सूर्यास लागेल ग्रहण, तिथी, वेळ व ग्रहणाशी संबंधित धार्मिक नियमांची माहिती करून घ्या

२१ जून २०२० रोजी होणाऱ्या सूर्य ग्रहणास धार्मिक दृष्ट्या एक अनन्य साधारण महत्व आहे. हे सूर्य ग्रहण, चंद्र ग्रहणाच्या बरोबर १६ व्या दिवशी होत असून ह्या दरम्यान ग्रहण विषयक काही धार्मिक नियम पाळावे लागतील, ज्याचा अवधी ग्रहण लागण्याच्या १२ तासांपूर्वी पासून सुरु होईल. २१ जून रोजी होणारे सूर्य ग्रहण कंकणाकृती असणार आहे. जेव्हा चंद्र पूर्णपणे सूर्यास झाकत नसून ग्रहण होत असते तेव्हा त्या अवस्थेस कंकणाकृती ग्रहण असे संबोधले जाते. ह्याचा अर्थ असा कि चंद्र हा सूर्यास अशा प्रकारे झाकून ठेवतो कि सूर्याचा निव्वळ मध्य भागच छाया क्षेत्रात येतो व आपण जेव्हा पृथ्वी वरून बघतो तेव्हा सूर्य पूर्णपणे झाकोळलेला दिसत नसून सूर्याची बाहेरील किनार प्रकाशित असलेली दिसते, ज्याचा आकार कंकणाकृती असतो. 

सूर्य ग्रहण म्हणजे काय ?
ॐ ह्या ध्वनीतून निघणाऱ्या कंपनांमुळे ह्या विशाल ब्रह्माण्डात दररोज अनेक रोमांचकारी घटना घडत असतात. त्यातीलच एक घटना म्हणजे सूर्य ग्रहण जे प्राचीन काळापासूनच मानवास आपल्याकडे आकर्षित करत आली आहे. सामान्यपणे आपल्या कक्षेत भ्रमण करत असताना जेव्हा पृथ्वी व सूर्य ह्यांच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा त्या खगोलीय घटनेस सूर्य ग्रहण असे संबोधले जाते. ह्यात महत्वाचे हे आहे कि पृथ्वी सूर्या भोवती तर चंद्र पृथ्वी भोवती भ्रमण करत असतो. अशी प्रक्रिया होत असताना कधी कधी चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो. चंद्राच्या मागे सूर्य लपल्याने त्याचा प्रकाश मंदावतो व त्यामुळे पृथ्वीवर सावली पडते. ह्या घटनेस सूर्य ग्रहण असे संबोधले जाते. 

सूर्य ग्रहणाची वेळ व धार्मिक नियम 
२१ जून २०२० रोजी वर्षातील पहिले सूर्य ग्रहण होत आहे. हे सूर्य ग्रहण भारता सहित काँगो, मध्य आफ्रिका, पाकिस्तान, इथियोपिया व चीन, आफ्रिकेच्या काही भागातून दिसणार आहे. सूर्य ग्रहणाचा कालावधी सकाळी १० वाजून ०१ मिनिटास सुरु होऊन दुपारी ०१ वाजून २८ मिनिटां पर्यंतचा आहे. ह्या वर्षी सूर्य ग्रहण हे रविवारी होत आहे. त्यामुळे शनिवारी २० जूनच्या रात्री १० वाजून ०१ मिनिटां पासून वेध काळ सुरु होईल.  

ग्रहण काळ 
ग्रहण प्रारंभ - सकाळी १० वाजून ०१ मिनिटे. 
ग्रहण मध्य - दुपारी ११ वाजून ३८ मिनिटे 
ग्रहण समाप्ती - दुपारी ०१ वाजून २८ मिनिटे 
सूर्य ग्रहणाचा एकूण कालावधी - ३ तास २७ मिनिटे  

धार्मिक नियमांची वेळ
वेधारंभ - २० जून २०२० च्या रात्री १० वाजून ०१ मिनिटे 
वेध समाप्ती - २१ जून २०२० च्या दुपारी ०१ वाजून २८ मिनिटे 
मुले, वृद्ध, गर्भवती स्त्रिया व आजारी व्यक्तींसाठी धार्मिक नियमांची वेळ 
प्रारंभ - पहाटे ०४ वाजून ४५ मिनिटे 
समाप्ती - दुपारी ०१ वाजून २८ मिनिटे 

ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे 
ग्रहणाशी संबंधित सनातन धर्मात विविध प्रकारच्या मान्यता आहेत. जसे कि ग्रहणाच्या दिवशी लोक घरी राहणे पसंत करतात व ग्रहणकाळा दरम्यान निर्जळी उपास करतात. ह्या व्यतिरिक्त दर्भ किंवा तुळशीच्या पानांना खाण्या - पिण्याच्या वस्तूत ठेवण्यात येते, कि ज्यामुळे ग्रहणाच्या दुष्परिणामां पासून रक्षण करता यावे. काही भागात ग्रहण समाप्ती नंतर लोक स्नान करतात. ग्रहणा दरम्यान सूर्याच्या उपासनेचे  सुद्धा महत्व आहे. 

मिथुन राशीतून होईल ग्रहण 
२१ जून २०२० राजी होणारे सूर्य ग्रहण काही बाबतीत महत्वाचे ठरणारे आहे. हे सूर्य ग्रहण मिथुन राशीतून होणार आहे. ज्या वेळेस मिथुन राशीस सूर्य ग्रहण लागेल त्यावेळेस सूर्य हा बुध व राहूच्या युतीत असेल. त्याच वेळेस सूर्य ग्रहणाच्या दिवशी ६ ग्रह वक्री असणार आहेत. ज्योतिषाचार्यांच्या म्हणण्या अनुसार ह्या स्थितीस शुभ मानण्यात येत नाही. असे असले तरी काही तज्ञ ज्योतिषांच्या मतानुसार हे ग्रहण कंकणाकृती असल्याने संसर्गजन्य आजारांचा फैलाव नियंत्रित करण्यास मदतरूप ठरेल व आगामी काळात अशा आजारांचा प्रकोप मंदावू शकेल. असे असले तरी इतर सर्व बाबीत ग्रहण अनिष्ट असल्याचेच दिसत आहे. 

मनोरंजक तथ्य 
चंद्र ग्रहण व सूर्य ग्रहणाशी एक मनोरंजक तथ्य असे आहे कि सूर्य ग्रहण व चंद्र ग्रहण हे विशिष्ट परिस्थितीतच होत असतात. सूर्य ग्रहण हे नेहमी अमावास्येस तर चंद्र ग्रहण हे नेहमी पोर्णिमेस होत असते. पौर्णिमा व अमावास्या चंद्राच्या कक्षेत १८० अंशाच्या विरुद्ध कोनात होणाऱ्या घटना आहेत. 


गणेशजींच्या कृपेने, 
ऍस्ट्रो लोकमत डॉट कॉम