मिथुन संक्रांति २०१९: रवीचा मिथुन राशीत प्रवेश व त्याचा सर्व राशींवर होणारा परिणाम

रवी हा दरमहा राशी परिवर्तन करत असतो. रवीचे हे राशी परिवर्तन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मानवी जीवनावर परिणाम करत असते. १५ जून २०१९ रोजी रवी, वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करील. ह्यास मिथुन संक्रांत असे हि संबोधण्यात येते. रवी येथे १५ जुलै २०१९ पर्यंत वास्तव्यास आहे. ह्याचा सर्व राशींवर काय परिणाम होईल हे आपण जाणून घेऊ. :-

मेष 
ह्या दरम्यान आपल्या पराक्रमात वाढ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील लहान भावंडांशी आपला वाद होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संवाद साधताना सावध राहावे. ह्या दरम्यान आपण कोणतेही काम घाईघाईने करू नये. छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी वाद होऊन त्यात आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. 
वृषभ 
ह्या दरम्यान वाहन, स्थावर इत्यादींची प्राप्ती होणे संभवते. मातेशी संबंध सुधारतील. नियमितपणे होणाऱ्या प्राप्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपल्या वाणीने लोक प्रभावित होतील. नेतृत्वास साजेशी वाणी राहील. 
मिथुन 
आपल्या राशीतच रवी प्रवेश करत आहे. ह्या दरम्यान आपल्यात एक ऊर्जा निर्माण होत असल्याचे जाणवेल. प्रकृती उत्तम राहील. वैवाहिक जोडीदार व व्यावसायिक भागीदार ह्यांचे सहकार्य लाभेल. ह्या दरम्यान आपण एखादा नवीन व्यवसाय सुरु करू शकाल. मात्र, ह्या दरम्यान आपला क्रोध वाढीस लागल्याचे दिसून येईल. 
कर्क 
ह्या दरम्यान परदेश गमन होऊ शकते. मात्र, आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. हृदय व मणक्यांचे विकार होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक प्रगती होऊ शकेल. ह्या दरम्यान प्राप्तीपेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त राहील. विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. 
सिंह 
शुभ कार्याच्या सुरवातीसाठी अनुकूलता लाभेल. यश व कीर्ती ह्यांची प्राप्ती होईल. धनलाभ संभवतो. प्रेमात यशस्वी होता येईल. कोर्ट - कचेरीच्या कामात यशस्वी होऊ शकाल. प्रलंबित कामे पूर्णत्वास येतील. ह्या दरम्यान आपल्या मनोकामना पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सुवर्ण संधी लाभेल. 
कन्या 
हा कालखंड व्यापारासाठी उत्तम आहे. सामाजिक मान - सन्मान व पद - प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती व पगारवाढ संभवते. वडिलांकडून आर्थिक लाभ होऊ शकेल. कार्यक्षेत्री वरिष्ठांकडून आपण सन्मानित होऊ शकाल. सहकाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध राहतील. एखादे पद मिळण्याची शक्यता आहे. 
तूळ
ह्या दरम्यान नशिबाची साथ लाभेल. धार्मिक स्थळी प्रवासास जाऊ शकाल. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याच्या प्रयत्नात यशस्वी होता येईल. वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आपणास जरी नशिबाची साथ मिळणार असली तरी त्याच्यावर अवलंबून राहू नये. 
वृश्चिक 
आपणास अत्यंत सावध राहावे लागेल. आपला रक्तदाब असामान्य होण्याची शक्यता आहे. शत्रूंचा त्रास संभवत असला तरी आपण त्यांच्यावर मात करू शकाल. ह्या दरम्यान आपणास धीर धरावा लागेल. कोर्ट - कचेरीच्या कामात त्रास होण्याची शक्यता आहे. 
धनु 
ह्या दरम्यान विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. भागीदार किंवा वैवाहिक जोडीदार ह्यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहतील. आपणास लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल.आपण केलेल्या परिश्रमाचे अपेक्षित फल प्राप्त होईल. आपल्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावू शकाल. कोर्ट - कचेरीच्या कामात यशस्वी होता येईल. 
मकर 
नोकरीत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्यावर असलेल्या कामाच्या भारामुळे आपणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान हृदयरोग असणाऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी कामा संबंधी संवाद साधताना खूप सावध राहावे लागेल. शत्रुभय संभवते. 
कुंभ 
प्रेम संबंध यशस्वी होतील. रुसवा घालवण्यासाठी आपणास विशेष प्रयत्न करावे लागतील. संतती प्राप्तीसाठी अनुकूलता लाभेल. संततीच्या कामगिरीमुळे आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. दीर्घ काळापासून आजारी असणाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल. शेअर्स बाजारातून लाभ होण्याची शक्यता आहे. 
मीन
मातेशी संबंध सुधारतील. दीर्घ काळापासून वाहन किंवा घर खरेदीचा प्रयत्न करत असल्यास ह्या दरम्यान त्यात यशस्वी होता येईल. पैतृक संपत्तीतून आपणास लाभ होऊ शकेल. नोकरीत सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह
आचार्य धर्माधिकारी ह्यांच्यासह आचार्य कृष्णमूर्ती 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम