मंगळाचे राशिपरिवर्तन, जाणून घ्या आपल्या राशीवर होणार त्याचा परिणाम


मंगळ सक्रियता व निश्चियीपणा असलेला ग्रह आहे, तर मीन रास हि धैर्यवान असून सहसा अधिकार न दर्शविणारी रास आहे. मीन हि संयमित व सौम्य अशी रास आहे. ह्या राशीच्या व्यक्ती जीवनात हळू हळू प्रगती करतात. हि स्थिती नक्कीच मंगळा सारख्या ग्रहास पोषक अशी नाही. मंगळ ग्रह हा संपूर्ण ग्रहमालेत सर्वात बलवान असा ग्रह आहे. जर आपण नवीन वर्षाची वाट बघत असाल तर २३ डिसेंबर २०१८ रोजी होणारा मंगळाचा मीन राशीतील प्रवेश एक परिवर्तन घडवून आणत असल्याचे आपल्या निदर्शनास येईल. 

मंगळाच्या मीन राशीतील भ्रमणाचा विभिन्न राशींवर होणारा परिणाम

मेष 
ह्या राशीच्या व्यक्तींच्या मनात काही अति सक्रिय व उच्च क्षमतेचे विचार येण्याची शक्यता आहे. मंगळ आपल्या व्ययातून भ्रमण करत असल्याने आपल्या कौटुंबिक जीवनात काही त्रास संभवतो. आपल्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ह्या भ्रमणा दरम्यान आपल्या हातून काही महत्वाच्या संधी व आर्थिक लाभ निसटून जाण्याची शक्यता आहे. आपणास आपल्या कारकिर्दीवर व व्यक्तिगत जीवनावर अधिक लक्ष द्यावे लागेल. आपल्या सामाजिक जीवनात सुद्धा त्रास होऊ शकतो. कार्यालयात आपणास आपल्या कार्याप्रती सावध राहण्या व्यतिरिक्त सहकाऱ्यांशी तर्क - वितर्क व नकारात्मक गोष्टींवर चर्चा करण्या पासून दूर राहावे लागेल. ह्या दरम्यान आपल्या प्रकृतीची काळजी घेण्या व्यतिरिक्त आपणास शांत व संयमित राहावे लागेल. 


वृषभ 
मंगळ आपल्या लाभातून भ्रमण करत आहे. आपल्यासाठी हे भ्रमण अनुकूल आहे. ह्या दरम्यान जमीन, संपत्ती, रिअल इस्टेट इत्यादींशी संबंधित बाबीत आर्थिक लाभ होण्याची चांगली संधी आहे. संपत्ती संबंधित बाबींचा एक उत्तम असा सौदा आपण करू शकाल. निवासी व व्यापारी संपत्तीच्या खरेदी - विक्रीसाठी हे भ्रमण अनुकूल आहे. आपणास उत्तम लाभ होईल. आयात - निर्यातीशी संबंधित व्यापाऱ्यांना सुद्धा हे भ्रमण अत्यंत लाभदायी आहे. मात्र, अपघाताची शक्यता असल्याने प्रवासात काळजी घ्यावी लागेल. कार्यालयात आपल्या वरिष्ठां कडून आपल्या कामगिरीचे कौतुक केले जाईल. 


मिथुन 
मंगळ आपल्या दशमातून भ्रमण करत आहे. ह्या दरम्यान आपल्यावर ज्या व्यक्तीचा मोठा पगडा आहे अशा व्यक्तीची भेट होईल. मात्र, व्यक्तिगत जीवनात काही त्रास संभवतो. एखाद्या दीर्घकालीन योजनेत जर काही अडचण आली तर आपण निराश होण्याची गरज नाही. असे झाले तरी आपण ते थांबविण्यासाठी जशी तयारी केली असेल तसे होणार नाही. मंगळाचे हे भ्रमण आपल्या व्यवसायासाठी सुध्दा लाभदायी आहे. ह्या दरम्यान आपण केलेल्या खर्चामुळे एखादा प्रतिक्षीत सौदा सुध्दा पूर्ण करू शकाल. 


कर्क
मंगळ आपल्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे, जो विशेष अशी शुभ फळे देणार नाही. ह्या दरम्यान आपणास कठीण परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो व आपल्या मान - सन्मानाची हानी सुद्धा होऊ शकते. मात्र, हा मंगळ आपणास एक निश्चित अशी दिशा देईल. ज्यात आपणास आपले प्रयत्न गतिशील ठेवावे लागतील. ह्या दरम्यान आपण आपले मित्र व कुटुंबीयांना मदत करू शकाल. परंतु ह्या दरम्यान आपणास आपल्या माता - पित्यांच्या प्रकृतीची काळजी वाटत राहील. 


सिंह 
मंगळाचे भ्रमण आपल्या अष्टमातून होत आहे. अशा वेळीस आपणास घर व कार्यालयात ताण निर्माण होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. मात्र, आपल्या वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षणांचा आस्वाद घेऊ शकाल. आपल्या वैयक्तिक बचतीचा उत्तम लाभ होवू शकेल. कार्यालयात आपल्या वरिष्ठांवर आपली छाप पाडण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, प्रवासात व वाहन चालवताना आपणास काळजी घ्यावी लागेल. तसेच ह्या दरम्यान एखाद्या वाद - विवादात किंवा चर्चेत आपण सहभागी न होणे जास्त हितावह राहील. आपणास आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. 


कन्या 
मंगळाचे भ्रमण आपल्या सप्तमातून होत असल्याने आपण उत्साहित, ताजेतवाने व उर्जित असल्याचे आपणास जाणवेल. ह्या दरम्यान आपण संपूर्ण आत्मविश्वासाने आपले सर्व निर्णय घेऊ शकाल. आपण जर धूम्रपान व मद्यपान करत असाल तर ह्या सवयी आपणास नियंत्रित ठेवाव्या लागतील. कार्यालयात राजकारण व वायफळ गोष्टीत सहभागी न होणे हितावह राहील, अन्यथा त्याचा आपणास त्रास होईल. 


तूळ 
आपल्या षष्ठातून होणारे मंगळाचे भ्रमण आपल्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. आपण कधीही अपेक्षा केली नसेल अशा एखाद्या ठिकाणाहून आपणास आर्थिक लाभ होऊ शकेल. मात्र, आपल्या उदार वृत्तीमुळे आपण अनावश्यक खर्च सुद्धा कराल. आपण आपल्या जोडीदारासह जवळीक साधू शकाल. तसेच त्याचे सहकार्य सुद्धा मिळवू शकाल. ह्या दरम्यान आपल्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही प्रकल्पात आपण यशस्वी होऊ शकाल. आपली प्रकृती चांगली राहील. ह्या दरम्यान आपण जर एखाद्या कायदेशीर प्रक्रियेचा सामना करत असाल तर निर्णय आपल्या बाजूने लागू शकेल. आपली सर्व अपूर्ण कामे पूर्णत्वास येतील. 


वृश्चिक 
आपल्या चंद्र राशीचा स्वामी आपल्या पंचमातून भ्रमण करेल. ह्या दरम्यान आपल्यासाठी नवीन सुरवातीसह कार्यालयात सुद्धा नवीन प्रकल्पाची सुरवात करण्यास अनुकूलता लाभेल. ह्या दिवसात आपले संबंध अधिक दृढ होतील. ह्या दरम्यान दृढ भावनात्मक संबंध सुद्धा प्रस्थापित होऊ शकतील. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे दिवस अनुकूल असून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रगती व यश प्राप्ती होऊ शकेल. 


धनु 
मंगळ आपल्या चतुर्थातून भ्रमण करत आहे. ह्या दरम्यान कुटुंबियांशी बोलताना आपल्या वाणीवर संयम ठेवावा. ह्या दरम्यान अतिशय खर्च होऊ शकतो. आपणास लक्ष देण्यास जड जाऊ शकते. तसेच मातेच्या प्रकृतीमुळे ताण निर्माण होऊ शकतो. कर्ज तसेच वसुलीचे पैसे हाती लागल्याने आपल्या प्राप्तीवर त्याचा प्रभाव पडेल. अशावेळेस एखाद्या संपत्तीची खरेदी करणे योग्य ठरणार नाही. 


मकर 
मंगळ आपल्या तृतीयातून भ्रमण करत आहे. अशा वेळेस आपण प्रवास करू शकाल. ज्या दूरवरच्या प्रवासाची आपणास अपेक्षा होती तो प्रवास किंवा एखादा प्रवास आपल्या इच्छे विरुद्ध सुद्धा करावा लागू शकतो. कार्यक्षेत्रात राजकारण व स्पर्धेस सामोरे जाऊ लागण्याची शक्यता आहे. आपणास जरी नशिबाची साथ लाभणार असली तरी मिळणारी संधी वाया घालवू नका. 


कुंभ 
मंगळ आपल्या द्वितीयातून भ्रमण करत आहे. मंगळाच्या मुलभूत स्वभावानुसार तो  मिजासखोर, उर्जावान, आवेशपूर्ण व गतिशील असल्याचा आपणास अनुभव येईल. आपल्या जोडीदाराचे म्हणणे आपणास समजणे काहीसे अवघड जाईल. ह्या दरम्यान कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरवात करण्यास अनुकूलता लाभणार नाही. मात्र, चालू व्यवसायास तो पोषक ठरेल, मात्र प्राप्ती धीम्या गतीने होईल. मात्र, ह्या दरम्यान आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन ती मजबूत होईल. भावनेच्या भरात कोणालाही वचन देऊ नये तसेच एखादा निर्णय त्वरेने घेऊ नये. 


मीन 
मंगळाचे भ्रमण आपल्या राशितूनच होत आहे. ह्या दरम्यान आपणास कार्यस्थळी त्रास व आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तसेच काही महत्वाच्या कारणांमुळे कार्यस्थळी आपण काहीसे भावनाशील व्हाल. अशा वेळेस जर आपल्या निर्णयाने व कार्यवाहीमुळे आपल्या सहकार्यांवर काही विपरीत परिणाम झाला तर आपण आवेशात येण्या ऐवजी इतरांचा सल्ला घ्यावा. आपणास अपेक्षित नसेल अशा एखाद्या ठिकाणाहून आपणास धनप्राप्ती होऊ शकेल. मंगळाच्या उग्रतेचा व कार्यशीलतेचा आपल्यावर प्रभाव पडेल. वर्ष २०१८ च्या अखेरीस मंगळाचे गोचर भ्रमण आपणास अनुकूल ठरू शकेल व त्यामुळे आपण आपली सर्व प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. अशावेळेस आपली ऊर्जा वाया जाऊ न देता आपल्या ध्येयप्राप्तीसाठी त्याचा उपयोग करावा. आपली सर्व ध्येय व स्वप्ने पूर्णत्वास जाऊ शकतील. 


आचार्य अगस्त्य 
श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम