कोणत्या कारणांनी नवीन जागेत झोप येत नाही ? गणेशा कडून समजून घ्या


संशोधकांचे सांगणे आहे कि एका चांगल्या दिवसाची सुरवात होण्यासाठी कमीत कमी ८ तासांची झोप होणे आवश्यक असते. परंतु काय होते कि जेव्हा आपण आपले घर, शहर किंवा देश सोडून इतर ठिकाणी जाता तेव्हा अत्यंत मानसिक व शारीरिक थकवा असूनही आपणास झोप येत नाही. आपण विचार करू लागता, कूस बदलत राहता, आपली झोपेची दिशा व अंथरुणाची दिशा बदलून सुद्धा आपण शांत झोप लागण्यासाठी धडपडत असता. कदाचित अशा परिस्थितीत थकव्यामुळे क्षणभर आपला डोळा लागला तरी सुद्धा आपली झोप पूर्ण होत नाही. ह्यावेळी आपण ज्या स्थितीत असता ती असते अल्पनिद्रा, हि ती स्थिती असते कि ज्यात थकव्यामुळे आपला डोळा लागतो परंतु आपले विचार अजूनही कार्यरतच असतात. सामान्यतः झोपेची जागा बदलण्याने होणारा हा त्रास कमी अधिक प्रमाणात सर्वानाच झेलावा लागतो. तर असे काय आहे कि ज्यामुळे झोपेची जागा बदलण्याने आपणास झोप येत नाही ? आपण विचार करत असाल कि मला तर फक्त माझ्याच बिछान्यावर झोप लागते किंवा माझे विचार मला त्रास देत असतात. मात्र, ह्या मागील कारण समजल्यावर आपण आश्चर्यचकित होऊन म्हणाल कि मी असा विचार तर कधी केलाच नाही ! खरोखरच मला शांत झोप लागण्या किंवा न लागण्या मागे एवढी सगळी कारणे आहेत !  

आपली झोप व ब्रह्माण्ड 

काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता ज्यात त्यातील नायक सारखा एका वाक्याचे उच्चारण करत होता "अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहों तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने की साजिश (कोशिश) में जुट जाती है।"  आपण विचार करत असाल कि ह्याचा माझ्या झोपेशी काय संबंध ? परंतु संबंध आहे. तो असा कि ह्या वाक्यात नायक ज्या ब्रह्माण्डाचा उल्लेख करत आहे त्याचा अदृश्य रूपात सर्व मानव जाती, जीव, जंतू इतकेच नव्हे तर निर्जीव वस्तूंशी सुद्धा संबंध येतोच. ह्या ब्रह्माण्डाशी जोडण्यास आपल्याला जो मदत करतो तो असतो आपला "ऑरा"  ज्यास आपल्या भाषेत आपण "आभा मंडळ" ह्या नांवाने ओळखतो. हा सदैव आपल्या बरोबरच असतो. मग आपण स्वतःला अंधाऱ्या खोलीत बंद करून ठेवा किंवा हिमालयाच्या उच्च शिखरावर जाऊन बसा. अदृश्य लहरीने आपल्यावर ब्रह्माण्डाचा प्रभाव होत असतो. आपले आभा मंडळ ह्या लहरी ग्रहण करून आपणास ब्रह्माण्डाशी जोडून ठेवते. येथे आपणास हे समजून घेण्याची आवश्यकता आहे कि, आपली पृथ्वी कि   जिच्यावर आपले वास्तव्य आहे ती सुद्धा ह्या ब्रह्माण्डाचाच एक अंश आहे. 

ज्योतिषात आहेत आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर

आपण आत्ता पर्यंत वरील जे काही वर्णन वाचलेत ते सर्व वैदिक ज्योतिष शास्त्राचे एक संक्षिप्त स्वरूपच आहे. भारतीय ज्योतिष शास्त्र हे एक असे साधन आहे कि ज्यात पृथ्वीवर राहणारी प्रत्येक व्यक्ती आपले जीवन पृथ्वी सारख्याच विविध ग्रहांने कशा प्रकारे प्रभावित होत असते हे समजून घेऊन त्याचे निवारण व निराकरण करण्यासाठी काय करावे हे सुद्धा जाणून घेतात. 


आपल्या निद्रेशी संबंधित आहे हा सिद्धांत 

आता जेव्हा आपणास समजले आहे कि आपण जगाशी व जग आपल्याशी कसे जोडले गेले आहे तेव्हा आपणास आपल्या निद्रेशी जोडला गेलेला सिद्धांत समजणे सहज सोपे होईल. साधारणतः आपली दिनचर्या हि राहणे, खाणे - पिणे व झोपण्याच्या बाबतीत एक सारखीच असते, परंतु ह्यात जेव्हा केव्हा काहीसा बदल होतो किंवा अशी परिस्थिती निर्माण होते कि ज्यात आपणास राहण्याची, खाण्या - पिण्याची व झोपेच्या जागेत बदल करावा लागतो तेव्हा आपले आभा मंडळ आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास थोडा वेळ घेत असते. हे ह्यामुळे घडत असते कि आपण ज्या वातावरणात नेहमी वावरत असता ते वातावरण आपल्या आभा मंडळाशी जोडले गेलेले असते, परंतु जेव्हा आपण दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा तेथे अस्तित्वात असलेल्या अदृश्य लहरी व तेथील वातावरण आपणास समजण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचा प्रयत्न असतो आपल्याशी संबंध जुळविण्याचा, आपल्या सवयींशी जुळवून घेण्याचा, परंतु हे जितके बोलण्यास वाटते तितके सोपे नसते व त्यामुळेच आपणास नवीन जागी सहजपणे झोप लागत नाही किंवा खाण्यात गोडी वाटत नाही. इतकेच नव्हे तर काम करण्याच्या जागेत बदल झाला तरी सुद्धा आपले जुने काम आपण ज्या तडफदारपणे करत असतो ते सुद्धा नीटपणे करू शकत नाही. सामान्यतः नवीन जागेस आपल्याशी व आपणास नवीन जागेशी जोडले जाण्यास जास्तीत जास्त तीन दिवस लागू शकतात. ह्या तीन दिवसाच्या आत आपण कोणत्याही जागी सहजपणे मिसळून जाऊ शकता हे आपण सुद्धा कदाचित अनुभवले असेलच. 

आपल्यासाठी काम करेल संपूर्ण ब्रह्माण्ड 

आता आपणास समजलेच असेल कि ब्रह्माण्ड हे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी जोडला गेला असून आपल्यावर त्याचा प्रभाव असतो. परंतु, जर आपणास त्याला आपल्या बाजूने काम करण्यास प्रेरित करावयाचे असल्यास काय करावे ? त्या पासून येणाऱ्या लहरींना आपल्या मनपसंत वस्तू किंवा व्यक्ती ह्यांना प्रभावित करण्यासाठी उपयोगात कसे आणावे ? आपण विचार करत असाल कि एवढ्या विशाल शक्तीला आपल्या लाभासाठी कोण कसे काय प्रभावित करू शकेल ? परंतु तसे करता येऊ शकते, व तसे करण्यासाठी आपणास मोठे तप किंवा साधना करण्याची गरज नाही. फक्त आमच्या ज्योतिषांनी सांगितलेले साधे सोपे उपाय करून आपण आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी प्राप्त करू शकता ज्या मिळविण्याची आपली कधी कधी इच्छा झालेली असते.