भाद्रपद महिन्या संबंधी माहिती : काय करावे व काय करू नये


शिव शक्तीने ओत - प्रोत झालेला श्रावण महिना २०१९ समाप्त होताच १६ ऑगस्ट पासून हिंदू (पोर्णिमान्त काल गणनेनुसार - जी उत्तर भारतीय पद्धती आहे -) महिना भाद्रपदास सुरवात झाली आहे. पौराणिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यात कोणतेही मंगल कार्य करणे निषिद्ध समजण्यात येते. एकीकडे मंगल कार्य करण्यास मज्जाव करण्यात आला असताना दुसरीकडे पवित्र असलेल्या चातुर्मासातील चार महिन्यांपैकी भाद्रपद हा एक महिना मानण्यात येतो. ज्योतिष शास्त्रात ह्या संबंधी विस्तृत माहिती मिळते. ज्योतिषाचार्यांच्या विवेचनानुसार भाद्रचा अर्थ कल्याण असा होत असून भाद्रपद ह्याचा अर्थ कल्याणकारी परिणाम देणारा असा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ह्या महिन्यास पवित्र व्रत व भक्ती भाव ह्यासाठी विशेष मान्यता आहे. ह्याच महिन्यात श्री कृष्ण जन्मोत्सव व गणेश चतुर्थी ह्या सारखे विशेष दिवस येतात. ह्या वर्षी २०१९ ला  भाद्रपद महिना १६ ऑगस्ट पासून १४ सप्टेंबर पर्यंत आहे. 

भाद्रपद महिन्यात हे करू नये .....  

१. कोणतेही मंगल कार्य करू नये. 
२. गृह प्रवेश, जावळ, व्यवसायाची सुरवात, लग्न, साखरपुडा, नामकरण इत्यादी शुभ कार्ये करू नयेत. 
३. गूळ, तीळ, तीळाचे तेल, खोबरेल तेल व दही ह्या सारखे पदार्थ खाणे टाळावे. ह्या महिन्यात हे पदार्थ खाल्ल्याने आयुर्मान कमी होते तसेच प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होतो. 
४. दानातून मिळालेल्या धान्यातून बनविलेले खाद्य पदार्थ खाल्ल्याने द्रव्य कमी होण्याची शक्यता असते. 

जरी भाद्रपद महिन्यात सर्व प्रकारची मंगल कार्ये न करण्याचा सल्ला देण्यात येत असला तरीही जर अत्यंत आवश्यकता भासल्यास ज्योतिषांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा ..... 

ह्या कार्यांसाठी भाद्रपद महिना उत्तम आहे ..... 

१. ह्या महिन्यात दान - धर्म करण्यास विशेष महत्व आहे. 
२. ह्या महिन्यात दर मंगळवारी श्रीगणेशाची पूजा करण्यास विशेष महत्व आहे. श्रीगजाननास लाल रंगाचे विशेषतः जास्वंदाचे फूल अर्पण करावे. त्याच बरोबर मोदकाचा किंवा लाडवाचा प्रसाद अर्पण केल्याने आपणास आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समस्यां पासून मुक्तता मिळते. 
३. गाईला हिरवा चारा देऊन स्नानाच्या वेळेस गोमुत्राचा उपयोग केल्यास पाप क्षालन होते. 
४. गाईचे तूप, गाईचे दूध व लोणी खाल्ल्याने शरीरास बळकटी येऊन प्रकृतीस लाभ होतो व त्याच बरोबर दीर्घायु प्राप्त होते.