२०१९ वट सावित्री व्रत कथा व वट पौर्णिमा पूजा विधी

दर वर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेस वट सावित्रीचे व्रत केले जाते. सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व कुटुंबात सुख - शांती नांदावी ह्यासाठी हे व्रत करते. ह्या दिवशी वडाची पूजा केली जाते. हे व्रत उत्तर भारतात, गुजरातेत व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वट सावित्री ह्या नावाने ओळखले जाते. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजा पासून परत आणले होते अशी एक मान्यता आहे. 

वट सावित्री व्रत केव्हा आहे 
तसे पाहू गेल्यास संपूर्ण भारतवर्षात वट सावित्रीचे व्रत हे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेस करण्यात येते. २०१९ साली हि पौर्णिमा १६ जून रोजी आहे. मात्र, काही स्त्रीया हे व्रत वैशाख अमावास्येस सुद्धा करतात. हा दिवस ३ जून रोजी होता. तसे पाहू गेल्यास हे व्रत पौर्णिमेस करावे असे शास्त्र सांगते. काही लोकांचे मानस सूर्योदयीन तिथीस हे व्रत करण्याचे असते. तसे करू इच्छिणाऱ्यांनी हे व्रत १७ जून रोजी करावे. 

वट सावित्रीचे व्रत कसे करावे 
- हे व्रत चतुर्थी प्रमाणे करण्यात येते. 
- वट पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवतीने सकाळी उठून स्नानादी कर्म उरकून नवीन वस्त्र परिधान करावीत. 
- ह्या दिवशी संपूर्ण शृंगार करण्यास महत्व आहे. 
- हळद, कुंकू, मेंदी, तांदूळ इत्यादी वस्तू पूजेसाठी घ्याव्यात. 
- एखाद्या शंकराच्या मंदिरा जवळ असणाऱ्या वटवृक्षाचे पूजन करण्यास जावे. 
- वटवृक्षा खाली शेण व माती ह्यांनी जमीन सारवून ती जागा स्वच्छ करावी. 
- माती पासून बनविलेल्या सत्यवान व सावित्रीची मूर्ती ह्यांची स्थापना करावी. त्या नंतर त्यांचे पूजन करावे. 
- सत्यवान व सावित्रीस लाल कापड व फळ अर्पण करावे.
- दोन्ही मूर्त्यांना वारा घालावा. 
- सावित्रीदेवीकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. 
- सत्यवानाकडे आपल्या घरात सुख - शांती नांदावी ह्यासाठी प्रार्थना करावी. 
- त्या नंतर वटवृक्षाची पूजा करावी. पाणी शिंपडून त्या समोर दीप प्रज्ज्वलित करावा. 
- वटवृक्षात शिव - विष्णू व ब्रम्हाचे वास्तव्य असते. त्यांच्याकडे सुख - सौभाग्य ह्यासाठी प्रार्थना करावी. 
- वटवृक्षा भोवती लाल सुती दोरा सात वेळा गुंडाळावा. हे करत असता भगवान श्रीशंकर  व  श्रीविष्णू ह्यांच्या मंत्राचा जप करावा. 
- पूजास्थळी सावित्री व्रतकथेचे पठन करून इतरांना ती ऐकवावी. 
- घरी माता - पिता व सासू - सासरे ह्यांचा आशीर्वाद घ्यावा. 
- यथाशक्ती उपलब्ध फळे जसे की आंबा इत्यादींचे गरीब मुलांना वाटप करावे. ब्राह्मणास आवश्यक वस्तूंचे दान करावे. 

वटसावित्री व्रतकथा 
मद्र देशातील राजा अश्वपतीने आपल्या पत्नीसह देवीचे व्रत केले होते. त्यानंतर त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले. राजाने आपल्या कन्येचे नांव सावित्री असे ठेवले. मोठी झाल्यावर सावित्रीचा विवाह सत्यवानाशी ठरला. विवाह ठरल्यावर देवर्षी नारद ह्यांनी सांगितले कि १२ वर्षा नंतर सत्यवानाचा मृत्यू होईल. असे सांगितलेले असताना हि सावित्रीने सत्यवानाशी विवाह करून त्याची पूर्ण सेवा ती करू लागली. जेव्हा यमराजाने सत्यवानाचे प्राण नेले तेव्हा सावित्री यमराजाच्या बरोबरीने चालू लागली. यमराजाने सावित्रीच्या निष्ठेने प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सर्व प्रथम आपल्या दृष्टिहीन सासू - सासऱ्यांसाठी दृष्टी मागितली. त्या नंतर सुद्धा ती यमराजाच्या मागे मागे जाऊ लागली. दुसऱ्यांदा वर मागताना सावित्रीने आपल्या पटीने गमावलेले राज्य मागितले. सर्वात शेवटी तिने आपल्यासाठी एक पुत्र मागितला. त्यामुळे यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. 

वटसावित्री व्रत पूजा मुहूर्त 
पूजेसाठी शुभ मुहूर्त दुपारी १२.१४ ते ०१.०७ दरम्यान वटवृक्षाची पूजा करणे व कथा श्रवण करणे. 

गणेशजींच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम