वक्री शनी २०१९: ३० एप्रिलला शनी वक्री होत असून त्याचा आपल्या राशीवर होणारा परिणाम


शनीच्या गोचरीस वैदिक ज्योतिषशास्त्रात खुप महत्व आहे. त्यातही तो जर वक्री होत असेल तर त्याचे महत्व आणखीनच वाढते. तसे पाहता शनी ह्यास कर्म, सेवा, नोकरी व लोकतंत्राचा कारक ग्रह समजण्यात येते, त्यास्तव त्याचा मुख्यत्वे कारकिर्द व चरितार्थ ह्यावर प्रभाव पडत असतो. शनी हा मंद गतीचा ग्रह असल्याने त्याचे परिणाम सुद्धा स्थिर व ठाम असतात. ह्या वर्षी ३० एप्रिल रोजी शनी हा धनु राशीत वक्री होत असून १८ सप्टेंबर रोजी धनु राशीतच तो मार्गी होईल. 

वक्री शनी देईल परिश्रमाची उत्तम फले, वक्री शनीच्या त्रासाचे निराकरण करण्याचे उपाय   
मुख्य म्हणजे शनी हा मंद गतीचा ग्रह आहे व त्याच्या ह्या गतीचा प्रभाव कोणत्याही व्यक्तीच्या जीवनावर होतच असतो. असे नाही कि शनी हा वक्री असता अशुभ फलेच  देईल. परिणाम सकारात्मक असतील कि नकारात्मक, हे सर्व जातकाच्या कुंडलीतील शनीच्या स्थितीवरच अवलंबून असते. अनेकदा असे हि होते कि शनी वक्री असता लोकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वास जातात. मात्र, ह्या दरम्यान अनेक प्रकारे सावध राहावे लागते. अशा परिस्थितीत त्रासातून मुक्ती मिळविण्यासाठी मंगळवारी व शनिवारी मारुतीचे पूजन व रोज हनुमान चालिसाचे पठन उपयुक्त ठरते. वक्री शनीचा विविध राशींवर काय परिणाम होईल हे येथे आपण जाणून घेऊ. 

शनी वक्री - २०१९ 
शनी वक्री प्रारंभ - ३० एप्रिल २०१९ (मंगळवार) सकाळी ०३.५५ वाजता 
शनी मार्गी प्रारंभ - १८ सप्टेंबर २०१९ (बुधवार) सकाळी ११.४८ वाजता 
एकूण वक्री अवस्था - १४२ दिवस 

मेष रास 
ह्या राशीच्या जातकांना वक्री शनी हा लाभदायी आहे. नोकरीतील लाभां व्यतिरिक्त संतती सौख्य प्राप्त होईल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. मात्र, प्रत्येक कामात यशस्वी होण्यासाठी तिप्पट कष्ट करावे लागतील. शनी हा भाग्यातून वक्री अवस्थेत भ्रमण करणार असल्याने नशिबापेक्षा कर्मावर अधिक विश्वास ठेवा. 
वृषभ रास 
ह्या राशीच्या जातकांना आपले ध्येय गाठण्यासाठी आवश्यक काम करण्यास हा वक्री शनी प्रेरित करेल. ह्या दरम्यान आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता भासेल. जोडीदाराशी छोट्याशा कारणांवरून सुद्धा वाद होण्याची शक्यता आहे. अशा प्रसंगी आपण मौन राहणे हितावह राहील. 
मिथुन रास 
ह्या राशीच्या जातकांना वक्री शनी नुकसानदायी आहे. कामात आपले लक्ष लागणार नाही तसेच वैवाहिक जोडीदार किंवा व्यावसायिक भागीदार ह्यांच्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान धीर धरणे हितावह राहील. कोणत्याही कामात घाई करू नये. 
कर्क रास 
ह्या राशीच्या जातकांची कामे वक्री शनीमुळे विलंबाने होतील. ह्या दरम्यान शनी आपली परीक्षा घेईल. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांशी सौजन्याने वागावे. आत्मविश्वासाच्या अभावामुळे कोणतेही नवीन काम करताना आपणास भीती वाटेल. 
सिंह रास 
वक्री शनीमुळे ह्या राशीच्या जातकांना प्रणयी जीवनात कमतरता जाणवेल. लाभ कमी होतील व बचतीचा पैसा खर्च करावा लागेल. ह्या दरम्यान आपणास अनावश्यक खरेदीवर नियंत्रण ठेवावे लागेल.
कन्या रास 
ह्या राशीच्या जातकांच्या आरोग्यावर वक्री शनीचा प्रतिकूल परिणाम होऊ शकेल. असे असले तरी ह्या दरम्यान एखादी नवीन योजना कार्यान्वित होऊन ती फलदायी ठरेल. तसेच ह्या दरम्यान स्थान परिवर्तन सुद्धा होऊ शकते. 
तूळ रास 
वक्री शनीमुळे ह्या राशीच्या जातकाची कामे तर होतीलच, परंतु प्रत्येक कामात आव्हानांचा सामना करावा लागेल. आपण जर मनाने कमकुवत असाल तर ह्यामुळे क्रोधीत सुद्धा होऊ शकाल. आर्थिक बाबीत खूप सावध राहावे लागेल. 
वृश्चिक रास 
हे दिवस वृश्चिक राशीच्या जातकांना सावध राहण्याचे आहेत. मातेच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सुख - सुविधेत कमतरता जाणवू शकते. अचानकपणे आपणास मिळणारे लाभ कमी होण्याची शक्यता आहे. 
धनु रास 
वक्री शनी असे पर्यंत आपणास खूपच सावध राहावे लागेल. ह्या दरम्यान वैवाहिक जोडीदाराशी मतभेद सुद्धा होऊ शकतात. कौटुंबिक बाबतीत आपले लक्ष लागणार नाही. कामाच्या ठिकाणी सुद्धा उत्साहजनक वातावरण असणार नाही. 
मकर रास 
मकर राशीच्या जातकांसाठी वक्री शनी फायदेकारक असणार नाही. आपणास एखादे व्यसन लागू शकते. कुटुंबीय व संततीमुळे आपण चिंतीत होऊ शकता. ह्या दरम्यान सफाई कामगारांशी सौजन्याने वागावे. 
कुंभ रास 
ह्या राशीच्या जातकांना वक्री शनीचा खूप त्रास होऊ शकतो. घाई गडबडीत पैसे कमावण्याच्या लालसे पासून दूर राहा. प्रणयी जीवनात जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. कार्यालयीन कामात मन लागणार नाही. 
मीन रास 
वक्री शनीमुळे ह्या राशीच्या जातकांना विशेष असा काही फायदा होणार नाही. प्रत्येक कामात विलंब होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. खर्चात वाढ झाल्याने आपणास नैराश्य येऊ शकते. 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी