संकष्टी चतुर्थी २०२१ :व्रत सूची व उपवासाचे दिवस

हिंदू कालनिर्णयानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थ्या येत असतात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी ह्या नांवाने संबोधण्यात येते. तसेच शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीस विनायकी चतुर्थी ह्या नांवाने संबोधण्यात येते. संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्व मनोकामनांची पूर्तता करणारे असून सर्व प्रकारचे कष्ट दूर करणारे सुद्धा आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रताने भगवान श्रीगणेश ह्यांची विशेष कृपा प्राप्त होते. 

२०२१ दरम्यान संकष्टी चतुर्थीची सूची ह्या प्रमाणे आहे 

२०२१ दरम्यान केव्हा आहे संकष्टी चतुर्थी ?

संकटहरा चतुर्थी सुद्धा म्हटले जाते 

संकष्टी चतुर्थीचे व्रत भगवान श्रीगणेश ह्यांना समर्पित होते. हे व्रत करून भक्त भगवान श्रीगणेश ह्यांना कष्ट हरण करण्याची प्रार्थना करतो. हिंदू पंचांगानुसार हे व्रत प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमे नंतरच्या चौथ्या दिवशी (कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी) करण्यात येते. हिंदू धर्मात गणपतीस प्रथम पूजनीय मानण्यात व संकट नाशक समजण्यात येते. संपूर्ण वर्षात साधारणपणे १३ संकष्टी चतुर्थी येत असतात. संकष्टी चतुर्थीस तामिळनाडूत "गणेश संकटहरा" किंवा "संकटहरा चतुर्थी" ह्या नांवाने संबोधण्यात येते. 

संकष्टी चतुर्थीचे पूजन कसे करावे ?

- सकाळी शुद्ध पाण्याने स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. 
- भगवान श्रीगणेश ह्यांचे पूजन तीळ, गूळ, दुर्वा, चंदन ह्याने करावे. त्या नंतर श्रीगणेश ह्यांच्या कथेचे पठन करावे. 
- भगवान श्रीगणेश ह्यांच्या मंत्रांचा जप करावा. 
- संध्याकाळी श्रीगणेश ह्यांचे पूजन करून व चंद्रास अर्घ्य देऊन पूजा संपन्न करावी. 

संकष्टी व्रत कसे करावे ?

संकष्टी चतुर्थीचे व्रत अत्यंत कडक असते. ह्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या धान्याचे सेवन करू नये. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी फळे, कंदमूळ खाऊ शकता. चंद्रोदया नंतर चंद्र दर्शन घेऊन चंद्रास अर्घ्य दिल्या नंतर उपवास सोडता येतो. हा उपवास सोडल्या नंतर साबुदाण्याची खिचडी, बटाटा व शेंगदाणे खाऊ शकता. 

संकष्टी चतुर्थीसाठी श्रीगणेश मंत्र 

गणपतीचे पूजन आपण ह्या मंत्राने करू शकता 
ॐ गं गणपतये नम:
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।
ॐ एकदन्ताय विद्धमहे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्॥

श्रीगणेशजींच्या कृपेसह 
इस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम