ज्योतिषीय विश्लेषण: यस बँकेस लागली शनीची साडेसाती ! बँकेस बुडवणार का ?


कोणे एके काळी भारतातील जलदगतीने वाढ होणाऱ्या बॅंकांपैकी एक आहे यस बँक. काही काळा नंतर, आज यस बँक हि सर्वात जलदगतीने डबघाईला येणाऱ्या बँकांच्या यादीत समाविष्ट झाली आहे. ह्या मागे अनेक कारणे आहेत. मात्र, ह्यात सर्वात मुख्य व प्रमुख कारण म्हणजे ह्या बँकेच्या संस्थापकांपैकी एक श्री. अशोक कपूर ह्यांच्या निधना नंतर दुसरे संस्थापक श्री. राणा कपूर ह्यांनी इतर बँकांचा ताबा मिळविणे हा होय. ह्या नंतर श्री. अशोक कपूर ह्यांच्या पत्नीने श्री. राणा कपूर ह्यांना मुंबई कोर्टात खेचले. इथे निर्णय श्री. राणा कपूर ह्यांच्या बाजूने लागला. मात्र, त्या नंतर यस बँकेचा कारभार हा श्री. राणा कपूर ह्यांच्या हाती नव्हता. यस बँक डबघाईला जाण्याचे दुसरे कारण म्हणजे एनपीए. एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग एसेट्स अर्थात कामात नसलेली मालमत्ता. बँकेचा एनपीए इतका वाढला आहे कि आता ती अधिक कर्ज देऊ शकत नाही. परंतु, आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कि बँक इतरांना कर्ज न देता स्वतःच कर्ज घेण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. मात्र, बँकेस कोणी कर्ज देणारे  भेटले नाही.

ह्या सर्व कारणांनी सध्या बँकेची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. ज्या यस बँकेचा शेअर एके काळी ४०० रुपयांहून अधिक रकमेत व्यवहार करत होता, तोच आज ३५ रुपयांहून कमी भावात व्यवहार करत आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ह्या सर्व घटने मागे ग्रहांचाच खेळ आहे. म्हणूनच आमच्या अनुभवी ज्योतिषीय तज्ञ मंडळींनी यस बँकेच्या रवी कुंडलीचा अभ्यास करून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला कि ग्रहांचा असा काय खेळ आहे कि ज्यामुळे यस बँकेस इतक्या कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. अन्यथा एकेकाळी ८०,००० कोटी रुपयांची अर्थ व्यवस्था व भांडवल असलेली हि बँक निव्वळ ८००० कोटी रुपयात सुद्धा व्यवहार करू शकत नाही. तर या, जाणून घेऊ यस बँकेचे ज्योतिषीय विश्लेषण. 

यस बँकेची कुंडली 
वेळ: माहित नाही. 
दिनांक: २१ जानेवारी, २००४. 
स्थळ: मुंबई, महाराष्ट्र राज्य.
 


टीप:यस बँकेच्या स्थापनेची अचूक वेळ माहित नसल्याने ज्योतिषीय विश्लेषण करण्यासाठी रवी कुंडलीचा उपयोग करण्यात आला आहे. 

काय, यस बँक खरोखरच बुडेल ?

ग्रहांच्या प्रभावामुळे यस बँकेस आपला कारभार चालवण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे असले तरी आशेचे एक किरण दिसत आहे कि भविष्यात बँक स्वतःचे पुरुज्जीवन करू शकेल व ती बुडणार नाही. मात्र ह्या सर्व संकटातून बाहेर पडण्यास बँकेस अडीच ते तीन वर्षांचा अवधी तर लागेलच. बँक स्वतःचा बचाव करण्याचा भरपूर प्रयत्न करत असून असे दिसत आहे कि यस बँकेस एक अशी संधी मिळेल कि ज्यामुळे ह्या संकटग्रस्त स्थितीत सुद्धा ती उभी राहू शकेल. 

परंतु, यस बँकेसाठी हा कठीण काळ किती दिवस ?

यस बँकेच्या रवी कुंडलीचे विश्लेषण करताना असे दिसते कि सध्या बँक शनीच्या गोचरीच्या अशुभ प्रभावास सामोरे जात आहे. यस बँकेस शनीची साडेसाती चालू आहे. त्यामुळे यस बँकेस इतक्या अडचणी व संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे बँकेचा कारभार व प्रसिद्धी ह्यात संघर्ष होत आहे. परंतु, मार्च २०२३ नंतर यस बँक ह्या परिस्थितीतून बाहेर पडू शकेल. मात्र, तोपर्यंत ह्या बँकेस आणखी काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. 

ग्रहांचा खेळ यस बँकेस कसा प्रभावित करत आहे ?

सध्या शनी हा रवी कुंडलीच्या लग्नावरून भ्रमण करत आहे. ह्याचा जन्मस्थ रविवर सुद्धा प्रतिकूल परिणाम होत आहे, व त्यामुळे यस बँकेस सरकारी प्राधिकरणांच्या आणखी काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. ह्या व्यतिरिक्त हे बँकिंग क्षेत्रात बदललेले नियम व अधिनियमांने सुद्धा प्रभावित होऊ शकते. गुरु, रवी कुंडलीच्या व्ययातून भ्रमण करत आहे. व्यय स्थान हे नुकसान करणारे स्थान आहे. त्यामुळे गुरुचे भ्रमण सुद्धा बँकेस प्रतिकूलच आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेवर आर्थिक दबाव व संकटे वाढतच जातील. आपणास सुद्धा आपली आर्थिक स्थिती मजबूत करावयाची असेल तर आमच्या ज्योतिषां कडून उपाय जाणून घ्या. 

मग काय यस बँकेतील गुंतवणूकदारांचे सर्व पैसे बुडतील का ?

ग्रहांच्या प्रतिकूल गोचरीमुळे यस बँकेच्या शेअर्सच्या किंमती हळू हळू घसरू लागल्या आहेत. निश्चितच त्याचा प्रभाव गुंतवणूकदारांवर होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. काही गुंतवणूकदारांचे पैसे बुडू सुद्धा शकतात. मात्र, शेअर्स बाजारात शेअर्सचे चातुर्यपूर्वक निर्बंध घातल्यास गुंतवणूकदार तोटा होण्यापासून वाचू शकतात. आपण सुद्धा शेअर्स बाजारातून लाभ मिळवू इच्छित असाल तर आमच्या अनुभवी ज्योतिषां कडून शेअर्स बाजाराचे भवितव्य जाणून घ्या.  

मग काय यस बँक भांडवल गोळा करण्यात यशस्वी होईल ?

सध्या तरी बँक भांडवल गोळा करण्यात अडचणींचा सामना करत आहे. बँकेच्या उच्च पदस्थ लोकांकडून अनेक प्रकारे सहकार्याची मागणी सुद्धा केली जात आहे. त्याच बरोबर बँक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून मदतीची मागणी करत आहे. परंतु, यस बँकेसाठी ग्रहांचे भ्रमण अनुकूल नसल्याने कठोर परिश्रम करून सुद्धा बँक अपेक्षित भांडवल गोळा करू शकणार नाही. ह्या बाबतीत बँकेच्या पदरी निराशाच पडलेली दिसू शकेल. 

दिलासा जनक गोष्ट 

मात्र, हा निसर्गाचा नियम आहे कि सर्वांसाठी वेळ हा सारखा नसतोच. कधी तरी ह्या बँकेचे चांगले दिवस सुद्धा पाहण्यात आले होते. त्यावेळेस बँकेचा कारभार उच्च प्रतीचा होता. सध्या बँक वाईट परिस्थितीतून जात आहे. परंतु, हि वेळ सुद्धा निघून जाईल. बाकी उरेल ते फक्त यस बँकेचे नांव. जर बँकेने चांगला कारभार केला तर बँक पुन्हा एकदा उभारी घेईल, व जर मागील प्रमाणे त्यांनी घोटाळे केले तर बँकेची स्थिती अजूनही खालावेल. 


गणेशकृपेने, 
ऍस्ट्रो लोकमत डॉट कॉम