नवरात्र २०२०, एक महिना उशिरा सुरु का होणार, जाणून घ्या

इ. स. २०२० ला नवरात्र एक महिना उशिरा सुरु होत आहे. सामान्यतः सर्वपित्री अमावास्येच्या दुसऱ्या दिवसा पासून सुरु होणारे शारदीय नवरात्रोत्सव ह्या वर्षी पितृ पक्षाच्या दुसऱ्या दिवशी सुरु न होता त्या नंतर एक महिन्याने सुरु होत आहे. आमच्या ज्योतिषाचार्यांच्या अनुसार असे काही दशका किंवा शतका नंतरच घडते. सनातन धर्मात व्रत, सण व उत्सव हे हिंदू कालगणनेनुसार होत असतात. हिंदू कालगणना हि चांद्र वर्षावर आधारित आहे. चंद्राच्या स्थितीनुसारच धार्मिक व्रत, सण व उत्सव ह्यांची तिथी व कालावधी निर्धारित करण्यात येते. 

नवरात्री २०२० चा अद्भुत संयोग 

इ. स. २०२० एक अधिवर्ष आहे. सौर कालगणनेनुसार अधिवर्षात किंवा लीप वर्षात एका दिवसाची वृद्धी होते. तसेच चांद्र वर्षीय कालगणनेनुसार दर तीन वर्षांनी एका महिन्याची वृद्धी होते. ह्या वाढीव वर्षाला आपण अधिक महिना किंवा मलमास किंवा पुरुषोत्तम मास ह्या नांवाने संबोधतो. ह्याच अधिक महिन्यामुळे ह्या वर्षी नवरात्रोत्सव पितृ पक्ष समाप्ती नंतर दुसऱ्या दिवशी सुरु न होता त्याच्या एक महिन्या नंतर सुरु होईल. 

२०२० ला एक महिना कसा वाढला ?

सनातन धर्मातील प्राचीन ऋषीमुनींनी सौर मंडळातील सर्वात जलद ग्रहाचा तिथी व वेळ निर्धारित करण्यासाठी आधार घेतला, व त्यामुळे हिंदू कालगणनेचा आधार हा चंद्र आहे. ह्या उलट पाश्चिमात्य लोक सौर कालगणनेचा आधार घेतात. सौर कालगणनेनुसार एक वर्ष हे ३६५ दिवस व ८ तासांचे असते, तर चांद्र वर्षीय कालगणनेत एक वर्ष हे ३५४ दिवसांचे असते. चंद्र व सौर वर्षात साधारण ११ दिवसांचे अंतर असते. हेच अंतर भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी एक चांद्र महिना अधिक येत असतो. हिंदू कालगणनेत दर तीन वर्षांनी एक महिना वाढतो, ह्या वाढीव महिन्यास अधिक महिना किंवा मलमास किंवा पुरुषोत्तम महिना ह्या नांवाने संबोधण्यात येते. इ.स. २०२० दरम्यान एक महिना अधिक आल्याने नवरात्रोत्सव एक महिना उशिरा सुरु होत आहे. 


२०२० ला दोन आश्विन महिने 

पंचांगानुसार इ.स. २०२० ला अधिक महिना आश्विनात येत आहे. ह्याचा सरळ अर्थ असा कि ह्या वर्षी दोन आश्विन महिने असून त्यात पहिला अधिक व दुसरा निज असेल. आश्विन महिन्यात अनेक महत्वाचे हिंदू सण व उत्सव येतात, ज्यात नवरात्र व दसरा ह्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. ह्या वर्षी अधिक महिना असल्याने आश्विन महिन्यात येणारे हे सण व उत्सव एक महिना उशिराने येत आहेत. 

अधिक महिना किंवा मलमास किंवा पुरुषोत्तम महिन्याचे महत्व 

चंद्र वर्षानुसार दर तीन महिन्यांनी येणाऱ्या वाढीव महिन्याची गणना शुद्ध महिन्यात होत नसून ती मलमास म्हणून केली जाते. मलमासाची संधी सोडल्यास मल अर्थात मलिन, मळकट किंवा टाकाऊ, व्यर्थ अशी असून मास म्हणजे महिना अशी होते. मलिन अर्थात ज्यास काही अर्थ नाही असा होत असल्याने मलमासात कोणत्याही प्रकारचे मंगल किंवा धार्मिक कार्य करणे निषिद्ध असते. मात्र, ह्या दरम्यान प्रभू भक्ती, जपजाप्य व तपस्या करणे ह्यास अधिक महत्व देण्यात आले आहे. मलमासात रोज सूर्योदयापूर्वी आपली स्नानादी कार्ये उरकून भगवान श्रीविष्णूंची पूजा केल्याने अनेक समस्यांचे निराकरण होते. 

चातुर्मासात अधिक महिना, देव घेतील पाच महिने विश्रांती 

२०२० हे वर्ष अनेक धार्मिक व ज्योतिषीय घटनेने भरलेले असून एकीकडे नवरात्र, दसरा व दीपावली सारखे सण व उत्सव एक महिना उशिरा येत आहेत, तर दुसरीकडे चातुर्मासातच अधिक महिना आल्याने चातुर्मासाच्या कालावधीत सुद्धा वाढ झाली आहे. यंदा चातुर्मासात चार महिन्यां ऐवजी पाच महिने आले आहेत. सरळ भाषेत सांगावयाचे म्हणजे ह्या वर्षी चातुर्मासाची सुरवात देवशयनी आषाढी एकादशी पासून सुरु झाली जी १ जुलै रोजी होती. चातुर्मासानुसार ऑक्टोबर महिन्यात त्यास चार महिने पूर्ण होतात, मात्र ह्या वर्षी चातुर्मास समाप्ती हि २५ नोव्हेंबर ह्या दिवशी होईल. आता आपण जर जुलै पासून मोजण्यास सुरवात केली तर नोव्हेंबर पर्यंत जवळ जवळ पाच महिने पूर्ण होतात. ह्याच कारणास्तव भगवान श्रीविष्णू हे एक महिना अधिक विश्रांती घेतील. 

पुरुषोत्तम महिन्याची कथा 

धर्मशास्त्रात अधिक महिना किंवा मलमासास पुरुषोत्तम महिना सुद्धा संबोधण्यात आले आहे. त्याच्याशी संबंधित एका प्रचलित कथेचा उल्लेख सुद्धा त्यात सापडतो. हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या देवतेस प्रिय आहे, परंतु अधिक महिन्यात कोणत्याही देवतेची किंवा ईश्वराची आपली पूजा होण्याची इच्छा नव्हती. ह्या मागे सुद्धा एक कारण आहे, ते म्हणजे अधिक महिना हा दर तीन वर्षांनी येतो. म्हणजेच त्या देवतेस आपल्या पूजेसाठी तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागणार होती. ह्यामुळे दुःखी होऊन अधिक महिना हा भगवान श्रीविष्णू ह्यांच्याकडे आपली समस्या घेऊन गेला. भगवान श्रीविष्णूने त्याचे म्हणणे ऐकून घेतले व त्या महिन्यास स्वतः धारण करून त्यास आपले नांव दिले. ह्या कारणास्तव अधिक महिन्यास पुरुषोत्तम महिना असे सुद्धा संबोधण्यात येते. ह्या महिन्यात भगवान श्रीविष्णूंची आराधना करून वैकुंठ प्राप्ती होऊ शकते. 

श्रीगणेशजींच्या कृपेसह,
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम