सूर्य ग्रहण २०२१

सूर्य ग्रहणाचे विविध प्रकार जसे कि खग्रास व खंडग्रास असे आहेत. दर वर्षी सामान्यतः २ ते ५ सूर्य ग्रहण होत असतात. हिंदू मान्यते सहित जगातील विभिन्न संप्रदायात ग्रहणास शुभत्व किंवा अशुभत्वाशी जोडून पाहण्यात येते. त्या आधारे चंद्र व सूर्य ग्रहणास वेगवेगळ्या संबंधांनी जोडून बघितले जाते. जसे कि चंद्र ग्रहण असता मन, आत्मा प्रभावित होत असतो. तसेच सूर्य ग्रहण असता शरीर व अन्य सर्व बाहेरील पर्यावरण प्रभावित होते. आज आपण येथे २०२१ दरम्यान येणाऱ्या सूर्य ग्रहणा बद्धल बघू. 

ह्या वर्षी सूर्य ग्रहण हे वैशाख अमावास्येच्या दिवशी म्हणजेच गुरुवार दि. १० जून २०२१ रोजी होईल. हे ग्रहण वृषभ राशीतील मृगशीर्ष नक्षत्रातून होईल. हे वलयांकित सूर्य ग्रहण भारतातून दिसणार नाही. 

हे सूर्य ग्रहण उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर एशिया येथून दिसेल. तसेच हे सूर्य ग्रहण उत्तर कॅनडा, ग्रीनलँड व रशिया येथून सुद्धा दिसेल. ह्या ग्रहणाचे परिमाण ०.९४३ व स्थिरता ३ मिनिटे ४८ सेकंद इतकी असेल. 

सूर्य ग्रहण २०२१ 

ग्रहण स्पर्श - दुपारी ०१ वाजून ४२ मिनिटे व २२ सेकंद 
१० जून २०२१ च्या दिवशी पाळावयाचे नियम 

जेव्हा सूर्य ग्रहण सुरु होईल तेव्हा स्नान करून मंत्र जप करावे. ग्रहणाच्या मध्यास अग्नी समोर देवास पूजेची सामग्री अर्पण करून पूजा करावी. ग्रहण समाप्ती झाल्यावर पुन्हा स्नान करावे. 

सूर्य ग्रहण सुरु होण्याच्या कमीत कमी १२ तास आधी पासून उपवास करावा. आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती व लहान मुलांसाठी ग्रहणाच्या प्रारंभा पासून ते अखेर पर्यंत उपवास पुरेसा आहे. ग्रहण काळा दरम्यान दान करण्यास शुभ मानले गेले आहे. आपल्या क्षमतेनुसार ह्या दिवशी दान करावे. प्रत्येक जलास पवित्र गंगाजल मानण्यात येते, तर प्रत्येक ब्राह्मणास ब्रह्मा समान मानण्यात येते. सूर्य ग्रहणा दरम्यान करण्यात आलेले दान १० पटीने लाभ देऊ शकते. संततीचा जन्म, प्रसिद्धी, विवाह, मृत्यू, राहू दर्शन, सूर्य ग्रहणा दरम्यान संध्याकाळचे स्नान आवश्यक व पवित्र असून संध्याकाळचे दान निषिद्ध आहे. जन्म नक्षत्रावर सूर्य ग्रहण झाले असता रोग, आर्थिक चणचण व धनहानी होण्याची शक्यता असते. ह्याची शांती व समृद्धीसाठी सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे. 

सूर्य ग्रहणाचा सुतक काळ 

जन्म नक्षत्रावर व पायावर सूर्य ग्रहण झाले असता मृत्युसम पीडा, नुकसान, शत्रुभय, कुष्ठ रोग इत्यादींची भीती निर्माण होऊ शकते. ह्यांच्या शांती प्रित्यर्थ गौ दान,स्वर्ण दान व गायत्री अनुष्ठानचा सल्ला देण्यात येतो. गाईस चारा घालण्याचा सल्ला सुद्धा देण्यात येतो. सूर्य ग्रहणाचा प्रभाव रात्री होत नसल्याने ह्या दरम्यान स्नान व दान ह्यांची आवश्यकता नाही. जरी हे सूर्य ग्रहण अस्पष्ट असले तरी त्याचा प्रभाव सारखाच आहे. सूर्य ग्रहणा पूर्वीचे १२ तास अशुभ मानले जातात. ह्यास सूर्य ग्रहणाचा सुतक काळ सुद्धा म्हटले जाते. ह्या दरम्यान आपण जर आहार करणे टाळले तर ते मदतरूप होऊ शकते. ग्रहण समाप्ती नंतर स्नान करून भोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सूर्य ग्रहणा आधी अशुभ काळा दरम्यान मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात येतात. जरी २०२१ चे सूर्य ग्रहण अस्पष्ट असले तरी आपण स्नान करून दुसऱ्या दिवशी भोजन करावे. आपण जरी मंत्र, जप किंवा दान करण्यास विसरलात तरी सुद्धा ह्याचा आपणास अनुकूल परिणाम मिळू शकतो. ग्रहणाने प्रभावित भोजन न घेण्याचा प्रयत्न करावा. दूध, दही, ताक ह्यात तीळ किंवा दुर्वा घातल्यास हे पदार्थ खराब होत नाहीत. 

ग्रहण असता स्नान केल्याने आपले पापक्षालन होते. तसेच गंगा, यमुना व सरस्वती ह्या सारख्या नदीत स्नान केल्याने १० पट अधिक पुण्य लाभते. हरिद्वार, गया, कुरुक्षेत्र व गंगासागर येथे स्नान करणे सर्वोत्कृष्ट ठरते. असे समजले जाते कि ह्यामुळे जन्मोजन्मीचे पाप धुतले जाऊन पुण्य प्राप्ती होते. रोहिणी व मृगशीर्ष नक्षत्रात ह्या सूर्य ग्रहणाच्या एक दिवस अगोदर व एक दिवसा नंतर विवाहादि शुभ कार्य वर्जित करावे. ह्या नक्षत्रातील पुढील सहा महिन्या पर्यंत कोणताही शुभ मुहूर्त देऊ नये. आपण उपरोक्त नियमांचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ह्यास बुकमार्क करू शकता. हा मूलभूत नियम असल्याने ग्रहणा दरम्यान ह्याचे पालन करावयास हवे. आता आपण आपल्या राशीस हे सूर्य ग्रहण कसे प्रभावित करेल हे पाहू. 

१० जून २०२१ रोजी होणाऱ्या सूर्य ग्रहणाचा प्रत्येक राशीवर होणार परिणाम - 


मेष रास - 

सूर्य ग्रहण २०२१ दरम्यान आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ह्या दरम्यान आपणास चिंता, नैराश्य , डोळे किंवा जबड्याच्या खालील भागाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपणास अनपेक्षितपणे खर्च करावा लागण्याची संभावना आहे. समुपदेशन व संवादाशी संबंधित व्यवसायात यश मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसाया निमित्त घरा बाहेर किंवा बाहेरगावी जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या जातकांना त्यात यश प्राप्त होऊ शकेल. आर्थिक बाबतीत सतर्क राहावे. दैनंदिन कामाशी संबंधित प्रवास होऊन त्यात आपण यशस्वी सुद्धा होऊ शकता. ह्या दरम्यान पैसे उधार न घेण्याचा तसेच नोकरी सोडण्याचा प्रयत्न न करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. व्यावसायिक कार्यस्थळाशी संबंधित नवीन उपक्रम होऊ शकतात, परंतु ते खर्चिक होण्याची शक्यता असून त्यात प्रगती संथ गतीने होण्याची संभावना आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी वाटून आपण तणावग्रस्त होऊ शकाल. संपत्तीच्या बाबतीत काही कौटुंबिक वाद झाल्याने आपण चिंतीत होण्याची शक्यता आहे. मुलांसाठी हे ग्रहण अनुकूल आहे. संतती इच्छुकांना संतती प्राप्तीत यश प्राप्त होऊ शकते. मोठ्या मुलांशी संघर्ष संभवतो. आपल्या अविवाहित मुलांचा विवाह ह्या वर्षात होऊ शकतो. लहान भावंडांसाठी हा काळ खूपच चांगला आहे. परंतु ते जर मोठे होऊन काम करत असले तर त्यांना त्यांच्या कारकिर्दीत समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात अनुकूलता लाभू शकते. वैवाहिक जीवनात दीर्घ काळा पासून असलेली  समस्या संपुष्टात येऊ शकते. आपल्यात जिव्हाळा निर्माण होऊ शकतो. आपणास मित्रांपासून एखादा लाभ संभवतो. मित्रांशी असलेले संबंध दृढ होऊ शकतात. मोठ्या भावंडां पासून लाभ संभवतो. त्यांच्या कार्यस्थळात किंवा निवासात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहू शकते. 

सूर्य ग्रहणा दरम्यान करावयाचे उपाय:-सूर्य ग्रहण असता गायत्री मंत्राचा जप करावा. सूर्य ग्रहणाच्या समाप्ती नंतर भगवान शंकराच्या व गणपतीच्या मंदिरात दीपदान करावे. गरिबास गरजेच्या वस्तू द्याव्यात. 

वृषभ रास - 

ह्या ग्रहणामुळे आपले शारीरिक व भावनात्मक आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. आपला आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. तणावामुळे कोणताही निर्णय बेपर्वाईने घेऊ नये. ह्या सूर्य ग्रहणा दरम्यान आपले आरोग्य बिघडण्याच्या शक्यतेमुळे मानहानी, धनहानी व आरोग्यहानी होणार नाही ह्याची काळजी आपणास घ्यावी लागेल. आपणास आर्थिक चिंता सतावणार नसली तरी सुद्धा खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरिक व मानसिक त्रास झाला तरी कौटुंबिक सलोखा टिकून राहील. संततीसाठी हा काळ चांगला असला तरी जर आपली संतती शिक्षण घेत असली तर त्यांच्या अभ्यासामुळे आपण चिंतीत होऊ शकता. मुलांच्या कारकिर्दीत चांगले परिणाम मिळू शकतात. नोकरी व व्यापार करणाऱ्यांना एखादी नवीन संधी मिळण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. पगारवाढीची शक्यता असली तरी त्यासह अतिरिक्त कार्यभार सुद्धा संभवतो. वैवाहिक जीवनात वाद संभवतात. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची प्रतीक्षा करावी लागेल. ज्यांना व्यवसायासाठी जमीन खरेदी करावयाची असेल त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. त्यांना भाड्याची जागा बदलण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हा काळ दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी प्रतिकूल आहे. ह्या दरम्यान शेअर्स बाजारात दीर्घ कालीन गुंतवणूक न करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. 

सूर्य ग्रहणा दरम्यान करावयाचे उपाय:-सूर्याशी संबंधित वस्तू दान करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. सूर्यास अर्घ्य द्यावा. "ૐ घृणी सूर्याय नमः" ह्या मंत्राचा जप करावा. तसेच विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा. पिंपळाला पाणी घालावे. आपण भगवान श्रीविष्णूंचे पूजन करावे.    

मिथुन रास -

आपल्या मुलांचे आरोग्य उत्तम राहू शकते. लहान - सहान तणाव  किंवा नेत्र विकार, पोट दुखी, कंबर दुखी निर्माण होण्याची शक्यता आहे. आपणास आपल्या माता - पित्याच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कुटुंबातील एखादया व्यक्तीस आरोग्य विषयक त्रास होण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या समस्येमुळे आपणास नैराश्य येण्याची संभावना आहे. वाढत्या खर्चांची चिंता आपणास सतावण्याची शक्यता आहे. संतती इच्छुक जोडप्याना यश प्राप्त होऊ शकेल. ह्या व्यतिरिक्त मुलांच्या बाबतीत थोडा धीर धरावा लागेल. ह्या दरम्यान आपणास शारीरिक व मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषतः मानहानी व धनहानी होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. शेअर्स बाजारात मोठ्या लाभाची अपेक्षा बाळगू नये. हे ग्रहण आपल्या वैवाहिक जीवनासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या दरम्यान परदेशात जाण्यासाठी उत्सुक असणाऱ्या व्यक्तींना यश प्राप्त होऊ शकेल. हा काळ धार्मिक यात्रा किंवा धार्मिक प्रवृत्तींसाठी अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. व्यापार किंवा नोकरी साठी हा काळ प्रतिकूल होऊ शकतो. त्यात चढ - उतार आल्याने प्रगतीस खीळ बसेल. कारकिर्दी विषयी आपण असमाधानी झाल्याने आपल्या मनात नोकरी बदलण्याची इच्छा निर्माण होण्याची शक्यता आहे. प्राप्तीपेक्षा खर्च अधिक होण्याची शक्यता असली तरी उसने पैसे घेऊ नये. 

सूर्य ग्रहणा दरम्यान करावयाचे उपाय:-आपणास सूर्य किंवा चंद्राशी संबंधित वस्तूंचे दान करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपण सूर्य मंत्राचा जप करून भगवान सूर्याचे आशीर्वाद प्राप्त करू शकता. 

कर्क रास -

ह्या सूर्य ग्रहणा दरम्यान आपणास धनलाभ होऊन आपली उन्नत्ती होण्याची शक्यता आहे. संपत्तीशी संबंधित अनेक दिवसां पासून चालत आलेला वाद संपुष्टात येऊ शकतो. आपण जर जुन्या संपत्तीची विक्री करण्यात अपयशी झाला असाल तर आता त्यात यशस्वी होऊन नवीन संपत्तीची खरेदी सुद्धा करू शकाल. आपणास एखादी पैतृक संपत्ती प्राप्त होण्याची शक्यता आहे. मित्र मंडळात आपणास वादाला सामोरे जावे लागू शकते. ह्या दरम्यान कुटुंबातील काही क्षुल्लक वादामुळे आपण चिंतीत व तणावग्रस्त होण्याची शक्यता आहे. मोठ्या भावंडांशी संबंधात तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. इतकेच नव्हे तर अशा प्रसंगी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. कुटुंबियांचे आरोग्य आपणास चिंतीत करू शकेल. आपणास मुलांची काळजी वाटण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान विद्यार्थ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. संतती इच्छुक जोडप्याना थोडा धीर धरावा लागू शकतो. हे सूर्य ग्रहण नोकरी - व्यवसायाच्या दृष्टीने मध्यम फलदायी आहे. ह्या दरम्यान वैवाहिक जीवन सामान्य राहण्याची संभावना आहे. आपणास जी काही सुधारणा करावयाची असेल ती पूर्ण करण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असला तरी शेअर्स बाजारा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. 

सूर्य ग्रहणा दरम्यान करावयाचे उपाय:-सूर्य ग्रहणा नंतर काळे तीळ, मध, मूग, उडीद ह्यांचे दान करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. सूर्य ग्रहण असता आपण भगवान श्रीगणेशांची पूजा करू शकता. गुरूच्या मंत्रांचा जप सुद्धा आपणास फायदेशीर होऊ शकतो. 

सिंह रास -

हे सूर्य ग्रहण आपल्यासाठी अशुभ फलदायी ठरण्याची संभावना आहे. आपणास पोट, कंबर, नेत्र किंवा हाडांचे विकार होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपणास विशेषतः कौटुंबिक कारणांमुळे अत्यंत तणाव व क्रोध जाणवू शकतो. आपणास शेजाऱ्यांशी असलेल्या संबंधांची योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जर पूर्वी आपले संबंध तणावग्रस्त असले तर आपण त्यात तडजोड करू शकता. आपण वडिलांच्या प्रकृती विषयी चिंतीत होण्याची शक्यता आहे. मित्र, मोठी भावंडे ह्यांच्याशी संबंध सुधारण्याची संभावना आहे. ह्या दरम्यान विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची दाट शक्यता आहे. आपणास आपल्या पाल्याच्या अभ्यासाची काळजी वाटू शकते. हे सूर्य ग्रहण नोकरी - व्यवसायासाठी प्रतिकूल आहे. ह्या दरम्यान स्थानांतर होण्याची शक्यता आहे. संपत्तीशी संबंधित असलेले वाद चालूच राहतील. विक्री योग्य संपत्तीची विक्री झाली तरी आपणास अपेक्षित किंमत मिळण्याची शक्यता नाहीच. आपणास खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 

सूर्य ग्रहणा दरम्यान करावयाचे उपाय:-सूर्य ग्रहणाच्या समाप्ती नंतर भगवान श्रीशंकराच्या मंदिरात काळे तीळ, दूध, मध, उसाचा रस ह्यांचा अभिषेक करावा. सूर्य ग्रहण असता गायत्री मंत्रा सहित भगवान श्रीशंकर ह्यांच्या मंत्रांचा जप सुद्धा करावा. 

कन्या रास -

१० जून रोजी होणाऱ्या ग्रहणाच्या परिणाम स्वरूप आपणास तणाव, चिंता व बेचैनी जाणवेल. एकंदरीत सूर्य ग्रहण असता जातकावर सकारात्मक परिणाम होत नसले तरी एखादी कौटुंबिक समस्या असल्यास त्याचे निराकरण ह्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. आपणास खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता भासण्याची संभावना आहे. हे सूर्य ग्रहण नोकरी, व्यापार व दीर्घकालीन गुंतवणूक ह्यांच्यासाठी अनुकूल परिणाम देणारे आहे. आपणास एखाद्या नवीन उद्योगात किंवा धार्मिक प्रवृत्तीत अडथळा जाणवण्याची शक्यता आहे. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्या विषयी आपण चिंतीत होण्याची संभावना आहे. नाते संबंधात काही वाद संभवतात. ह्या ग्रहणा दरम्यान विवाहेच्छुकांना थोडा धीर धरावा लागू शकतो. आपणास मातुला कडून लाभ व मदत मिळू शकेल. वडिलांच्या प्रकृतीमुळे आपण चिंतीत होण्याची शक्यता आहे. मित्रांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्या पासून थोडे दूर राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. मोठ्या भावंडांशी संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे.  

सूर्य ग्रहणा दरम्यान करावयाचे उपाय:-ग्रहण समाप्ती नंतर सूर्यास अर्घ्य द्यावा. गरिबास सूर्य, चंद्र व राहू ह्यांच्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे. सूर्याची पूजा करावी.    

तूळ रास -

सूर्य ग्रहणामुळे आपणास कष्ट, मानहानी व घातक आजारास सामोरे जावे लागू शकते. संपत्तीशी संबंधित समस्या भ्रमित करण्याची शक्यता आहे. शेअर्स बाजारातील गुंतवणूक मर्यादित प्रमाणात करावी. असे असले तरी आपणास महत्वाचा आर्थिक लाभ होऊ शकतो. अल्पकालीन गुंतवणुकीतून लाभ होण्याची संभावना आहे. संततीशी संबंध सुधारतील. संतती इच्छुक दांपत्यास लाभ होईल. सूर्य ग्रहणाच्या प्रभावामुळे आपणास पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. नोकरी - व्यवसायासाठी हा काळ प्रतिकूल आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रातील असलेली रुची किंवा प्रेरणा गमावून बसाल. कौटुंबिक वादात आपण अडकाल. ह्यात काही पैतृक संपत्ती विषयक वाद असण्याची शक्यता सुद्धा आहे. हा काळ विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. असे असले तरी त्यांना आत्मविश्वासाचा अभाव जाणवेल. लहान भावंडांशी संबंध सुधारले तरी मोठ्या भावंडांशी संबंधात तितकीशी सुधारणा होऊ शकणार नाही. लहान अविवाहित भावंडांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रा किंवा धार्मिक प्रवृत्तींसाठी हा काळ अनुकूल आहे. 

सूर्य ग्रहणा दरम्यान करावयाचे उपाय:-आत्मविश्वासाचा अभाव दूर करण्यासाठी सूर्य देवास अर्घ्य द्यावा. सूर्य ग्रहणाच्या समाप्ती नंतर सूर्याशी संबंधित वस्तू जशा कि गहू, लाल मसूर, तांबे इत्यादींचे दान करावे. 

वृश्चिक रास -

हे सूर्य ग्रहण आरोग्याच्या दृष्टीने आपणास मध्यम फलदायी ठरू शकते. व्यापाराशी संबंधित कोणत्याही महत्वाच्या दस्तावेजावर विचारपूर्वक स्वाक्षरी करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. सूर्य ग्रहणाच्या समाप्ती नंतर संपत्तीतील गुंतवणुकीतून मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आपणास जर नवीन गुंतवणूक करावयाची असेल तर त्यात आपण यशस्वी होऊ शकाल. संपत्तीशी संबंधित बाबीत ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होण्याची संभावना आहे. आपणास खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आपण जर भागीदारीत एखादा व्यवसाय करत असाल तर आपल्या पदरी निराशाच येईल. भागीदारीत मतभेद संभवतात. व्यवसायात आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. त्याच बरोबर बाजारातील संभाव्य नामुष्की टाळण्यासाठी उसने पैसे घेऊ नये. आपण जर शेअर्स बाजारात गुंतवणूक केली असेल तर त्यातून लाभ होण्याची शक्यता कमीच आहे. सूर्य ग्रहणा नंतर आपणास संततीची काळजी सतावत राहील. संतती इच्छुक जोडप्याना थोडी वाट पाहावी लागू शकते. हा काळ आपल्या संततीसाठी प्रतिकूल आहे. सूर्य ग्रहणा दरम्यान आपणास वैवाहिक जीवनात समजूतदारपणा दाखवावा लागेल. स्त्री किंवा स्त्री मित्रांशी संबंधित नुकसान होण्याची शक्यता आहे. 

सूर्य ग्रहणा दरम्यान करावयाचे उपाय:-सूर्य ग्रहणा दरम्यान भगवान श्रीगणेश किंवा भगवान श्रीविष्णू ह्यांची पूजा करावी. वैवाहिक सामंजस्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पठन करावे. व्यापाराशी संबंधित समस्यांच्या निवारणासाठी सूर्याशी संबंधित वस्तूंचे  दान करावे. सूर्य ग्रहणाच्या समाप्ती नंतर सौभाग्यासाठी शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करावा. 

धनु रास -

हे ग्रहण आपणास शत्रूंवर नियंत्रण मिळविण्यास व आपल्या सुख - समृद्धीत वाढ करण्याची अनुमती देत आहे. हा काळ आरोग्याच्या दृष्टीने आपणास अनुकूल आहे. असे असले तरी सूर्य व राहुमुळे आपणास आरोग्य विषयक नवीन त्रास होण्याची शक्यता आहे. माता - पित्याच्या आरोग्याची विशेष काळजी आपणास घ्यावी लागेल. आपले लहान भावंड जर अविवाहित असेल तर त्यास योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आपणास आपल्या मुलांची काळजी वाटू शकते. आपली मुले जर शिकत असली तर त्यांना अभ्यासासाठी आवश्यक वेळ मिळू शकतो. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. जे जातक विवाहित आहेत त्यांच्या वैवाहिक जीवनात जवळीक निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या जातकांच्या कार्यभारात वाढ संभवते. ह्या वाढीमुळे त्यांच्यावर दबाव येऊ शकतो. कोर्ट - कचेरी पासून दूर राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. ह्याच बरोबर वाहन जपून चालवण्याचा सल्ला सुद्धा देण्यात येत आहे. मित्रांशी मध्यम स्वरूपाचे संबंध राहण्याची शक्यता आहे. 

सूर्य ग्रहणा दरम्यान करावयाचे उपाय:-सूर्यास कुंकू मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावा. चंद्राशी संबंधित वस्तूंचे दान करावे. सूर्य ग्रहणा दरम्यान गायत्री मंत्र व शिव पंचाक्षर मंत्राचा सतत जप करावा. 

मकर रास -

१० जून रोजी होणाऱ्या ह्या सूर्य ग्रहणामुळे आपण आपल्या पाल्याच्या शिक्षणा विषयी चिंतीत होण्याची शक्यता आहे. आपण स्वतःच्या व्यतिरिक्त आपल्या लहान भावंडांच्या विवाहाच्या बाबतीत सुद्धा चिंतीत होण्याची संभावना आहे. ह्या दरम्यान आपल्या वैवाहिक जीवनात एखादी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रसंगी मौन राहून वाद वाढणार नाही ह्याची काळजी आपणास घ्यावी लागेल. सूर्य ग्रहणामुळे मित्रांशी सुद्धा आपले मतभेद होण्याची संभावना आहे. ह्या दरम्यान नवीन उपक्रमात विलंब होण्याची शक्यता सुद्धा आहे. कोणत्याही कायदेशीर कागदपत्रावर विचारपूर्वक स्वाक्षरी करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत असण्याची शक्यता आहे. आपण आर्थिक चणचण दूर करण्यास समर्थ असाल. हे नोकरी - व्यवसायात अधिक उपयुक्त ठरेल. हा काळ शिक्षणासाठी विशेष योग्य नाही. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी नोकरीत उत्तम संधी किंवा पगारवाढ संभवते. आपण आपल्या संपत्तीचे नूतनीकरण करू शकाल. व्यवसायाच्या स्थानात परिवर्तन होऊ शकते, मात्र प्रगती संथ गतीनेच होईल. 

सूर्य ग्रहणा दरम्यान करावयाचे उपाय:-चंद्र, सूर्य व राहुशी संबंधित वस्तूंचे दान करावे. लक्ष्मीनारायण मंत्राचा जप करावा. सूर्य ग्रहण समाप्ती नंतर शनीशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने आपणास शुभ फल प्राप्त होऊ शकते.

कुंभ रास -

सूर्य ग्रहण असता आपणास आरोग्य विषयक फायदा होण्याची संभावना सुद्धा आहे. एखाद्या असाध्य आजारातून आपणास मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. आपणास आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागू शकते. मातेची प्रकृती आपणास चिंतीत करू शकेल. मित्रांशी संबंध सुधारू शकतील. आपले मोठे भावंड जर अविवाहित असेल तर त्यांचा विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे. जुनी संपत्ती विकण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सूर्य ग्रहणा पासून पुढील एक आठवडा गुंतवणुकीसाठी प्रतिकूल आहे. संपत्तीच्या वादामुळे आपल्या तणावात व नैराश्यात वाढ होऊ शकते. असे असले तरी विलंब होऊन सुद्धा आपली सर्व कामे पूर्ण होऊ शकतील. नोकरीत व व्यापारात आपल्यावर कामाचा अतिरिक्त भार पडू शकतो. स्थान परिवर्तन संभवते. नवीन योजना आखू शकाल. आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत होऊ शकता. हा काळ मुलांच्या अध्ययनासाठी अनुकूल आहे. विवाहेच्छुकांसाठी हा काळ फलदायी होऊ शकतो. आपण सामाजिक प्रवृत्तीत सहभागी होण्यास समर्थ असाल. प्रवासाची संधी मिळू शकते. मित्रांशी संबंधात सुधारणा होऊ शकेल. आपले मोठे भावंड जर अविवाहित असेल तर त्याचा विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे. 

सूर्य ग्रहणा दरम्यान करावयाचे उपाय:-ग्रहण असता गायत्री मंत्राचा जप करावा. सूर्य ग्रहणा नंतर सूर्य व शनीशी संबंधित वस्तूंचे दान केल्यास आपल्यासाठी ते फायदेशीर ठरेल. 

मीन रास -

मीन राशीच्या जातकांसाठी सूर्य ग्रहण असता धन लाभ व यशाची संभावना वाढू शकते. संपत्तीशी संबंधित समस्यांचे निराकरण होऊ शकते. नवीन संपत्तीचे मालक होण्याची संभावना वाढू शकते. आपण घर, वाहन किंवा घरगुती सजावटीच्या वस्तू ह्यात गुंतवणूक करू शकाल. नवीन उद्योग स्थापन करण्यातील अडचणी संपुष्टात येण्याच्या आशा मावळतील. कोणत्याही कायदेशीर कागदपत्रावर विचारपूर्वकच स्वाक्षरी करावी. आपणास आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. माता - पित्याच्या प्रकृतीत चढ - उतार संभवतात. ह्या सूर्य ग्रहणाच्या प्रभावामुळे आपण पोटाच्या तक्रारी, तणाव व त्वचा विकाराने पीडित होऊ शकता. लहान भावंडांसाठी हा काळ प्रतिकूल आहे. त्यांच्या विवाहाशी संबंधित कार्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर ते विवाहित असले तर त्यांच्या वैवाहिक जीवनात चढ - उतार येण्याची संभावना आहे. शेजाऱ्यांशी संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. हा काळ अध्ययनासाठी मध्यम आहे. ह्या दरम्यान आपण एखादी धार्मिक यात्रा करण्याची शक्यता आहे. मित्रांशी संबंध मध्यम स्वरूपाचे राहतील. 

सूर्य ग्रहणा दरम्यान करावयाचे उपाय:-ग्रहण काळ असता श्रीगणेश व सूर्याचे पूजन करावे. ग्रहण समाप्ती नंतर भगवान श्रीशंकराच्या मंदिरात नेवेद्य दाखवावा. त्याच बरोबर ग्रहणाचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी सूर्य, चंद्र व राहुशी संबंधित वस्तूंचे दान करावे. 

एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम