नीतिमान वरिष्ठ:राशीनुसार आपल्या वरिष्ठांच्या मनाचा कल जाणून घ्या

जेव्हा आपल्या व्यावसायिक क्षेत्राशी संबंध येतो तेव्हा काही लोक नेतृत्व करण्यास सर्वात पुढे येत असतात. ते आपले लक्ष्यांक पूर्ण करण्यात तरबेज असतात. आपल्या संघाशी सुद्धा त्यांचा संपर्क दांडगा असतो. वेळ प्रसंगी ते कठोर हि होतात व तितकेच दयाळू सुद्धा. त्यांचा हा गुण त्यांना मिळालेली एक दैवी देणगीच असते. कोणते वरिष्ठ  कशा प्रकारचे आहेत, हे साधारणतः त्यांच्या राशीवर अवलंबून असते. होय, नेतृत्व गुण हे आपल्या राशीवर सुद्धा अवलंबून असते. येथे आम्ही आपणास काही राशींचे गुण  दाखवीत आहोत कि ज्यांच्यात नेतृत्व गुण दिसून येतात. ह्या राशीचे वरिष्ठ खूपच नीतिमान असू शकतात. 

मेष:- जन्मतः नेता 

मेष राशीचे जातक जन्मतः नेतृत्व गुण असलेले असतात. त्यांची वृत्ती सुद्धा त्यास अनुरूप असते. ते आपल्या कनिष्ठांना उत्तम मार्गदर्शन करू शकतात. मेष राशीच्या लोकांना आपली सांघिक कामगिरी कशी चांगली होऊ शकेल हे ठाऊक असते. कोणतेही लक्ष्यांक पूर्ण करण्यास ते आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकतात. मेष राशीच्या व्यक्ती आपल्या संघात खूपच चांगल्या स्वभावाच्या असतात. ते कधी कधी कामाच्या बाबतीत एखाद्यासाठी कठोर होऊ शकतात, मात्र आतून त्याच्यासाठी ते मऊ सुद्धा असतात. मेष राशीच्या व्यक्ती अत्यंत महत्वाकांक्षी असतात. अनेकदा त्यांचा हा गुण त्यांना मोठे लक्ष्यांक गाठण्यास मदतरूप होतो. 

सिंह:-अनेकदा कठोर वरिष्ठ 

सिंह राशीच्या व्यक्ती मेष राशीच्या व्यक्तींप्रमाणे नेतृत्व गुण घेऊनच जन्माला येतात, मात्र अनेकदा ते आपल्या संघासाठी कठोर होत असतात. त्यांना आपल्या संघा बरोबर हास्य - विनोद करण्यात वेळ घालविणे पसंत नसते. ते नेहमीच आपल्या कनिष्ठां बरोबर काही अंतर ठेवून असतात. सिंह राशीचे वरिष्ठ चांगले श्रोता नसतात. मात्र, ते आपल्या संघाची भावना दुरूनच समजून घेत असतात. ते निव्वळ नजरेने घाबरवून संघा कडून कामे करवून घेऊ शकतात, मात्र त्यांच्या अति उद्धटपणामुळे अनेकदा ते संघातील आपला मान घालवतात. असे असले तरी एखाद्याने त्यांच्या समोर एखादी समस्या मांडली तर त्याचे निराकरण करण्यासाठी ते त्या व्यक्तीस पूर्ण सहकार्य करतात.  

कन्या:-अंतिम मुदतीची विशेष चिंता नाही 

कन्या राशीच्या वरिष्ठांकडे आपल्या कनिष्ठांकडून उत्तमोत्तम काम करवून घेण्याचा जन्मजात गुण असतो. ते आपल्या संघ सहकाऱ्यांशी खूपच सौम्य व्यवहार करत असतात. ते नेहमीच अचूकपणा बद्धल ओळखले जातात. ते स्वतःच अचूक कामे करत असतात व आपल्या संघास सुद्धा त्यासाठी प्रेरित करतात. असे असले तरी अनेकदा त्यांना अंतिम मुदतीची चिंता नसते. ते ज्या पद्धतीनं कामे करतात, त्याच पद्धतीने आपल्या संघातील लोकांना काम करण्यास प्रेरित करतात. कोणत्याही बाबतीत नावीन्य त्यांच्या पसंतीस एकदम उतरत नाही.  

धनु:-प्रवाहा विरुद्ध विचार करतात 

धनु राशीचे वरिष्ठ आपल्या संघा बरोबर हास्य - विनोद करण्यात मग्न असतात. त्यांना प्रत्येक कामात धाडस करणे आवडते. आपले वरिष्ठ जर धनु राशीचे असले तर आपणास हे समजेल कि ते किती आनंददायी आहेत. ते आपल्या संघास नेहमीच उत्साहित करतात. त्यांना नवीन कल्पनेनुसार काम करण्यास आवडते. ते आपल्या संघास सुद्धा प्रवाहा विरुद्ध विचार करण्यास प्रेरित करतात. धनु राशीच्या वरिष्ठां बरोबर काम केल्याने आपले कौशल्य व कार्य क्षमता वाढते. त्याचा आपल्यावर  सकारात्मक प्रभाव होतो. 

मकर:-कार्यालयीन राजकारणा पासून दूर राहतात 

मकर राशीचे वरिष्ठ कधीही कोणत्याही राजकारणात सहभागी होत नसतात. तसेच ते कोणत्याही कनिष्ठावर अंध विश्वास ठेवत नाहीत. ते नेहमीच आपल्या कामाच्या आधारे आपणास पारखत असतात. संघ सहकाऱ्यांच्यात होत असलेले वाद ते आपल्या हुशारीने सहजपणे सोडवू शकतात. त्यांना आपल्या सहकाऱ्यांची दुबळी बाजू माहित असते व त्यामुळे मकर राशीच्या वरिष्ठांना सहजासहजी फसवता येत नाही. ते आपल्या प्रकल्पातील कोणत्याही पळवाटेची माहिती आपल्या जवळ बाळगून असतात. असे असले तरी कोणत्याही समस्येचे निराकरण विश्लेषणात्मक पद्धतीने ते करत नाहीत. त्यांना कन्या राशी प्रमाणे पारंपारिक पद्धतीने काम करण्यास जास्त आवडते. 

कुंभ:-अत्यंत सर्जनशील असणारी रास 

ह्या राशीचे वरिष्ठ अत्यंत सर्जनशील असतात. ते कोणतेही लक्ष्यांक गाठण्यासाठी सर्जनात्मक पवित्रा घेत असतात. आपल्या संघा कडून त्यांची अशीच सर्जनशीलतेची अपेक्षा असते. हे असे वरिष्ठ असतात कि जे आपल्या बरोबर आपल्या संघाच्या उन्नतीचा सुद्धा विचार करतात. ते आपल्या संघास खूप काम करण्याची पूर्ण मोकळीक देतात. त्यांच्या समस्या ऐकून घेतात व आपल्या पद्धतीने त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. कुंभ राशीचे वरिष्ठ हे सर्वात चांगल्या वरिष्ठांपैकी एक असतात असे आपण म्हणू शकतो.   

श्री गणेशजींच्या कृपेसह 
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम