असत्यावर सत्याच्या विजयाचा उत्सव म्हणजेच दसरा


नवरात्री पर्यंत माता जगदंबेची आराधना केल्यावर पूर्णाहुतीच्या रूपात दसरा हा सण साजरा केला जातो. प्राचीन लोकप्रथेनुसार माता जगदंबा व महिषासुर राक्षस ह्यांच्या दरम्यान आश्विन शुक्ल प्रतिपदे पासून आश्विन शुक्ल दशमी पर्यंत तुंबळ युद्ध झाले होते, व त्यात दशमीच्या दिवशी माता जगदंबेने महिषासुराचा वध करून त्यावर विजय प्राप्त केला होता. अन्य एका आख्यायिकेनुसार सीतामातेच्या मुक्तीसाठी प्रभू श्रीरामाने रावणाशी युद्ध केले होते व आश्विन शुक्ल दशमीच्या दिवशी रावणाचा वध करून सीतामातेस मुक्त केले होते. रावणावर प्रभू श्रीरामाने मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून उत्तर भारता सहित विविध प्रदेशात आश्विन शुक्ल प्रतिपदे पासून आश्विन शुक्ल दशमी पर्यंत रामलीलेचा फड रंगविण्यात येतो व दशमीच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून श्रीरामाचा विजय तसेच आसुरी शक्तींवर दैवी शक्तीचा विजय साजरा केला जातो. म्हणून ह्या दिवसास असत्यावर सत्याच्या किंवा आसुरी शक्तींवर दैवी शक्तीच्या विजयाचा सण असे संबोधले जाते. हा सण दसरा किंवा विजया दशमी ह्या नावाने ओळखला जातो. ह्या दिवशी माता जगदंबेची विशेष आराधना व यज्ञ करण्याचे प्रयोजन आहे. 

शमी पूजनास सुद्धा असते महत्व 
ह्या दिवशी शमी पूजन करण्यास सुद्धा विशेष महत्व आहे. एका आख्यायिकेनुसार विश्वामित्र ऋषींचा कौत्स नामक शिष्य गुरुदक्षिणेसाठी धन आणावयास रघुराजाकडे गेला होता. रघुराजाने विश्वजित यज्ञासाठी स्वतःकडील सर्व संपत्ती दान केली होती व ते  स्वतः अत्यंत साधेपणाने राहात होते. ते मातीच्या भांड्यात भोजन घेत असत. अशा परिस्थितीत धनाच्या अपेक्षेने आलेल्या कौत्सास रिकाम्या हाती पाठवायला लागू नये म्हणून रघुराजाने दसऱ्याच्या दिवशी कुबेराशी युद्ध करून त्यांना पराभूत केले व शमीच्या वृक्षावर चौदा कोटी सोन्याच्या मोहऱ्यांचा वर्षाव केला. कौत्साने ह्या सोन्याच्या मोहरा आपल्या गुरूंना अर्पण केल्या. कौत्साच्या गुरूंनी हे धन गरीब व गरजवंतांना देऊन टाकले. तेव्हा पासून शमी वृक्षाच्या पूजेची प्रथा सुरु झाल्याचे मानण्यात येते. 

मुहूर्त बघावा लागत नाही 
ह्या दिवशी मुहूर्त बघावा लागत नाही, म्हणजेच शुभ कार्याची सुरवात करण्यास किंवा नवीन खरेदी करण्यास ह्या दिवशी मुहूर्त बघण्याची आवश्यकता नाही. ह्या दिवशी केलेले कार्य किंवा सुरवात ह्यात उत्तम फळ मिळते. 

शस्त्र पूजेचा दिवस 
दसरा ह्या सणास असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येत असल्याने विशेषतः क्षत्रिय लोक ह्या दिवशी शस्त्र पूजन करतात. ह्या व्यतिरिक्त काही प्रदेशात शौर्याशी संबंधित स्पर्धा व खेळांचे सुद्धा आयोजन करण्यात येते. 
गणेशजींचा आशीर्वादांसह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम