श्रावण महिन्या पासून १६ सोमवारचे महत्व व पूजा विधी

श्रावण महिन्यास सर्वात पवित्र महिना समजण्यात येते, कारण ह्या महिन्यात भगवान श्रीशंकराची पूजा - अर्चा ह्यास विशेष असे महत्व आहे. इंग्रजी कालगणनेनुसार हा महिना साधारणतः जुलै - ऑगस्ट महिन्या दरम्यान येत असतो. ह्या वर्षी तो १ ऑगस्ट २०१९ पासून सुरु होत आहे. 

श्रावण महिन्यातील सोमवार 
ह्या पवित्र महिन्यात भक्तजन दोन प्रकारे सोमवार करतात. 
- श्रावणी सोमवार :- ह्या दिवशी करण्यात येणारा उपास हा श्रावणी सोमवार ह्या नावाने ओळखला जातो. सोमवार हा दिवस भगवान श्रीशंकरास समर्पित आहे. 
- सोळा सोमवारचे उपास :-श्रावण हा पवित्र महिना असल्याने १६ सोमवारचे उपास सुरु करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ समजण्यात येतो.
 
श्रावण महिन्याचे १६ सोमवार 
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार पासून सुरवात करून सलग १६ सोमवार हा उपास करण्यात येतो. ह्यास १६ सोमवारचा उपास असे संबोधले जाते. 
श्रावण सोमवारचा उपास हा भगवान श्रीशंकरास अतिशय प्रिय असल्याने त्याला सर्वाधिक  महत्व प्राप्त होते. श्रावण महिन्यात सोमवारचा उपास करण्याची परंपरा आहे. ह्या महिन्यात बिल्वपत्राने भगवान श्रीशंकराचे पूजन व पाण्याचा अभिषेक अत्यंत फलदायी ठरते अशी एक मान्यता आहे. 

जेव्हा भक्त सोमवारचा उपास करतो तेव्हा भगवान श्रीशंकर त्याच्या सर्व ईच्छा पूर्ण करतात. ह्या महिन्यात ज्योतिर्लिंग दर्शनासाठी लाखो भाविक हरद्वार, उज्जैन, नाशिक इत्यादी सहित अनेक धार्मिक स्थळी जात असतात. 
श्रावण महिन्यात पावसाळा असल्याने संपूर्ण पृथ्वी हिरवीगार होते. महाराष्ट्र, गोवा व गुजरात येथे श्रावण पौर्णिमा हि नारळी पौर्णिमा ह्या नावाने साजरी करण्यात येते. 

श्रावण महिन्यातील व्रत व पूजा विधी 
- सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. 
- पूजेची जागा शुद्ध करावी. 
- शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करण्यासाठी शंकराच्या मंदिरात जावे. 
- नंतर श्रद्धा पूर्वक ह्या व्रताचा संकल्प करावा. 
- सकाळ - संध्याकाळ भगवान श्रीशंकर ह्यांची प्रार्थना करावी. 
- पूजेसाठी तिळाच्या तेलाचा दीपक प्रज्वलित करून शंकरास फुल अर्पण करावे. 
- शंकरास सुपारी, पंचामृत, श्रीफळ व बिल्वपत्र अर्पण करावे. 
- व्रत करत असताना श्रावण व्रतकथेचे पठन करावे. 
- पूजा झाल्यावर सर्वाना प्रसादाचे वाटप करावे. 
- संध्याकाळी पूजा पूर्ण झाल्यावर उपास सोडून सात्विक भोजन करावे. 

श्रावण महिन्यातील व्रत केल्याने होणारे लाभ 
श्रावण महिना हा भगवान श्रीशंकर ह्यांना समर्पित असल्याने भक्ताने जर मनापासून व  भक्तिभावाने श्रावण सोमवारी उपास केला तर त्यास निश्चितपणे श्रीशंकराचे  आशीर्वाद प्राप्त होतात. 
विवाहित महिला आपले वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी व विवाहेच्छुक महिला आपणास सुयोग्य वर मिळावा म्हणून श्रावण सोमवारचा उपास सुद्धा करत असतात. 

कावड यात्रा 
ह्या पवित्र महिन्यात शिव भक्त कावड यात्रा सुद्धा करतात. देवभूमी उत्तराखंड स्थित शिवनगरी हरद्वार व गंगोत्री येथे शेकडो शिवभक्त येतात. ते ह्या तीर्थस्थानाहून गंगाजळ भरलेली कावड आपल्या खांद्यावरून आणतात व त्या पवित्र पाण्याने भगवान  श्रीशंकरास अभिषेक करतात. ह्या यात्रेत सहभागी होणाऱ्यांना कावडीया ह्या नावाने संबोधले जाते. 

कावड पौराणिक कथा 
पौराणिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते कि जेव्हा देव व असुर ह्यांच्यातील समुद्र मंथनातून १४ रत्ने निघाली तेव्हा त्यात एक विष सुद्धा होते कि ज्यामुळे संपूर्ण ब्रह्माण्ड नाश पावण्याची भीती होती. त्यावेळेस ब्रह्माण्डाच्या रक्षणार्थ भगवान श्रीशंकर ह्यांनी ते विष प्राशन करून त्यास आपल्या गळ्याखाली उतरू दिले नाही. विषाच्या प्रभावामुळे भगवान श्रीशंकरांचा कंठ निळा झाला व त्यामुळे त्यांचे नांव नीलकंठ पडले. असे सांगितले जाते कि रावण कावड भरून गंगाजळ घेऊन आला व त्याने ह्या गंगाजळाने शिवलिंगावर अभिषेक केला व मग भगवान श्रीशंकर ह्यांना विषापासून मुक्ती मिळाली. 

श्रावण महिन्यातील मंत्र 
ह्या महिन्यात "ॐ नमः शिवाय" ह्या मंत्राचा जप करावा. 

श्रावण व्रत कथा 
प्राचीन काळी एक श्रीमंत मनुष्य होता, परंतु दुर्भाग्यवश त्यास एकही संतती नव्हती. ह्याचे दुःख त्यास नेहमीच सतावीत होते, परंतु तो व त्याची पत्नी हे शिवभक्त होते. दोघेही भगवान श्रीशंकराची आराधना करण्यासाठी सोमवारचा उपास करू लागले. दोघांची भक्ती पाहून माता पार्वतीने भगवान श्रीशंकराकडे ह्या दांपत्यास संतती प्राप्ती करून देण्याचा आग्रह केला. श्रीशंकराने त्याचा स्वीकार केला व त्यांच्याच आशीर्वादाने ह्या दांपत्याच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला, तेव्हा आकाशवाणी झाली कि हा मुलगा १२ वर्षाचा झाल्यावर मृत्यू पावेल. ह्या आकाशवाणीमुळे त्या व्यक्तीने आपल्या मुलाचे नांव अमर असे ठेवले. त्या श्रीमंत व्यक्तीने आपला पुत्र अमर ह्यास शिक्षणासाठी काशीस पाठविण्याचे ठरवून त्याच्या सोबत आपल्या मेहुण्यास पाठविण्याचे निश्चित केले. काशीला जाताना रस्त्यात जेथे ते विश्राम करण्यासाठी थांबत असायचे तेथे ब्राह्मणांना दान व दक्षिणा देत होते. रस्त्यात ते एका शहरात आले जेथे एका राजकुमारीचा विवाह होत होता. त्या राजकुमारीचा पती एका डोळ्याने चकणा होता हि गोष्ट वराच्या घरच्यांनी राजा पासून लपवून ठेवली होती. त्यांना अशी भीती होती कि हि गोष्ट जर राजास समजली तर हा विवाह होणार नाही. ह्यातून सुटका करून घेण्यासाठी वराच्या घरच्यांनी अमर ह्यास खोटाखोटा वर होण्याचा आग्रह केला ज्यास तो नकार देऊ शकला नाही. अशा प्रकारे अमर त्या राजकुमारीशी विवाहबध्द  झाला मात्र त्यास राजकुमारीला दगा द्यावयाचा नव्हता. त्यामुळे त्याने खरी हकीगत राजकुमारीस लिखित स्वरूपात कळविली. जेव्हा राजकुमारीने अमरची चिट्ठी वाचली तेव्हा तिने अमर ह्याचा आपला पती म्हणून स्वीकार केला व तो काशीहून परतण्याची प्रतीक्षा केली. अमर व त्याचे मामा तेथून काशीस गेले. दुसरीकडे अमर नेहमी धार्मिक कार्यात गुंतून राही. जेव्हा अमर १३ वर्षांचा झाला तेव्हा शंकराच्या मंदिरात जाऊन तो बिल्वपत्र शंकरास अर्पण करत होता. 

त्याच वेळेस यमराज त्याचे प्राण हरण करण्यास आले, मात्र तत्पूर्वी भगवान श्रीशंकर ह्यांनी अमरची भक्ती पाहून त्यास दीर्घायु होण्याचा वर दिला होता. परिणाम स्वरूप यमराजांना रिकाम्या हाती परतावे लागले. त्या नंतर आपले शिक्षण पूर्ण करून अमर आपल्या पत्नीसह (राजकुमारीसह) घरी परतला. 

ह्या ५ वस्तू घरी आणल्याने प्रसन्न होतील भगवान श्रीशंकर व होईल सुख, सौभाग्य व समृद्धी ह्यात वृद्धी
१. रुद्राक्ष - श्रावण महिन्याच्या प्रथम दिवशी सुख, सौभाग्य व समृद्धी ह्यात वृद्धी होण्यासाठी शुद्ध रुद्राक्ष चांदीत जडवून धारण केल्यास अत्यंत शुभ फले व सौभाग्य ह्यात वृद्धी होते. 
२. जलपात्र - श्रावण महिन्याच्या प्रथम दिवशी आपण जर चांदी, तांबे किंवा पितळेचे जलपात्र खरेदी केले तर ते अत्यंत शुभ असते. ह्या पात्रात पाणी भरून ठेवले व ते भगवान श्रीशंकरास अर्पण केले तर त्याने श्रीशंकर प्रसन्न होतात. 
३. चांदीचा चंद्र किंवा मोती - भगवान श्रीशंकर आपल्या पायात चांदीचे कडे घालतात. त्यामुळे श्रावण महिन्याच्या प्रथम दिवशी जर चांदीचे कडे खरेदी केले तर ते तीर्थयात्रेसाठी किंवा परदेशयात्रेसाठी शुभ असते.
४. चांदीचे बिल्वपत्र - श्रावण महिन्यात सर्वजण शिवलिंगास बिल्वपत्र अर्पण करीत असतात, परंतु अनेकदा शुद्ध व अखंड बिल्वपत्र मिळणे कठीण असते. अशा वेळी आपण चांदीच्या बिल्वपत्राने श्रीशंकरास पाण्याचा अभिषेक करू शकता. असे केल्याने लाखो पापे नष्ट होऊन प्रत्येक कार्यास अनुकूलता लाभते. 
५. चांदीचा चंद्र - भगवान श्रीशंकर ह्यांच्या डोक्यावर चंद्र शोभून दिसतो. आपण श्रावण महिन्याच्या प्रथम दिवशी चांदीचा चंद्र खरेदी केल्यास चंद्र शांत होऊन मनास बळकटी येते.   

आचार्य कृष्णमूर्ती ह्यांच्या इनपुटसह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम