मंगळाचे कर्क राशीतून होणारे भ्रमण २०१९: प्रत्येक राशीवर होणारा परिणाम


२२ जुन २०१९ पासून मंगळ हा कर्केतून भ्रमण करणार असल्याने त्याचा सर्व १२ राशींवर काही ना काही परिणाम होताना दिसून येईल. हा परिणाम काय असेल ते आपण येथे पाहू. मंगळाचे उपाय करून आपण त्याच्या अशुभ फलांवर मात करू शकता. 

मेष रास 
मंगळाचे भ्रमण आपल्या चतुर्थातून होत आहे. मंगळ हा आपला राशी स्वामी असल्याने गृहसौख्याच्या ह्या कारक भावाचे आपणास मिश्र फल मिळेल. ह्या दरम्यान आपणास कुटुंब व कार्यस्थळाशी संबंधित बाबींची काळजी वाटण्याची शक्यता आहे. वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा मतभेद होऊ शकतात. मात्र, नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उत्तम होऊन धनलाभ होईल, परंतु आपणास प्रतिकूलतेचा सुद्धा अनुभव होईल. ह्या दरम्यान आपणास आपल्या माता - पित्यांच्या प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. 
वृषभ रास 
आपल्या तृतीयेतील मंगळाचे हे गोचर भ्रमण आपणास तितकीशी चांगली फले मिळवून देणारे नाही. ह्या दरम्यान आपणास सावध राहावे लागेल. इतकेच नव्हे तर भावंडांशी मतभेद होण्याची सुद्धा शक्यता आहे. आपण नियोजन केल्या प्रमाणे कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, परंतु ह्या दरम्यान कार्यक्षेत्री दबाव असल्याचे सुद्धा आपणास जाणवेल. आपल्या वैवाहिक जोडीदारास कार्यक्षेत्री यश प्राप्ती होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपल्या वाणीत व व्यवहारात नम्रता ठेवावी लागेल. 
मिथुन रास 
मंगळाचे हे भ्रमण आपल्या द्वितीयातून होत असून त्याचा प्रभाव आपल्या आर्थिक स्थिती व्यतिरिक्त वाणी व व्यवहारावर होताना सुद्धा दिसून येईल. तसे पाहू गेल्यास ह्या दरम्यान आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल, मात्र त्याच बरोबर खर्चात सुद्धा वाढ होईल. खर्चात वाढ झाल्याने आपणास त्रास होऊ शकतो. ह्या दरम्यान आपली वाणी कटू झाल्याचे जाणवेल. आपल्या प्रकृतीवर काही परिणाम होऊ शकतो. अशावेळी आपणास ध्यान धारणा करून मानसिक शांती मिळविण्याचा प्रयत्न करावा लागेल. 
कर्क रास 
मंगळाचे भ्रमण आपल्याच राशीतून होत असल्याने आपल्या आरोग्या संबंधी काळजी वाढू शकते. आपल्या स्वभावात चिडखोरपणा निर्माण होऊन क्रोध व अहंकार ह्यात सुद्धा वृद्धी होऊ शकेल. अशा वेळी इतरांशी संवाद साधताना सावध राहावे. विशेषतः वैवाहिक जोडीदाराशी संवाद साधताना शब्द जपून वापरावे, अन्यथा दोघांत कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्री मात्र, आपली कामगिरी उत्तम होईल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालावधी उत्तमच आहे. 
सिंह रास 
मंगळाचे हे भ्रमण आपल्या व्ययातून होत आहे. ह्या दरम्यान आपणास मिश्र फले मिळताना दिसून येतील. एखाद्या गोष्टीमुळे आपणास मानसिक चिंता होऊ शकते. आर्थिक स्थिती दुर्बल होईल, मात्र कोर्ट - कचेरीच्या कामात यश प्राप्ती होऊ शकेल. ह्या दरम्यान जलद लाभ मिळविण्याचा प्रयत्न केल्यास नुकसान होऊ शकते. कार्यक्षेत्री आपली कामगिरी उत्तम होईल. ह्या दरम्यान वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. 
कन्या रास 
मंगळाचे हे भ्रमण आपल्या लाभस्थानातून होत असून ते आपल्यासाठी प्रतिकूल आहे. मात्र, ह्या दरम्यान आपणास धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच खर्चात सुद्धा वाढ होईल. मात्र, आर्थिक सबलता असल्याने आपण काही गुंतवणूक सुद्धा करू शकाल. ह्या दरम्यान वैवाहिक जीवनात काही कटुता निर्माण होऊ शकते, मात्र प्रणयी जीवनात आपणास जोडीदाराशी प्रामाणिक राहावे लागेल. विरोधकांच्या कारवाया वाढण्याची शक्यता असल्याने आपण सावध राहावे.   
तूळ रास 
मंगळाचे हे भ्रमण आपल्या दशमातून म्हणजेच कर्मस्थानातून होत आहे. ह्या दरम्यान  आपणास सावधपणे वाटचाल करावी लागेल. नोकरी - व्यवसायात नुकसानीस सामोरे जावे लागेल. मात्र, नंतर अनुकूल परिणाम मिळू शकतील. ह्या दरम्यान कौटुंबिक बाबीत सुद्धा सावध राहावे लागेल. आपल्या वाणीत व व्यवहारात संयम बाळगावा. ह्या व्यतिरिक्त आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. खाण्या - पिण्याची सुद्धा काळजी घ्यावी.    विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. 
वृश्चिक रास 
मंगळाचे हे भ्रमण आपल्या नवमातून म्हणजेच धर्म व भाग्यस्थानातून होत आहे. मंगळाच्या ह्या भ्रमणाचा विपरीत परिणाम झाल्याने आपणास चांगल्या कामगिरीसाठी संघर्ष करावा लागेल. त्यामुळे आपणास आपले परिश्रम वाढवावे लागतील. मात्र ह्या दरम्यान जुन्या चिंता व प्रकृतीशी संबंधित समस्या दूर होऊ शकतील. परंतु, पित्याच्या प्रकृतीची आपणास चिंता वाटू लागेल. कौटुंबिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. अशा परिस्थितीत आपण ध्यान धारणा केल्यास आपला फायदा होऊ शकतो. 
धनु रास 
आपल्या अष्टमातून मंगळाचे भ्रमण होत आहे, ज्यामुळे आपणास त्रास होऊ शकतो. ह्या दरम्यान आपणास आरोग्याशी निगडित काही त्रास किंवा एखादा अपघात  होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपणास वाहन जपून चालवावे लागेल. ह्या कालावधीत कायदेशीर बाबींपासून दूर राहणे आपल्या हिताचे होईल. आपल्या खर्चात वाढ होईल. वैवाहिक जीवन मात्र सुखद होईल. ह्या कालावधीत आपल्या व वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची आपणास काळजी घ्यावी लागेल. 
मकर रास 
आपल्या सप्तमातून मंगळाचे हे भ्रमण होत असल्याने वैवाहिक जीवनात जपून राहावे लागेल. आपल्या वाणीत व व्यवहारात पारदर्शकता न ठेवल्यास कौटुंबिक जीवन ढवळून निघेल. ह्या कालावधीत विवाहेच्छुक व्यक्ती इतरांकडे आकर्षित होतील. ह्या दरम्यान आपणास आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. ह्या दिवसात खाण्या - पिण्यावर संयम न ठेवल्यास पोटाच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता आहे.
कुंभ रास 
मंगळाचे हे गोचर भ्रमण आपल्या षष्ठ स्थानातून म्हणजेच रोग व शत्रू स्थानातून होत आहे, जे आपल्यासाठी चिंताजनक आहे. ह्या दरम्यान आपल्या शत्रूत व रोगात वाढ होऊ शकते. अशावेळी इतरांच्या बाबतीत हस्तक्षेप केल्याने आपलेच नुकसान होऊ शकते. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटू शकते. ह्या दरम्यान विद्यार्थ्यांनी वाईट संगती पासून दूर राहणे उचित ठरेल. ह्या कालावधीत आपले खर्च वाढतील. 
मीन रास 
आपल्या पंचमातून म्हणजेच संतती स्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. त्यामुळे आपल्या संततीचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असून आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. कोणाशी गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घेणे हे उत्तम. ह्या दरम्यान प्रणयी जीवनात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असून एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून दगा फटका होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रणयी जीवनात मात्र विचारपूर्वक पुढील वाटचाल करावी. नोकरी करणाऱ्यांना ह्या कालावधीत काही लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम