विनायकी चतुर्थी २०२१ : व्रत सूची, पूजा - विधी, दर महिन्यास गणेश पूजन करून मिळवा आशीर्वाद

हिंदू कालगणनेनुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात. ह्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीस विनायकी चतुर्थी ह्या नावाने संबोधण्यात येते. तसेच कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी ह्या नावाने संबोधण्यात येते. २०२१ दरम्यान येणाऱ्या विनायकी चतुर्थीची सूची खालील प्रमाणे आहे. 

२०२१ ला केव्हा केव्हा आहे विनायकी चतुर्थी

विनायकी चतुर्थीचे महत्व 

विनायकी चतुर्थीचे व्रत भगवान श्रीगणेश ह्यांना समर्पित होते. हे व्रत करून भक्त भगवान श्रीगणेश ह्यांच्याकडे आपल्या इच्छांची याचना करतात. हिंदू पंचांगानुसार हे व्रत प्रत्येक महिन्याच्या अमावास्येच्या चौथ्या दिवशी (शुक्ल पक्षाची चतुर्थी) करण्यात येते. श्रीगणेश ह्यांना हिंदू धर्मात सर्व प्रथम पूजनीय मानण्यात येते. श्रीगणेश हे सर्व संकटांचे हरण करणारे आहेत. विनायकी चतुर्थीस वरद विनायक चतुर्थी ह्या नावाने सुद्धा संबोधण्यात येते. ह्या दिवशी भक्त श्रीगणेशांचे पूजन करून धैर्य व बुद्धीचा आशीर्वाद मागतात. 

विनायकी चतुर्थीचे पूजन कसे करावे 

- सकाळी शुद्ध पाण्याने स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. 
- हिंदू पंचांगानुसार विनायकी चतुर्थीचे पूजन दुपारी करावे. 
- भगवान श्रीगणेश ह्यांचे पूजन तीळ, गूळ, लाडू, दुर्वा, चंदन ह्याने करावे. त्या नंतर 
  गणेश कथेचे पठन करावे. 
- भगवान श्रीगणेश ह्यांच्या मंत्रांचे जप करावे. 
- संध्याकाळी श्रीगणेश ह्यांचे पूजन करून चंद्रास अर्घ्य देऊन पूजा संपन्न करावी. 

विनायकी चतुर्थीचे व्रत असता काय खावे ?

विनायकी चतुर्थीचे व्रत अत्यंत कडक असते. हे व्रत करताना कोणत्याही धान्याचे सेवन करू नये. ह्या दिवशी भक्त फक्त फळे, कंदमुळे खाऊ शकतो. संध्याकाळी चंद्र दर्शन घेऊन अर्घ्य दिल्या नंतर भक्त उपवास सोडू शकतो. हे व्रत संपन्न झाल्यावर साबुदाण्याची खिचडी, बटाटा व शेंगदाणे खाऊ शकता. 
विनायकी चतुर्थीसाठी श्रीगणेश मंत्र 
श्रीगणेशजींची पूजा आपण ह्या मंत्राने करू शकता. 
– ॐ गं गणपतये नम:
– वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।
– ॐ एकदन्ताय विद्धमहे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्॥

गणेशजींच्या विशेष आशीर्वादांसह 
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम