श्रीरामचरित मानस ह्यातील चौपाही व दोह्यांपासून होणारे लाभ

मनोकामनापूर्तीसाठी श्रीरामचरित मानस ह्यातील चौपाही व दोहे ह्यांचा जप करा

गोस्वामी श्रीतुलसीदास रचित श्रीरामचरित मानस हा एक आदर्श ग्रंथ आहे. श्रीरामचरित मानसाच्या नित्य पठनाने मानसिक शांतता लाभण्या व्यतिरिक्त सर्व बाधांचा सुद्धा नाश होतो. श्रीरामचरित मानस ह्या बद्धल बोलत असता ह्यात राम ह्या   शब्दाचा १४४३ व सीता ह्या शब्दाचा १४७ वेळा वापर करण्यात आला आहे. ह्यात श्लोकांची संख्या २७, चौपाहींची संख्या ४६०८ दोह्यांची संख्या १०७४, सोरठ्याची  संख्या २०७ व छंद ८६ आहेत. श्रीरामचरित मानस ह्यातील चौपाहीच्या जपाने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. श्रीरामनवमीच्या पवित्र दिवशी अशा काही चौपाहींचा जप करून जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळू शकते. 

निरनिराळ्या मनोकामनेसाठी निरनिराळ्या चौपाही 
तसे पाहता श्रीरामचरित मानस ह्यातील चौपाहींचे पठन केव्हाही केले तरी चालते, परंतु नवरात्रीत त्यास विशेष महत्व आहे. श्रीरामनवमीच्या दिवशी ह्यातील चौपाही व दोह्यांचे पठन केल्याने इच्छापूर्ती होते. सर्व संकटे व त्रास दूर होतात. येथे आपण अशाच काही दोहे व चौपाहीं ह्यांचा विचार करू ज्यांच्या जपाने बराच लाभ होऊ शकतो. 

१. मनोकामनापूर्ती व सर्व बाधा निवारणासाठी 
कवन सो काज कठिन जग माही।
जो नहीं होइ तात तुम पाहीं।।

२. विवाहासाठी 
तब जनक पाई वसिष्ठ अायसु ब्याह साज संवारि कै।
मांडवी श्रुतकी रति उरमिला कुंअरी लई हंकारी कै।।

३. भीती व संशय निराकरणासाठी 
रामकथा सुन्दर कर तारी।
संशय बिहग उड़व निहारी।।

४. अनोळखी ठिकाणी भीती दूर करण्यासाठी ह्या मंत्राच्या जपाने रक्षा कवच निर्माण होते 
मामभिरक्षय रघुकुल नायक।
धृतवर चाप रुचिर कर सायक।।

५. विपत्ती नाशासाठी 
राजीव नयन धरें धनु सायक।
भगत बिपति भंजन सुखदायक।।

६. रोग व उपद्रव निवारणासाठी 
दैहिक दैविक भौतिक तापा।
राम राज नहिं काहुहिं ब्यापा।।

७. अकाली मृत्यू टाळण्यासाठी 
नाम पाहरु दिवस निसि ध्यान तुम्हार कपाट।
लोचन निज पद जंत्रित जाहिं प्रान केहि बाट।।

८. चरितार्थ प्राप्ती किंवा वृद्धीसाठी 
विस्व भरन पोषन कर जोई।
ताकर नाम भरत अस होई।।

९. विद्या प्राप्तीसाठी 
गुरु गृह गए पढ़न रघुराई।
अल्पकाल विद्या सब आई।।

१०. संपत्ती प्राप्तीसाठी 
जे सकाम नर सुनहिं जे गावहिं।
सुख संपत्ति नानाविधि पावहिं।।

११. शत्रू नाशासाठी 
बयरू न कर काहू सन कोई।
रामप्रताप विषमता खोई।।

१२. रामायणातील सर्वात मोठा मंत्र 
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥

ह्या मंत्रास हृदयात ठेवल्याने जगातील सर्व अमूल्य गोष्टी आपणास प्राप्त होतील. कोणत्याही प्रकारची भीती, दारिद्रय, अपमान इत्यादी सहन करावे लागणार नाही. 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम