श्रीरामनवमी २०१९: श्रीरामनवमी तिथी. कथा व साजरी करण्याची पद्धत


श्रीरामनवमी हा सण मर्यादा पुरषोत्तम श्रीराम ह्यांच्या जन्माशी संबंधित आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी ह्या तिथीस भगवान श्रीविष्णू ह्यांनी श्रीराम ह्यांच्या रूपात राजा दशरथ ह्यांच्याकडे माता कौशल्या ह्यांच्या पोटी जन्म घेतला होता. त्यामुळेच ह्या तिथीस श्रीरामनवमी ह्या नावाने साजरी करण्यात येते. आपल्या देशासाठी श्रीरामनवमीचे विशेष महत्व आहे. ह्या वर्षी श्रीरामनवमी १४ एप्रिल २०१९ रोजी साजरी करण्यात येईल. मात्र नवरात्र १३ एप्रिल ह्या दिवशी समाप्त होत असल्याने काही ठिकाणी श्रीरामनवमी हि १३ एप्रिल रोजी साजरी करण्यात येईल, परंतु सूर्योदयाच्या वेळी नवमी तिथी हि १४ एप्रिलला असल्याने आपण श्रीरामनवमीचे पूजन रविवारी करू शकता. ह्या दिवसा पासून गोस्वामी तुलसीदासजी ह्यांनी श्रीराम चरित मानस ह्याची रचना करण्यास सुरवात केली होती. 

प्रभू श्रीराम ह्यांच्या जन्माशी निगडित पौराणिक कथा 
पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीराम ह्यांनी त्रेता युगात अवतार धारण केला होता. अयोध्येचा राजा दशरथ ह्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञा पासून खीर प्राप्त केली. राजा दशरथ ह्यांनी आपल्या प्रिय पत्नीस माता कौशल्येस हि खीर दिली. माता कौशल्याने त्यातील अर्धा भाग कैकेयी हिस दिल्या नंतर दोघीनींही आपल्या वाट्यातील अर्धा भाग घेऊन उर्वरित अर्धा भाग सुमित्रा हिस दिला. ह्या खिरीच्या सेवनाने चैत्र शुक्ल नवमीस पुनर्वसू नक्षत्र व कर्क लग्नी माता कौशल्येच्या पोटी प्रभू श्रीराम ह्यांचा जन्म झाला. ह्याच प्रमाणे कैकेयीने भरत तर सुमित्राने लक्ष्मण व शत्रुघ्न ह्यांना जन्म दिला. 

श्रीरामनवमी अशी साजरी केली जाते 
श्रीरामनवमीच्या दिवसाची सुरवात सूर्य देवतेच्या आराधनेसह होते. सूर्य शक्तीचे प्रतीक असून हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्य देवास प्रभू श्रीराम ह्यांचे पूर्वज समजण्यात येते. श्रीरामनवमी हि चैत्र महिन्यात येते, व ह्याच दिवशी चैत्री नवरात्रीची  समाप्ती सुद्धा होते. देशातील विभिन्न भागात विविध पद्धतीने श्रीरामनवमीची पूजा केली जाते. प्रभू श्रीराम ह्यांना मर्यादेचे प्रतीक समजण्यात येते इतकेच नव्हे तर त्यांना सर्वश्रेष्ठ पुरुष असेही संबोधले जाते. ते कोणाशीही कोणताच भेद - भाव करत नसतात. ह्या दिवशी लोक भजन - कीर्तन करतात व रामकथा श्रवण करतात. ह्या दिवशी रामचरित मानस ह्याचे सुद्धा पठन केले जाते. असा समज आहे कि ह्या दिवशी उपवास केल्याने सुख समृद्धी प्राप्त होऊन पाप व वाईट प्रवृत्तीचा नाश होतो. 

श्रीरामनवमी २०१९ 
श्रीरामनवमी पूजा मुहूर्त - ११.१८ ते १३.४२ (अवधी २ तास २४ मिनिटे)
श्रीरामनवमी मध्यान्ह क्षण - १२.३० 
नवमी तिथीचा प्रारंभ - १३ एप्रिल २०१९ रोजी ०९.११ 
नवमी तिथी समाप्ती - १४ एप्रिल २०१९ रोजी ०७.०५. 

रामरक्षा स्तोत्राचे पठन करावे. 
रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. भगवान श्रीशंकर ह्यांनी बुधकौशिक ऋषी ह्यांना स्वप्नात दर्शन देऊन रामरक्षा स्तोत्र ऐकविले होते. सकाळी उठल्यावर त्यांनी ते लिहून काढले. हे स्तोत्र संस्कृत भाषेत आहे. ह्या स्तोत्राच्या नित्य पठनाने घरातील सर्व पीडा व भूतबाधा सुद्धा दूर होतात. जे कोणी ह्या स्तोत्राचे पठन करेल तो दीर्घायुषी, सुखी, संतती सौख्य लाभणारा, विजयी व विनय संपन्न होतो. श्रीरामनवमी पासून ह्या स्तोत्राचे पठन करण्याचा संकल्प करावा. 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी