेत्रात प्रगती साधू शकतील. त्यांच्यात मतभेद होतील, पण जर दोघांनी समजूतदारपणा दाखविला तर सर्व काही उत्तम असेच होईल. एकंदरीत त्या दोघांचे संबंध उत्तम राहतील. 

श्रीगणेश कृपेने, 
प्रकाश पंड्या, 
धी गणेशास्पीक्स. कॉम टीम 

आपल्यासाठी वैयक्तिक उपाय मागवून घ्या ! आत्ताच ज्योतिषाशी बोला.