शिवलिंगाचे प्रकार व त्यांच्यावर अभिषेक करून होणारे लाभ

शिवलिंगाचे प्रकार व त्यांच्यावर अभिषेक करून मिळणारी शुभ फले
पारद शिवलिंगाच्या पूजनाने होते सुख - समृद्धीची प्राप्ती 
भगवान श्रीशंकरास अभिषेक केल्याने ते प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करतात. अभिषेक हा दूध किंवा पाण्याने करण्यात येतो. श्रावण महिन्यात तर भगवान श्रीशंकरावर अभिषेक करून अभिष्ट फल प्राप्ती होते. ज्या प्रमाणे भगवान श्रीशंकर ह्यांच्यावर अभिषेक केल्याने पुण्य फलाची प्राप्ती होते त्याच प्रमाणे विभिन्न प्रकारच्या शिवलिंगावर अभिषेक करून निरनिराळ्या मनोकामनांची पूर्तता होत असते. ह्याचा उल्लेख धर्मसिंधूत सुद्धा आहे. 

विशेष सामग्रीतून बनविलेले शिवलिंग व त्यावरील अभिषेकाने मिळणारी शुभ फले 
- पारद शिवलिंग - हे शिवलिंग सर्वोत्तम असते. घरात व दुकानात ह्यास ठेवून पूजन केले असता व्यापार वृद्धीसह सौभाग्य व सुख - शांती प्राप्त होते. 
- स्वर्ण निर्मित शिवलिंग - सुख - समृद्धी बरोबरच स्वर्ग प्राप्ती होते. 
- साखरेचे शिवलिंग - रोगांचा नाश होतो. 
- मोती निर्मित शिवलिंग - स्त्रियांची सौभाग्य वृद्धी होते. 
- हिरा निर्मित शिवलिंग - दीर्घायु प्राप्त होते. 
- पुष्कराज निर्मित शिवलिंग - धन - धान्य प्राप्ती होते.
- नीलम निर्मित शिवलिंग - सन्मान प्राप्ती होते. 
- स्फटिक निर्मित शिवलिंग - मनोकामनांची पूर्तता होते. 
- लसण्या निर्मित शिवलिंग - शत्रूंवर मात करता येते. 
- चांदी निर्मित शिवलिंग - धन - धान्यांची प्राप्ती होऊन पितरांना मुक्ती प्राप्त होते. 
- तांब्याचे शिवलिंग - दीर्घायु प्राप्ती होते. 
- पितळेचे शिवलिंग - सर्व सुखे प्राप्त होतात. 
- कासाचे शिवलिंग - यश प्राप्ती होते. 
- लोखंडाचे शिवलिंग - शत्रूंचा नाश होतो. 
- बांबूचे शिवलिंग - बांबूच्या अंकुरास शिवलिंगाच्या आकारात कापून त्याची पूजा केल्याने वंश वृद्धी होते. 
- मिरची, पिंपळाचे चूर्ण, सुंठ व मीठ ह्यापासून बनविलेले शिवलिंग - ह्याचे पूजन वशीकरण करण्यासाठी केले जाते. 
- फुलांचे शिवलिंग - भूमी व घराची प्राप्ती होते.  
- फळांचे शिवलिंग - फळांचे शिवलिंगा समान पूजन केल्याने उत्पादनात वाढ होते. 
- पिठाचे शिवलिंग - सम प्रमाणात जवस, गहू व तांदूळ ह्यांचे पीठ एकत्र करून बनविण्यात आलेल्या शिवलिंगाचे पूजन केल्याने सुख - समृद्धी व संतती प्राप्ती बरोबरच रोगांपासून सुद्धा रक्षण होते. 
- उडदाच्या पिठाचे शिवलिंग - सुंदर पत्नी प्राप्त होते. 
- लोण्या पासून बनविलेले शिवलिंग - सर्व सुखांची प्राप्ती होते. 
- गुळाचे शिवलिंग - शिवलिंगावर अन्न चिटकवून पूजन केल्याने प्राप्तीत वाढ होते व अन्नाची प्राप्ती होते. 
- भस्माचे शिवलिंग - अभिष्ट सिद्धी प्राप्त होते. 
- दह्याचे शिवलिंग - दह्यातील पाणी काढून बनविण्यात आलेल्या शिवलिंगाचे पूजन केल्याने सुख - संपत्ती व धन प्राप्ती होते. 
- आवळ्याचे शिवलिंग - ह्या शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्याने मुक्ती मिळते. 
- कापूराचे शिवलिंग - आध्यात्मिक उन्नती होते. 
- दुर्वांचे शिवलिंग - अकाली मृत्यूचे संकट टळते. 
- पिंपळाच्या फांदी पासून बनविलेले शिवलिंग - दारिद्र्य मुक्ती होते.
- बिव्हराच्या मातीचे शिवलिंग - विषारी जंतूं पासून रक्षण होते.