वास्तू शास्त्रानुसार घरात हे महत्वपूर्ण उपाय करा


ज्या प्रमाणे कुंडलीतील दोष हे रत्न, यंत्र, पूजा - पाठ, यज्ञ व दानधर्म ह्या सारख्या उपायांनी दूर केले जातात, तसेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश तत्व ह्यांच्या द्वारा वास्तूतील दोष दूर करून तीला अनुकूल बनविता येते. वास्तू शास्त्रा नुसार आपल्या घरात केलेल्या काही बदलामुळे आपल्या जीवनात एक अद्भुत शांती व सकारात्मक बदल घडवून येण्याची शक्ती निर्माण होते. जर आपला विश्वास बसत नसेल तर स्वतः आपल्या घरात हे बदल करून त्याचा अनुभव घ्या. हातच्या कंकणास आरसा कशाला?

वास्तू शास्त्राचे काही खास उपाय ज्याने घरात सकारात्मकता व आनंदी वातावरणाची भर पडते. 

१. प्रवेश द्वाराची भिंत जर रिकामी असेल तर तेथे श्रीगणेशाची मूर्ती लावा. वास्तू शास्त्रानुसार रिकामी भिंत हि एकटेपणा दर्शविते. 
२. जर घर किंवा इमारत कि ज्यात आपण राहता, त्याची बोरिंग शास्त्रानुसार योग्य दिशेस नसेल तर दक्षिण - पश्चिम दिशेकडे तोंड करून पंचमुखी मारुतीची तसबीर लावणे हितावह राहील. 
३. जर आपणास आध्यात्मिक विकास साधावयाचा असेल तर त्यासाठी उत्तर - पूर्व दिशेस तोंड करून ध्यान धारणा करावी. 
४. जीवनात एक उत्तम दृष्टी व नियोजन प्राप्तीसाठी आपण उत्तर - पूर्व दिशेस एक लांब जाणारा रस्ता दर्शविणाऱ्या निसर्ग सौंदर्याची तसबीर लावावी. 
५. कुटुंबात एकोपा निर्माण करण्यासाठी घरातील दक्षिण - पश्चिम दिशेस एक एकत्र कुटुंबाचा फोटो किंवा सूर्यमुखीची तसबीर लावावी. 
६. ज्योतिष शास्त्रानुसार रवी शुभ असल्यास आपले सामाजिक संबंध उत्तम राहतात. तेव्हा आपले सामाजिक संबंध दृढ करण्यासाठी पूर्व दिशेस उगवत्या सूर्याची तसबीर ठेवा. 
७. मुलांच्या शिक्षणात चमत्कारिक सुधारणा घडवून आणण्यासाठी पूर्व दिशेस अभ्यासाचे टेबल ठेवा. 
८. घरातील दक्षिण दिशेस धावणाऱ्या घोडयाची तसबीर ठेवल्यास पैश्यांचा ओघ निरंतर चालू राहतो. त्याने जीवनात सुख व संपन्नता ह्यांची वाढ होते. 
९. सुखी वैवाहिक जीवनासाठी पलंग एका गादीचाच असावा. ह्या व्यतिरिक्त पत्नीने पतीच्या डाव्या बाजूस झोपावयास हवे. 
१०. पलंगा खालील भरगच्च असलेले सामान तेथून दूर करावे. निरुपयोगी वस्तू आपल्या मनातील भूतकाळ दूर सारू देत नाही, व त्यामुळे आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो.
११. शयनखंडात कधीही अंधार असू नये. घरात सुख शांती नांदावी म्हणून शयनखंडाच्या भिंतींना काळा रंग देऊ नये. 
१२. नकारात्मकता दूर सारून सकारात्मक ऊर्जा यावी ह्यासाठी नहाणीघरात हिरव्या वृक्षाची मेणबत्ती ठेवावी. 
१३. स्वयंपाकघरात गॅस व सिंक दरम्यान जास्तीत जास्त अंतर ठेवावे. 
१४. संबंधात गोडवा निर्माण होण्यासाठी दक्षिण - पश्चिम दिशेस शयनखंड ठेवावे. 
१५. झोपण्याची व्यवस्था कोपऱ्यावर करू नये. घरातील कोपरे हे ताण निर्माण करणारे असतात. 
१६. आपला उत्तम विकास साधण्यासाठी व नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपल्या घरातील उत्तर - पूर्व दिशेस मत्स्यालय ठेवावे. 
१७. कौटुंबिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या घरातील उत्तर - पूर्व दिशेस पाण्याचे कारंज ठेवावे. 
१८. जर आपले घर मोठे असेल तर घराच्या मध्यभागी पिरामिड ठेवा. योग्य पद्धतीने पिरामिड ठेवल्यास घर किंवा इमारतीतील सर्व दोष दूर होतात. 
१९. संबंधात सौहार्द निर्माण करण्यासाठी घरातील पूर्व दिशेस हिरवे रोपटे ठेवा. 

जर आपणास आपल्या वास्तूस योग्य प्रकारे ठेवावयाची असेल किंवा त्या बद्धल काही विचारावयाचे असेल तर आपण आमच्या तज्ञ ज्योतिषांशी प्रत्यक्षात बोलू शकता. 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी