शुक्र करणार स्वराशी वृषभेतून गोचरीने भ्रमण, आपल्या राशीवर त्याचा काय परिणाम होईल ? जाणून घ्या


शुक्रास पहाटेचा तारा असे सुद्धा संबोधण्यात येते. वैदिक ज्योतिष शास्त्रात शुक्रास काल पुरुषाच्या सौंदर्याचे प्रतीक समजण्यात येते. शुक्र हा एक छोटा ग्रह आहे, तसेच सौर मंडळात सूर्याच्या चढत्या क्रमात दुसऱ्या क्रमांकावर असणारा ग्रह आहे. पृथ्वीचा शेजारील ग्रह असल्यामुळे सूर्यास्ता नंतर काहीवेळा व पहाटे सूर्योदया पूर्वीपर्यंत दिसू शकतो. काल पुरुषाच्या कुंडलीत शुक्रास वृषभ व तूळ राशीचा स्वामी मानण्यात आले आहे. ह्या क्रमाने शुक्र हा सप्तमाचा कारक ग्रह होऊन पुरुषांशी संबंधित बाबींचा कार्यवाहक ठरतो. सामान्यतः शुक्रास एका राशीत भ्रमण करण्यास जवळपास २३ दिवस इतका वेळ लागतो, परंतु परिस्थितीनुसार हा कालावधी कमी जास्त सुद्धा होतो.  सध्या शुक्र २८ मार्च ते १ ऑगस्ट इतक्या दीर्घ कालावधीसाठी वृषभ राशीतच वास्तव्यास आहे. ह्या दरम्यान शुक्र १३ मे २०२० ते २५ जून २०२० पर्यंत वक्री अवस्थेत वृषभेत राहील. राशीचक्र भ्रमणा दरम्यान शुक्र जवळपास १२५ दिवस स्वराशी वृषभेत असणार आहे. ज्यात ४४ दिवस तो वक्री असेल. शुक्राचे मेषेतून वृषभेत होणारे संक्रमण संपूर्ण राशिचक्रास प्रभावित करणारे आहे. शुक्राचे वृषभेतील गोचर भ्रमण २०२० दरम्यान राशी चक्रातील सर्वच राशींना प्रभावित करणारे आहे. आता आपण शुक्राचे वृषभेतील गोचर भ्रमण विविध राशींवर काय परिणाम करेल हे सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. 

मेष रास 
शुक्राचे वृषभ राशीतील हे भ्रमण मेष राशीच्या द्वितीय स्थानातून होत आहे. शुक्र हा आपल्या द्वितीय व सप्तमाचा स्वामी आहे. आपल्यासाठी हे भ्रमण द्वितीयेतून होत आहे. कुंडलीतील द्वितीय स्थान हे धनस्थान किंवा कुटुंबस्थान ह्या नावाने ओळखले जाते. ह्या स्थानाचा संबंध धन, चल - अचल संपत्ती, कुटुंब, वाणी, वंश, धन संचय, रत्न, लाभ - नुकसान, महत्वाकांक्षा व वारसागत संपत्ती इत्यादींशी येतो. कुंडलीच्या द्वितीय  स्थानातून होत असणारे शुक्राचे गोचर भ्रमण द्वितीय स्थानास कार्यान्वित करण्यास बल प्राप्त करतो. महत्वाचे म्हणजे शुक्र स्वराशीचा असून ह्या स्थानी स्थित आहे. स्वराशीचे शुक्र भ्रमण मेष राशीच्या जातकांसाठी काही सकारात्मक संकेत देत आहे. ह्या दरम्यान मेष राशीच्या जातकांना विदेश, विदेश भूमी किंवा विदेशी संबंधातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. ह्या व्यक्तींना विदेशी संबंधातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा ह्या दरम्यान दिसत आहे. शुक्राच्या वृषभेतील गोचर भ्रमणाचा परिणाम वैवाहिक जीवनावर सकारात्मक होईल. ह्या दरम्यान विवाहित जोडपी सुख व आनंदाचा अनुभव घेतील. शुक्राचे हे गोचर भ्रमण मेष राशीच्या जातकांना परदेशातून उच्च शिक्षण घेण्याच्या शक्यतेस दृढ करण्याचे कार्य करेल. मात्र, ह्या दरम्यान मेष राशीच्या जातकांना नाते संबंधां प्रति अधिक जागरूक व सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 

वृषभ रास 
शुक्राचे वृषभेतील गोचर भ्रमण हे आपल्या राशीवरूनच होत आहे. शुक्र हा आपल्या लग्न व षष्ठ स्थानाचा अधिपती आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात प्रथम स्थानास खूपच महत्व असून त्यास लग्न भाव असेही संबोधले जाते. ह्या स्थानाचा संबंध व्यक्तिमत्व, चारित्र्य, महत्वाकांक्षा, स्वकष्ट, स्वरूप, मनोवृत्ती, मस्तक, संतोष, बल, कीर्ती व मनोबल ह्यांच्याशी येतो. सध्या शुक्राचे गोचरीने भ्रमण वृषभेतून म्हणजेच आपल्या स्वराशीतुन होत आहे. हे भ्रमण वृषभ राशीच्या जातकांसाठी लाभदायी व शुभ फलदायी ठरण्याची अपेक्षा आहे. ह्या दरम्यान वृषभ व्यक्तींची आर्थिक स्थिती बलवान होण्याची शक्यता आहे. मात्र, लग्नी असलेला शुक्र जातकास मनोरंजन, चित्रपट, सुगंधित पदार्थ, उंची वस्त्रे व चैनीच्या वस्तूंसाठी खर्च करण्यास प्रेरित करण्याची शक्यता आहे. शुक्राचे वृषभेतील गोचर भ्रमण कारकिर्दीच्या बाबतीत सुद्धा सकारात्मक परिणाम देऊ शकेल. ह्या दरम्यान नोकरीत बदल करण्याची इच्छा असणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. वृषभ जातकांच्या प्रणयी जीवनात सुद्धा काही सकारात्मक परिवर्तन होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान जोडीदारासह आनंदात वेळ घालवण्याचा प्रयन्त करावा. शुक्राचे हे गोचर भ्रमण आरोग्याच्या बाबतीत सावध राहण्याचा सल्ला सुद्धा देत आहे. ह्या दरम्यान स्वच्छता, जेवणाच्या व झोपण्याच्या वेळेकडे विशेष लक्ष द्यावे. 

मिथुन रास 
शुक्राचे वृषभेतील गोचर भ्रमण हे मिथुन राशीच्या व्ययातून होत आहे. शुक्र हा आपल्या पंचमाचा व व्ययस्थानाचा अधिपती आहे. कुंडलीच्या व्ययस्थानाचा संबंध जीवनात होणारे खर्च, व्यय, भोगविलास, राजकीय भीती, कैद, विदेश यात्रा, शय्यासुख व नुकसान ह्यांच्याशी येतो. व्ययातून होणारे शुक्राचे हे भ्रमण मिथुन राशीच्या जातकांना मिश्र फलदायी ठरणारे आहे. व्ययातून होणारे शुक्राचे हे भ्रमण विदेशी स्रोतातून लाभ मिळण्याची शक्यता दर्शवित आहे. वृषभेतून होणारे शुक्राचे भ्रमण मिथुन व्यक्तींना परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचे मार्ग प्रशस्त करू शकेल. तसेच परदेशात जाऊन काही लाभ मिळण्याची किंवा परदेशी संबंधातून लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा शुक्राच्या ह्या भ्रमणामुळे बळावते. शुक्र हा वैवाहिक जीवनाचा नैसर्गिक कारक ग्रह असल्याने ह्या दरम्यान वैवाहिक जीवनात माधुर्य व आनंद टिकून राहण्याची अपेक्षा बाळगता येते. मात्र, ह्या दरम्यान वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल, अन्यथा जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दुःख व आर्थिक नुकसान सुद्धा झेलावे लागेल. वृषभेच्या शुक्राचा प्रतिकूल परिणाम आपल्या प्रणयी जीवनावर होत असल्याचे सुद्धा दिसून येईल. ह्या दरम्यान संबंधात गैरसमज वाढण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे. 


कर्क रास 
शुक्राचे वृषभेतून होणारे भ्रमण हे आपल्या लाभस्थानातून होत आहे. शुक्र हा आपल्या चतुर्थ व लाभस्थानाचा अधिपती आहे. कुंडलीतील लाभस्थान हे नियमितपणे होणारे लाभ, इच्छाशक्ती, मंगलकार्ये, यश, कीर्ती, सार्वजनिक जीवन, आर्थिक लाभ, महत्वाकांक्षा व विकास ह्या सारख्या महत्वाच्या क्षेत्रांशी संबंधित स्थान आहे. शुक्राचे हे गोचर भ्रमण कर्क राशीच्या जातकांसाठी सकारात्मक व फलदायी ठरणारे आहे. शुक्राचे हे गोचर भ्रमण आर्थिक स्वातंत्र्यासाठी एखाद्या वडीलधारी किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेण्याकडे अंगुली निर्देश करत आहे. ह्या दरम्यान कर्क राशीच्या व्यक्तींना आपले नातेवाईक किंवा मित्रांच्या माध्यमातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे. शुक्राच्या भ्रमणा दरम्यान आपल्यातील गुणवत्ता बाहेर पडून इतरां समोर प्रगट झाल्याने त्या द्वारा आपण उत्तम लाभ मिळवू शकाल. महिला हिताशी संबंधित क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना अधिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. मित्र व कुटुंबियांसह फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. मोठ्या भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल, तसेच मातेकडून काही लाभ प्राप्त होईल. 

सिंह रास 
शुक्राचे वृषभेतील गोचर भ्रमण हे आपल्या दशमातून होत आहे. शुक्र हा आपल्या तृतीय व दशमाचा अधिपती आहे. कुंडलीचे दशमस्थान हे कर्मस्थान असून जातकाचे कर्म, व्यापार, कारकीर्द, पद, वैभव, समृद्धी, सर्वोच्च सत्तापद, सार्वजनिक जीवन व मान - सन्मान ह्यांच्याशी संबंधित आहे. दशमातून होणारे शुक्राचे गोचर भ्रमण सिंह राशीच्या जातकांच्या जीवनातील काही क्षेत्रात लाभ मिळवून देण्यास समर्थ आहे. शुक्राचे वृषभेतील भ्रमण हे सिंह राशीच्या व्यक्तींना अधिकारी वर्ग किंवा शासनाशी संबंधित क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता दर्शवित आहे. शुक्राचे वृषभेतील भ्रमण आपणास आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यास सुद्धा समर्थ आहे. ह्या दरम्यान आपली पत्नी, नवीन वाहन किंवा जमीन - जुमल्याची खरेदी करण्यात आपणास मदत करू शकेल. ह्या दरम्यान आपल्या उत्कृष्ट संपर्क कौशल्याने आपण आपल्या व्यावसायिक क्षेत्रातून सुद्धा लाभ मिळवू शकाल. आपल्या पिताश्रींच्या संबंधांमुळे किंवा प्रभावामुळे आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. 

कन्या रास 
शुक्राचे वृषभेतील भ्रमण हे आपल्या नवमातून होत आहे. शुक्र हा आपल्या द्वितीयेचा व नवमाचा अधिपती आहे. कुंडलीतील नवमस्थान हे भाग्यस्थान ह्या नांवाने सुद्धा ओळखले जाते. ह्या स्थानावरून धर्म, गुरु, आध्यात्मिकता, परदेशगमन, वैभव, संन्यास तर दक्षिण भारतात हे स्थान पिता दर्शक असल्याचे मानण्यात येते. मात्र, उत्तर भारतात दशमस्थान हे पिता दर्शक समजण्यात येते. शुक्राचे वृषभेतून होणारे भ्रमण हे कन्या राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम मिळवून देताना दिसून येईल. ह्या व्यतिरिक्त कन्या राशीच्या जातकांना दूरवरचे प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे. प्रवासा दरम्यान मोठे खर्च होण्याची शक्यता सुद्धा आहे. मात्र, शुक्राचे वृषभेतील भ्रमण हे कन्या व्यक्तींना आर्थिक सुबत्ता देण्याची शक्यता सुद्धा आहे. ह्या दरम्यान ह्या राशीच्या ज्या व्यक्ती दीर्घ काळापासून परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीतील शुक्राचे हे भ्रमण कन्या राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यवर्धक ठरणारे आहे. ह्या दरम्यान नशिबाची साथ आपणास आर्थिक लाभ मिळवून देण्याचे कार्य सुद्धा करेल. वृषभ राशीतील शुक्राचे हे भ्रमण कन्या राशीच्या व्यक्तींच्या संबंधात माधुर्य निर्माण करण्याचे कार्य सुद्धा करेल. ह्या दरम्यान कुटुंबीय व प्रियजनांशी असलेल्या आपल्या संबंधात सुख - समाधान व आनंद टिकून राहील. ह्या व्यतिरिक्त व्यवसाय व कारकिर्दीत यश प्राप्त होण्याची सुद्धा शक्यता आहे. 


तूळ रास
शुक्राचे वृषभेतील भ्रमण हे आपल्या अष्टमातून होत आहे. शुक्र हा आपल्या लग्नाचा व अष्टमाचा अधिपती आहे. कुंडलीचे अष्टम स्थान हे आयुर्दाय स्थान ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. ह्याचा संबंध जातकाचा मृत्यू, वारसा, दुर्घटना, भयंकर नुकसान, वैराग्य, आत्महत्या, अनपेक्षित मृत्यू, गुप्त धन, अचानक धनलाभ, गूढ विद्या, दीर्घकालीन आजार व स्त्रियांच्या बाबतीत पतीच्या आयुष्यमानाशी येतो. शुक्राचे वृषभेतील गोचर भ्रमण तूळ राशीच्या जातकांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करताना दिसत नाही. ह्या दरम्यान आपणास धनार्जनासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, मात्र यशस्वी होण्याची शक्यता विशेष अशी काही दिसत नाही. ह्या दरम्यान आपणास धनार्जनासाठी आपले कौशल्य वाढविण्याचे प्रयत्न करावे लागतील. ह्या दरम्यान सासुरवाडीकडून कोणत्याही प्रकारे लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. शुक्राचे वृषभेतील गोचर भ्रमण तूळ राशीच्या व्यक्तींना विलासी वस्तूंवर खर्च करण्यास प्रेरित करेल. मात्र, ह्या दरम्यान आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. शुक्राचे वृषभेतून भ्रमण होत असता तूळ राशीच्या व्यक्तीना आपल्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा जागरूक राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्याचे कारण म्हणजे ह्या दरम्यान आरोग्याच्या बाबतीत अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत नाही. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी, अन्यथा अनावश्यक खर्चाची शक्यता नाकारता येत नाही. शुक्राचे वृषभेतील भ्रमण प्रणयी जीवनात सुद्धा अधिक प्रभावी होऊ शकणार नाही. ह्या दरम्यान आपल्या जोडीदाराचे विचार व वक्तव्याचा सन्मान करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 

वृश्चिक रास 
शुक्राचे वृषभेतील भ्रमण हे आपल्या सप्तमातून होत आहे. शुक्र हा आपल्या सप्तमाचा व व्ययस्थानाचा अधिपती आहे. कुंडलीचे सप्तमस्थान हे एक महत्वाचे व प्रभावी स्थान असून कलत्रस्थान ह्या नांवाने सुद्धा ह्यास संबोधण्यात येते. सप्तमाचा संबंध पती, पत्नी, भागीदार, दांपत्य सौख्य, सार्वजनिक व सामाजिक जीवन, प्रजनन अवयव, घटस्फोट व जल प्रवास ह्यांच्याशी येतो. शुक्राचे वृषभेतील गोचर भ्रमण वृश्चिक व्यक्तींना मिश्र फलदायी ठरणारे आहे. ह्या दरम्यान व्यवसाय किंवा कामाच्या निमित्ताने परदेश प्रवास होण्याची दाट शक्यता दिसत आहे. व्यापार - व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा अधिक अनुकूलता दिसत नाही. ह्या दरम्यान भागीदारीत गैरसमजामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शुक्राच्या वृषभेतील भ्रमणाचा वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनावर सुद्धा प्रभाव होईल. मात्र, वैवाहिक जीवनावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसत नाही. ह्या उलट वैवाहिक जोडीदारा कडून लाभ होण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. शुक्राच्या वृषभ राशीतील भ्रमणाचा आपल्या प्रणयी जीवनावर अनुकूल परिणाम होत असल्याचे दिसून येईल. शुक्राचे हे भ्रमण वृश्चिक व्यक्तींना नवीन संबंध जुळविण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकेल. 

धनु रास 
शुक्राचे वृषभेतील भ्रमण हे आपल्या षष्ठ स्थानातून होत आहे. शुक्र हा आपला षष्ठेश व लाभेश आहे. कुंडलीतील षष्ठस्थान हे शत्रू, जीवनात येणारी संकटे, रोगाचा कालावधी, शत्रू, दैनिक कार्य, रोग, कर्ज, उधारीचे व्यवहार व शस्त्रक्रिये सारख्या संवेदनशील क्षेत्राशी संबंधित स्थान आहे. शुक्राचे वृषभेतील भ्रमण धनु राशीच्या जातकांना मिश्र फले देताना दिसून येईल. शुक्राचे हे भ्रमण विद्यार्थ्यांना लाभदायी होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान स्पर्धा परीक्षेच्या तयारीत यशस्वी होण्याची अधिक संभावना आहे. ह्या दरम्यान वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्यासाठी अचानकपणे खर्च उदभवण्याची शक्यता दिसत आहे. शुक्राचे वृषभेतील हे भ्रमण कारकिर्दीच्या बाबतीत अनुकूल परिणाम मिळवून देऊ शकेल. ह्या दरम्यान आपणास आर्थिक स्थैर्य लाभण्याची दाट शक्यता आहे. नोकरीतून लाभ होण्याची शक्यता आहे. जर आपणास नोकरीत बदल करावयाचा असेल तर ह्या दरम्यान आपणास चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व विशेषतः आपल्या वडील भावंडांच्या आरोग्याची काळजी घ्या. 


मकर रास
शुक्राचे वृषभेतील भ्रमण हे आपल्या पंचमातून होत आहे. शुक्र हा आपल्या पंचमाचा व दशमाचा अधिपती आहे. कुंडलीचे पंचमस्थान हे विद्यास्थान ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. ह्या स्थानाचा संबंध संततीचा व्यवहार, जन्म व सौख्यांशी येतो. त्याच बरोबर मंत्र - तंत्र, ज्ञान, गूढ ज्ञान, उपासना, सट्टा, जुगार, लॉटरी, आध्यात्मिक ज्ञान, गर्भावस्था, स्मरणशक्ती अशा महत्वाच्या क्षेत्राशी ह्या स्थानाचा संबंध येतो. शुक्राचे हे भ्रमण आपल्यासाठी सरासरी परिणाम देणारे आहे. ह्या भ्रमणामुळे हे जातक आपल्या प्रणयी जीवनाकडे अधिक लक्ष देऊन आपल्या जोडीदारासाठी अधिक खर्च करण्याची इच्छा व्यक्त करतील. शुक्राचे हे भ्रमण विद्या प्राप्तीत सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण करेल. ह्या दरम्यान आर्थिक स्थिती अधिक बळकट होईल व आपण स्वतःला आर्थिक दृष्ट्या अधिक स्वातंत्र्यपणा असल्याचा अनुभव घ्याल. हा कालखंड आपल्यासाठी धन संचय व बचत करण्यास सुद्धा लाभदायी व महत्वाचा आहे. हे भ्रमण मकर राशीच्या व्यक्तींना ज्ञानार्जन विशेषतः रचनात्मक कौशल्य प्राप्त करण्यास प्रेरित करेल. मात्र, ह्या दरम्यान आपण आपली हौसमौज पूर्ण करण्यासाठी अधिक खर्च करू शकाल व त्यासाठी आपली आर्थिक स्थिती आपणास अनुमती देईल. शुक्राचे हे भ्रमण कारकिर्दीच्या बाबतीत लाभ मिळवून देऊ शकेल. ह्या दरम्यान नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची व व्यावसायिकांना अधिक यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास 
शुक्राचे वृषभेतील भ्रमण हे आपल्या चतुर्थातून होत आहे. शुक्र हा आपल्या चतुर्थ व नवम स्थानाचा अधिपती आहे. कुंडलीतील चतुर्थ स्थान हे सुखस्थान असून ह्या वरून सुख, बुद्धिमत्ता, घर, वाहन, जमीन, मिळकत, तृष्णा, लालसा, महत्वाकांक्षा व स्थावर संपत्ती ह्यांचा बोध होतो. शुक्राचे हे गोचर भ्रमण कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होण्याचे संकेत देत आहे. त्याच बरोबर आर्थिक दृष्ट्या हे गोचर भ्रमण कुंभ राशीच्या व्यक्तींना लाभदायी होत असल्याचे दिसत आहे. ह्या गोचरी दरम्यान कुंभ व्यक्तींचा पैसा हा घर किंवा व्यावसायिक स्थळाची देखभाल व सजावटीसाठी खर्च होऊ शकतो. ह्या दरम्यान आपली पत्नी आपणास संपत्तीच्या खरेदीत मदत करू शकेल. स्वराशीचा शुक्र कुंभ व्यक्तींना वैभवी वस्तूं प्रति आकर्षित करू शकेल. ह्या दरम्यान आपण वाहन किंवा इतर कोणत्याही विलासी वस्तूंसाठी खर्च करू शकाल. ह्या दरम्यान कौटुंबिक सौख्य वाढविण्यासाठी शुक्र आपणास मदत करेल. ह्या दरम्यान प्रियजन व मित्रांसह वेळ उत्तम घालवू शकाल. 

मीन रास 
शुक्राचे वृषभेतील भ्रमण हे आपल्या तृतीयेतून होत आहे. शुक्र हा आपल्या तृतीयेचा व अष्टमाचा अधिपती आहे. कुंडलीतील तृतीय स्थान हे पराक्रम स्थान ह्या नांवाने ओळखले जाते. ह्या स्थानावरून पराक्रम, साहस, मित्र, छोटे प्रवास, संगीत, महत्वाचे बदल, दलाली व शौर्य ह्यांचा बोध होतो. वृषभेतील हे भ्रमण मीन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सरासरी परिणाम मिळवून देणारे आहे. ह्या दरम्यान मीन राशीच्या व्यक्ती संगीत, कला, नाटक इत्यादी सारख्या रचनात्मक किंवा कलात्मक क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतील. ह्या दरम्यान आपल्या कौशल्याच्या जोरावर ह्या व्यक्तींना प्रतिस्पर्धी क्षेत्रातून उत्तम आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आपले जिवलग व शेजाऱ्यांशी संबंधातील माधुर्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. संवाद साधताना सावध राहून दुसऱ्याच्या भावना दुखावणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. ह्या दरम्यान आपण आपल्या काही प्रियजनांना महागड्या वस्तू भेट म्हणून सुद्धा देऊ शकाल. 

आपल्या व्यक्तिगत समाधानासाठी आमच्या ज्योतिषांशी आताच बोला!

गणेशजींच्या कृपेने, 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम