रवी गोचर २०१९: रवीच्या वृषभ राशीतील गोचरीचा १२ राशींवर होणारा प्रभाव: जाणून घ्या आपली स्थिती


रवी हा ब्रह्माण्डातील एक जिवंत ग्रह म्हणून समजण्यात येतो व त्याचे राशी परिवर्तन हि एक मोठी घटना असल्याचे ज्योतिषशास्त्रात मानण्यात येते. रवीच्या राशी परिवर्तनास संक्रात ह्या नावाने संबोधण्यात येते. १५ मे रोजी ११. १८ ला वृषभ राशीत येणाऱ्या रवीच्या गोचरीस वृषभ संक्रांत ह्या नावाने ओळखण्यात येते. येथे आपण हे जाणून घेऊ कि वृषभेतून होणाऱ्या रवीच्या गोचरीचे विभिन्न राशीच्या लोकांवर काय परिणाम होईल तो .......!   
मेष रास
रवीचे परिवर्तन आपल्या धनस्थानातून होत असल्याने ते आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. मात्र, आपणास आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपल्यासाठी धन प्राप्ती योग होत आहे. कारकिर्दीच्या क्षेत्रात उन्नती होण्याची शक्यता आहे. शेक्षणिक क्षेत्रात उत्तम यश प्राप्ती होऊ शकेल. व्यक्तिगत जीवन सुखद होईल. प्रकृती सामान्य राहील. मात्र, वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 
वृषभ रास 
रवीचे भ्रमण आपल्याच राशीतून होत असल्याने त्याचा आपल्यावर प्रभाव होताना जास्त प्रमाणात दिसून येईल. ह्या दरम्यान आपल्या रागावर नियंत्रण ठेवल्यास लाभ  होतील. आपला आत्मविश्वास वाढेल. आजारपणाची शक्यता असल्याने आपणास प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी लागेल. कार्यालयीन कामा व्यतिरिक्त कृषी किंवा मार्केटिंगशी संबंधित व्यक्तींना अनुकूलता लाभेल. 
मिथुन रास 
रवीचे भ्रमण आपल्या व्यय स्थानातून होत असल्याने आपली धन हानी होण्याचे संकेत मिळत आहेत. पैसे विचारपूर्वक खर्च करावेत. विदेश गमन सुद्धा होऊ शकते. मात्र,  कायदेशीर बाबतीत निर्णय आपल्या बाजूने होण्याची शक्यता आहे. भावंडाना सुद्धा कारकिर्दीत योग्य दिशा व गती मिळू शकेल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 
कर्क रास 
रवीचे लाभस्थानातून होणारे भ्रमण उत्तम फलदायी ठरू शकेल. आपणास अनेक सुवर्ण संधी लाभतील. आर्थिक लाभ झाल्याने मन प्रसन्न होईल. आपल्या मान - सन्मानात सुद्धा वाढ होईल. ह्या दरम्यान नवीन व्यवसायाची किंवा नोकरीची सुरवात करण्याची संधी मिळू शकते. कार्यक्षेत्री वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. पैतृक संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. संबंधात सुधारणा होईल व भागीदारांचे सहकार्य मिळू शकेल. एकंदरीत हे दिवस आपल्यासाठी उत्तम आहेत. 
सिंह रास 
रवीचे आपल्या कर्मस्थानातून होणारे भ्रमण उन्नतीचे संकेत देत आहे. ह्या दरम्यान आपल्यात भरपूर आत्मविश्वास येईल. ह्या दरम्यान आपणास अप्रत्यक्ष लाभ मिळू शकतात. वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. नोकरीत बदल करण्याची इच्छा असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकेल. नोकरीत पदोन्नती संभवते. व्यवसाय वृद्धीसाठी दिवस अनुकूल आहेत. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रकृती सामान्य राहील. मात्र, मातेच्या प्रकृतीमुळे काळजी वाटण्याची शक्यता आहे. 
कन्या रास 
रवीचे भ्रमण आपल्या भाग्यातून होत असल्याने भाग्योन्नतीचे संकेत मिळत आहेत. मात्र, बारीक - सारीक शारीरिक तक्रारी निर्माण होऊ शकतात. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पैतृक संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपण कौटुंबिक प्रतिष्ठेसाठी काहीही करण्यास तत्पर राहाल. ह्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे अवैध कार्य करू नका, अन्यथा मानहानी होण्याची शक्यता आहे. 
तूळ रास 
हे राशी परिवर्तन आपल्यासाठी शुभ फलदायी नाही. अचानकपणे धनहानी होऊ शकते. मात्र, एखादा अप्रत्यक्ष लाभ सुद्धा होऊ शकतो. वैवाहिक जोडीदाराशी कटुता निर्माण होऊ शकते. मोठ्या भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. अष्टमातून होणाऱ्या रवीच्या भ्रमणामुळे कार्यात अपयश येईल किंवा विलंबाने यश प्राप्ती होईल. ह्या दरम्यान नवीन कामाची सुरवात न करणे हितावह राहील. 
वृश्चिक रास 
सप्तमातून होणारे रवीचे भ्रमण आपणास प्रणयी जीवनात अतिशय सावध राहण्याचे संकेत देत आहे. वडील किंवा वैवाहिक जोडीदाराशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जोडीदाराच्या भावनांचा आदर करा व त्यांच्यावर विश्वास ठेवा. मात्र, कार्य व व्यापार ह्यात उत्तम परिणाम मिळू शकतील. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. समाजात सुद्धा मान - सन्मानात वाढ होईल. 
धनु रास 
षष्ठातून होणारे रवीचे भ्रमण मिश्र फलदायी होऊ शकते. ह्या दरम्यान आपणास नशिबाची साथ मिळणार नाही. कष्ट करून सुद्धा यशप्राप्ती होण्यात विलंब होईल. त्यामुळे आपल्यात नैराश्य येईल. देवाण - घेवाण करताना सतर्क राहा. अनावश्यक धन खर्च होऊ शकतो. कोर्ट - कचेरीच्या बाबतीत वातावरण आपणास अनुकूल होऊ शकेल. ह्या दरम्यान आपणास कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. 
मकर रास 
पंचमातून होणारे रवीचे भ्रमण आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. गर्भवती महिलांच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात विलंबाने यश प्राप्ती होईल. वैवाहिक जोडीदाराशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कार्यात पूर्ण निष्ठेने काम केल्यास आपणास यश प्राप्त होऊ शकेल. 
कुंभ रास 
रवीचे भ्रमण आपल्या सुख स्थानातून होत आहे, जे गृह सौख्यासाठी उत्तम ठरेल. सुख - सुविधेत वाढ होईल. मात्र, मातेच्या प्रकृती संबंधी चिंतेत वाढ होऊ शकते. आर्थिक बाबतीत यश प्राप्ती होऊन नवीन संधी उपलब्ध होईल. सरकारी क्षेत्रात कार्य करणार्यांना सुद्धा नवीन संधी प्राप्त होतील. भागीदारी व्यवसायात फायदा होईल. 
मीन रास 
रवीच्या राशी परिवर्तनामुळे आपल्या पराक्रमात वाढ होईल. मोठ्या भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. विचार सुद्धा आक्रमक होतील. व्यावसायिक जीवन सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सुद्धा काही यश प्राप्ती होईल. मित्रांचे सुद्धा सहकार्य लाभेल, मात्र नोकरांपासून सावध राहावे लागेल. गोचरीच्या प्रभावाने आपल्या वडिलांना लाभ होईल. ह्या दरम्यान आपणास आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. 

गणेशजींच्या आशीर्वादांसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी 
(एस्ट्रो लोकमत डॉट कॉम)