२०१९ शनी जयंती: शनी जयंती पूजा, शनी देवांची दहा नांवे


हिंदू महिन्यातील वैशाख अमावास्येस शनिदेवांच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरी करण्यात येते. ह्या दिवशी शनीची आपल्या भक्तांवर विशेष कृपा होत असते अशी एक मान्यता आहे. शनीची साडेसाती, पनौती किंवा शनीची महादशा असणाऱ्या जातकांसाठी हा दिवस विशेष फलप्राप्ती करून देणारा आहे. २०१९ ला शनी जयंती ३ जून रोजी आहे. शनी जयंतीच्या दिवशी करण्यात येणाऱ्या पूजे विषयी, कि जी  आपणास त्वरित फलदायी होईल ह्याची माहिती आम्ही येथे देत आहोत. शनी मूर्ती समोर उभे राहून त्याचे दर्शन कधी करू नये, हे लक्षात ठेवावे. त्यांच्या डोळ्यात डोळा घालून न बघता त्यांच्या चरणांकडे बघावे असे शास्त्र सांगते. 

शनी जयंतीची पूजा कशी करावी 
ह्या वर्षी शनी जयंती सोमवारी येत आहे. ह्या दिवशी शनिदेवांसह भगवान श्रीशंकराची उपासना केल्यास कितीतरी पटीने फलप्राप्ती होऊ शकेल. 
- सकाळी शुद्धीकरण करून शनी मंदिरात जाऊन आपण तेल अर्पण करावे. 
- शनी निर्मित वस्तू गरिबांना दान करण्यात यावे. 
- शनी जयंतीच्या दिवशी खोटे बोलणाऱ्यास, गरिबांचे नुकसान करणाऱ्यास किंवा कोणाशी दगा फटका करणाऱ्यास शनिदेव कधीच क्षमा करत नसल्याने असे कोणतेच कर्म करू नये. 
- शनीचा तंत्रोक्त मंत्र  “ॐ  प्रां प्रीं प्रौं स: शनयै नम:”  किंवा “ॐ  शं शनैश्चराय नम:”  मंत्राच्या एक, पाच किंवा अकरा माळांचा जप अवश्य करावा. 
- तिळाचे तेल, काळे तीळ, काळे उडीद किंवा लोखंडाच्या वस्तूंचे दान अवश्य करावे. 

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे महत्व   
ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना एक विशेष महत्व आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रात शनीला पाप ग्रह मानण्यात येते. शनीला तिसरी, सातवी व दहावी दृष्टी असते. मुख्य म्हणजे शनी हा न्याय प्रिय देव आहे. शनी कोणावरही ना अन्याय करतो ना अन्याय होऊ देतो. त्यामुळे अन्याय करणाऱ्यास त्वरित शिक्षा होते. शनीला काहीजण काळ्या तर काहीजण निळ्या रंगाने वर्णित करतात. त्यांच्या पूजेत निळ्या रंगांच्या फुलांचाच उपयोग करावा. शनी एका राशीत अडीच वर्ष राहतो व कर्मानुसार संथ गतीने फळ देत असतो. शनी हा परम शिवभक्त असल्याने शनिदोष दूर करण्यासाठी मारुतीसह भगवान श्रीशंकराच्या उपासनेस सुद्धा महत्व प्राप्त होते. 

दररोज शनीची दहा नांवे घ्या
शनिदेवांची रोज दहा नांवे घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हि नांवे श्लोकरूपात घेता येतात. जर तसे करता नाही आले तर प्रत्येक नांवा बरोबर ओम व नमः ह्याचे उच्चारण अवश्य करावे. 
जसे कि - ॐ कोणस्थ नम:
कोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:।
सौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:।।
अर्थात: १- कोणस्थ, २- पिंगल, ३- बभ्रु, ४- कृष्ण, ५- रौद्रान्तक, ६- यम, ७- सौरि, ८- शनैश्चर, ९- मंद व १०- पिप्पलाद। ह्या १० नावांनी शनिदेवांचे स्मरण केल्याने सर्व शनिदोष दूर होतात. 

शनिदोष दूर करण्याचे उपाय 
- दशरथकृत शनी स्तोत्राचे पठन करावे. 
- आपल्या माता - पित्यांची सेवा करावी. वडिलधाऱ्यांचा अपमान करू नये. 
- शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. 
- शनिदेवांना तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा. 
- काळे उडीद, काळे तीळ किंवा काळे चणे ह्यांचे यथोचित दान करावे. 
- शनिवारी उपवास करून शनिव्रत कथेचे पठन करावे. 
- आळस झटकावा व दुसऱ्याचे मन दुखवू नये. 

गणेशजींच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम