३० मार्च पासून एकाच राशीत असतील मंगळ, गुरु व शनी - आपल्या राशीवर त्याचा काय परिणाम होईल हे जाणून घ्या

मनुष्य वा मानव जातीवर ग्रह, नक्षत्र व राशींच्या होत असणाऱ्या परिणामांची आपणास चांगलीच जाणीव आहे. मात्र, अनेकदा आपल्या निश्चित मार्गावर ठराविक गतीने भ्रमण करत ग्रह एखाद्या राशीत एकाचवेळी एकत्र येत असतात. एक किंवा त्याहून अधिक ग्रह एका राशीत एकत्र येण्याच्या घटनेस वैदिक ज्योतिष शास्त्रात युती, महायुती, संयोजन किंवा महासंयोजन इत्यादी नांवाने ओळखण्यात येते. अशा युतीत असलेल्या ग्रहांची संख्या व त्यांच्या क्षमतेनुसार प्राणी मात्रावर परिणाम होत असतो. जेव्हा एखाद्या राशीत ग्रहांची संख्या एकाहून अधिक असते तेव्हा त्यांच्यात घर्षण सुद्धा वाढत जाते, परंतु अनेकदा एका राशीत तीन, चार किंवा पाचाहून अधिक ग्रह सुद्धा एकत्रित येतात. एका राशीत ग्रहांनी एकत्र येण्यास ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्व प्राप्त होते. अशा स्थितीत सामान्य जन मानसावर ह्या ग्रहांचे मिश्रण व अनिश्चित परिणाम होताना दिसून येतात. 

सध्याच्या स्थितीचा विचार करता आगामी ३० मार्च पासून एक अशीच महायुती मकर राशीत होत आहे. सध्या मकर राशीत मंगळ व शनी ह्यांची युती असून दि. ३० मार्च रोजी गुरुच्या मकर राशीतील प्रवेशामुळे मंगळ व शनीची युती महायुतीत परिवर्तित होईल. हि महायुती ३० मार्च २०२० पासून मकर राशीत कार्यान्वित होईल. मकर राशीतील हि महायुती ४ मे पर्यंत राहणार आहे. मकर राशीत तीन महत्वाच्या व शक्तिशाली ग्रहांची उपस्थिती राशिचक्राच्या माध्यमातून प्राणीमात्रावर अनेक प्रकारे शुभाशुभ परिणाम करणारी आहे. आमच्या ज्योतिषांनी विविध राशीवर ह्या महायुतीचा परिणाम खोलवर अभ्यासून आपल्या वाचकां पर्यंत पोचविण्याचे कार्य केले आहे. 

मेष रास 
मकर राशीत होणारी मंगळ, गुरु व शनी ह्यांची महायुती हि आपल्या दशमस्थानी होत आहे. कुंडलीचे दशमस्थान हे कर्म, व्यापार, कारकीर्द, पद, वैभव, समृद्धी, सर्वोच्च पद, सार्वजनिक जीवन व मान - सन्मानाशी संबंधित स्थान आहे. कुंडलीचे दशमस्थान हे केंद्रापैकी एक स्थान असून त्यास अत्यंत महत्व आहे. मेष राशीच्या दशमात होणारी मंगळ, गुरु व शनी ह्यांची हि महायुती जातकाच्या जीवनातील जवळपास सर्वच क्षेत्रांना प्रभावित करणारी आहे. मकर राशीतील हि महायुती मेष राशीच्या जातकांच्या कारकिर्दीवर प्रतिकूल परिणाम करू शकते. ह्या दरम्यान कारकीर्द व व्यावसायिक जीवनात सुद्धा आपणास अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम व गंभीर प्रयत्ना नंतरच यश प्राप्तीची शक्यता आहे. मात्र, ह्या दरम्यान आपणास विदेशी योजनेत सहभागी होण्याची संधी सुद्धा मिळू शकते. ह्या महायुती दरम्यान मेष व्यक्तींनी आपल्या वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला त्यांना देण्यात येत आहे. गूढ विषयांवर खर्च होण्याची शक्यता आहे, काही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रणयी जीवनावर सुद्धा ह्या महायुतीचा प्रतिकूल परिणाम होताना दिसून येईल. ह्या दरम्यान आपल्या जोडीदाराच्या विचारांचा सन्मान करावा. 

वृषभ रास 
मकर राशीत मंगळ, गुरु व शनी ह्यांची होत असलेली हि महायुती हि आपल्या नवमस्थानी होत आहे. नवमस्थान ह्यास भाग्यस्थान असे हि म्हणतात. ह्या स्थानावरून धर्म, गुरु, आध्यात्मिकता, परदेशगमन, वैभव व संन्यास ह्याचा बोध होतो. दक्षिण भारतात ह्या स्थाना वरून पितृसौख्य सुद्धा बघतात, मात्र उत्तर भारतात पितृसौख्य हे दशमस्थाना वरून बघण्यात येते. मकर राशीत होणारी मंगळ, गुरु व शनीची महायुती कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल असल्याचे दिसत आहे. ह्या दरम्यान कामाच्या ठिकाणी आक्रमकता वाढेल, ज्यामुळे नोकरी किंवा व्यावसायिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ह्या दरम्यान परिस्थिती आपणास नोकरी बदलण्यास भाग पाडू शकते. मात्र, ह्या दरम्यान आर्थिक स्थिती प्रबळ राहणे अपेक्षित असून आपल्या योग्यतेनुसारच आपण आर्थिक लाभ प्राप्त करू शकाल. मकर राशीतील मंगळ, गुरु व शनीची महायुती आपल्या प्रणयी जीवनास अनुकूल परिस्थिती निर्माण करताना दिसत आहे. ह्या दरम्यान प्रणयी जीवनातील उब व प्रेम वाढण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपल्या प्रेम संबंधाच्या बाबतीत आपण मानसिकदृष्ट्या पूर्णतः स्पष्ट व सकारात्मक राहाल. ह्या दरम्यान आपणास आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहून कोणत्याही लहान - मोठ्या आरोग्य विषयक समस्येस गंभीरपणे घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्याचे कारण असे कि मकर राशीतील मंगळ, गुरु व शनीची हि महायुती वृषभ व्यक्तींच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करणारी आहे. 

मिथुन रास 
मकर राशीत मंगळ, गुरु व शनीची होत असलेली हि महायुती मिथुन जातकांच्या अष्टमातून होत आहे. कुंडलीचे अष्टमस्थान हे आयुष्य भाव ह्या नांवाने ओळखले जाते. ह्याचा संबंध जातकाचा मृत्यू, वारसा, दुर्घटना, भयंकर नुकसान, वैराग्य, आत्महत्या, अनपेक्षित मृत्यू, गुप्त धन, अचानक धनलाभ, गूढ विद्या, दीर्घकालीन आजार व महिलांच्या पतीचे आयुष्य ह्यांच्याशी येतो. मकर राशीतील हि महायुती मिथुन व्यक्तींच्या कारकिर्दीत तणावाची परिस्थिती निर्माण करू शकते. ह्या दरम्यान कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हि महायुती असता आपणास प्रणयी जीवनाच्या बाबतीत सावध राहावे लागेल. ह्याचे कारण असे कि ह्या दरम्यान संबंधात नकारात्मकता वाढण्याची शक्यता आहे. ह्या कालखंडात मिथुन व्यक्तींच्या संबंधांची परीक्षा घेतली जाईल. ह्या दरम्यान पाठदुखी व खांदेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विषयक काळजी घ्यावी लागेल. 


कर्क रास 
मकर राशीत होत असलेली मंगळ, गुरु व शनीची महायुती हि आपल्या सप्तमात होत आहे. कुंडलीच्या सप्तमस्थानास एक विशेष महत्व असून हे कलत्र स्थान ह्या नांवाने सुद्धा संबोधले जाते. ह्या भावाचा संबंध पती, पत्नी, भागीदार, दांपत्य सौख्य, सार्वजनिक व सामाजिक जीवन, प्रजनन अवयव, घटस्फोट व जल प्रवास ह्यांच्याशी येतो. मकर राशीतील मंगळ, गुरु व शनीची महायुती कर्क राशींच्या व्यक्तींच्या जीवनावर सरासरी परिणाम करणारी आहे. ह्या दरम्यान कर्क राशीच्या व्यक्ती आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकतील. ह्या दरम्यान केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात चांगला परतावा मिळू शकेल. उत्तम प्राप्ती करण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ह्या महायुतीच्या प्रभावामुळे कर्क व्यक्ती एखाद्या खास व्यक्तीकडे अधिक आकर्षित होण्याची शक्यता आहे. प्रेम प्राप्त करण्याची आपली प्रबळ इच्छा आपणास प्रभावित करेल. सध्या जे प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठी हि महायुती असतानाचे दिवस सुखद व पूर्ण प्रेमाने भरलेले असतील. मात्र, आपणास कारकीर्द व आरोग्यावर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्या दरम्यान आपणास कारकीर्द किंवा व्यावसायिक जीवनात तणावांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी संवाद साधताना आपल्या शब्दांची निवड अत्यंत सावधपणे व धीराने करावी लागेल. ह्या दरम्यान आपले गंभीर प्रयत्न व कठोर परिश्रम आपणास कारकिर्दीत लाभ मिळवून देण्याचे कार्य करू शकतील. आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक होऊन अत्यंत जोखमीचे शारीरिक कार्य करण्या पासून दूर राहावे. मानसिक शांततेसाठी आपल्या जेवणाच्या व झोपण्याच्या वेळेकडे विशेष लक्ष द्यावे. 

सिंह रास 
मकर राशीतील मंगळ, गुरु व शनीची महायुती हि आपल्या षष्ठ स्थानात होत आहे. षष्ठ स्थानास शत्रू स्थान असे हि संबोधले जाते. ह्या स्थानाचा संबंध जीवनातील पीडा, रोगाचा कालावधी, शत्रू, दैनिक कार्य, आजारपण, कर्ज, उधारी, शस्त्रक्रिया इत्यादी संवेदनशील क्षेत्रांशी येतो. मकर राशीतील हि महायुती सिंह राशीच्या व्यक्तींसाठी विशेष अनुकूल परिस्थिती निर्माण करत असल्याचे दिसत नाही. ह्या दरम्यान वरिष्ठ किंवा उच्च पदस्थ ह्यांच्याशी संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, आपण आपल्या कठोर परिश्रमाने व गंभीर प्रयत्नाने आपले स्थान सुरक्षित ठेवू शकाल.  ह्या दरम्यान नवीन गुंतवणूक करण्या ऐवजी जुन्या गुंतवणुकीचा आढावा घेणे हितावह राहील. प्रणयी जीवनात व संबंधात तणावपूर्ण स्थिती टाळण्यासाठी आपल्या जोडीदाराशी अनावश्य्क वाद घालणे टाळावे. त्यांच्या विचारांचा मान राखून गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करावा. आरोग्य स्थिर ठेवण्यासाठी हलका व्यायाम, योगासन व ध्यान - धारणा करण्यासाठी थोडा वेळ काढावा. 

कन्या रास 
मकर राशीत होत असलेली मंगळ, गुरु व शनीची महायुती हि आपल्या पंचमस्थानी होत आहे. कुंडलीचे पंचमस्थान हे संतती व विद्यास्थान ह्या नांवाने सुद्धा ओळखले जाते. ह्या स्थानाचा संबंध संततीशी होणारे व्यवहार, संतती सौख्य, मंत्र - तंत्र, ज्ञान, गूढ ज्ञान, उपासना, सट्टा, जुगार, लॉटरी, आध्यात्मिक ज्ञान, गर्भावस्था, स्मरणशक्ती इत्यादी महत्वाच्या बाबीशी येतो. आपल्या कार्यस्थळी आपण आशावादी राहाल व आपले सहकारी आपल्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपले कौतुक करतील. ह्या दरम्यान निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीस वाढण्या पासून थोपवून ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील. वरिष्ठ व उच्च पदस्थ ह्यांच्याशी वाद व संघर्ष होण्याची शक्यता आहे. मात्र मंगळ, गुरु व शनीची हि महायुती आपणास आर्थिक दृष्ट्या सबळ करू शकेल. ह्या दरम्यान आपली आर्थिक स्थिती उंचावण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपणास प्रणयी जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराच्या विचारांचा मान ठेवावा लागेल, स्त्री जातकांना आपल्या प्रणयी जीवनाच्या भविष्याची चिंता सतावू शकते. मंगळ, गुरु व शनीची महायुती आरोग्य स्थिर ठेवण्याची शक्यता दिसत आहे. आपली ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या खाण्या - पिण्यावर व विश्रांतीवर विशेष लक्ष द्यावे. 


तूळ रास 
मकर राशीत मंगळ, गुरु व शनीची होत असलेली महायुती हि आपल्या चतुर्थस्थानी होत आहे. कुंडलीचे चतुर्थस्थान हे सुखस्थान ह्या नांवाने सुद्धा ओळखले जाते. ह्या स्थानाचा संबंध सुख, बुद्धिमत्ता, घर, वाहन, जमीन, स्थावर, तृष्णा, लालसा, महत्वाकांक्षा ह्यांच्याशी येतो. मंगळ, गुरु व शनीची हि महायुती तूळ व्यक्तींना जीवनातील बहुतेक सर्वच महत्वाच्या क्षेत्रात प्रतिकूल परिणाम देण्याचे कार्य करू शकते. ह्या दरम्यान तूळ राशीच्या व्यक्तींना कारकीर्द किंवा व्यावसायिक जीवनात विकासाची योग्य दिशा मिळू शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बहुदा स्थानांतराचा सामना करावा लागू शकतो, मात्र दीर्घकाळा नंतर त्यांना ह्या स्थानांतराचा सुद्धा फायदा होऊ शकेल. ह्या दरम्यान आर्थिक लाभ आपणास सुखावून जाईल. आर्थिक व्यवस्थापन कौशल्यात वाढ होईल. गुंतवणूक करण्यास हा कालखंड अनुकूल आहे. प्रणयी जीवनात सकारात्मक व अनुकूल बदल होत असल्याचे दिसून येईल. आपले कुटुंबीय, मित्र व खास व्यक्तीच्या सहवासात आनंदाचे क्षण घालवू शकाल. मात्र मंगळ, गुरु व शनीची हि महायुती असताना आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ह्या दरम्यान प्रवासात सावध राहावे लागेल, एखादी दुखापत किंवा दुर्घटना संभवते. व्यायाम व योग साधने द्वारा मानसिक शांती मिळविण्याचा प्रयत्न करावा.

वृश्चिक रास 
मकर राशीत मंगळ, गुरु व शनीची होत असलेली महायुती हि आपल्या तृतीय स्थानातून होत आहे. ह्या स्थानास पराक्रम स्थान असे हि संबोधण्यात येते. ह्या स्थानाचा संबंध पराक्रम, साहस, मित्र, छोटे प्रवास, संगीत, महत्वाचे बदल, दलाली व शौर्य इत्यादी क्षेत्रांशी येतो. ह्या दरम्यान व्यावसायिक जीवनात सरासरी परिणाम मिळण्याची शक्यता आहे. हि महायुती असता आपणास आपल्या कारकिर्दीत किंवा व्यवसायात आपले अधिकतम योगदान देण्यासाठी आपल्या गुण - दोषांचा विचार करावा लागेल. ह्या दरम्यान वृश्चिक व्यक्तींचा आत्मविश्वास व संवाद कौशल्य वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत फारसा बदल होत असल्याची शक्यता दिसत नाही. कोणत्याही प्रकारे अचानक खर्चाची शक्यता सुद्धा दिसत नाही, मात्र झटपट पैसे कमविण्याचा प्रयत्न करू नका. मकर राशीत मंगळ, गुरु व शनी ह्यांची महायुती असताना आपणास स्वतःला मित्र व प्रियजनां पासून दूर असल्याचे जाणवेल. ह्या दरम्यान आपले प्रणयी जीवन व प्रियजनांस अधिक वेळ देण्याचा प्रयत्न करावा लागेल. हि महायुती असता आपले आरोग्य स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. 

धनु रास 
मकर राशीत मंगळ, गुरु व शनी ह्यांची होत असलेली महायुती आपल्या द्वितीय स्थानी होत आहे. कुंडलीचे द्वितीय स्थान हे धन स्थान किंवा कुटुंब स्थान ह्या नांवाने ओळखले जाते. ह्याचा संबंध चल - अचल संपत्ती, कुटुंब, वाणी, वंश, धनसंग्रह, रत्न, लाभ - नुकसान, महत्वाकांक्षा व वारसागत संपत्ती ह्यांच्याशी येतो. मकर राशीतील हि महायुती धनु राशीच्या व्यक्तींना कारकीर्द किंवा व्यावसायिक जीवनात काही अडचणी येण्याकडे अंगुली निर्देश करत आहे. ह्या दरम्यान आपले वरिष्ठ व उच्च पदस्थ ह्यांच्याशी वाद किंवा संघर्ष टाळावेत. ह्या दरम्यान वडीलधारी, अनुभवी व विशेषतः स्त्री वर्ग आपल्या व्यावसायिक जीवनात महत्वाची भूमिका बजावतील. ह्या दरम्यान आपला आर्थिक विकास संभवतो. आपल्या बौद्धिक निर्णयाने आर्थिक लाभ संभवतो. हि महायुती धनु राशीच्या व्यक्तींसाठी प्रणयी जीवनात अनुकूल परिस्थिती निर्माण करत असल्याचे दिसत आहे. ह्या दरम्यान अशा व्यक्तींनी आपल्या प्रेम संबंधांना पुढील स्तरावर नेण्याचा प्रयत्न करावा. हि महायुती असता आपले स्वास्थ्य सरासरी राहण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपले आरोग्य टिकविण्यासाठी आपणास योग साधना व व्यायामासाठी वेळ काढावा लागेल. आपल्या झोपण्याकडे व आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. ह्या दरम्यान आरोग्य विषयक कोणतीही मोठी समस्या असल्याचे दिसत नाही. 

मकर रास 
मकर राशीत मंगळ, गुरु व शनीची होत असलेली महायुती हि आपल्या प्रथम स्थानातूनच होत आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात प्रथम स्थानास अनन्य साधारण महत्व देण्यात आले आहे. ह्यास लग्न स्थान असे हि संबोधण्यात येते. ह्या स्थानाचा संबंध व्यक्तीची शरीरयष्टी, चारित्र्य, महत्वाकांक्षा, स्वप्रयत्न, स्वरूप, मनोवृत्ती, मस्तक, संतोष, बळ, कीर्ती व मनोबलाशी येतो. मकर राशीत होत असलेली मंगळ, गुरु व शनीची महायुती मकर व्यक्तींना कारकीर्द व व्यावसायिक जीवनात सरासरी परिणाम देत असल्याचे दिसत आहे. ह्या दरम्यान कामाच्या ठिकाणी इतरांशी संबंधात गोडवा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. योग्य वेळी उचललेले योग्य पाऊल आपणास यश प्राप्ती होण्यास मदतरूप ठरेल. आर्थिक स्थितीवर काही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसून येईल. कुटुंबियांच्या आरोग्यासाठी खर्च करावा लागू शकतो. इच्छित आर्थिक लाभ न मिळाल्याने आपणास निराशेस सामोरे जावे लागू शकते. मकर राशीत होत असलेली हि महायुती आपल्या प्रणयी जीवनावर प्रतिकूल परिणाम करत असल्याचे दिसत आहे. मात्र असे असले तरी आपल्या प्रणयी जीवनास सकारात्मक दिशेने पुढे नेण्याचे कार्य हि महायुती करेल. ह्या दरम्यान आरोग्य विषयक अधिक काळजी करण्याची आवश्यकता नसली तरी आवश्यक पाऊल उचलण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या दरम्यान आपले आरोग्य उंचावण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल.
 

कुंभ रास 
मकर राशीत मंगळ, गुरु व शनी ह्यांची होत असलेली महायुती हि आपल्या व्ययस्थानी होत आहे. ह्या स्थानाचा संबंध जीवनातील खर्च, व्यय, भोगविलास, राजभय, कैद, परदेशगमन, शय्यासुख व नुकसान ह्यांच्याशी येतो. मकर राशीतील हि महायुती कुंभ व्यक्तींच्या कारकिर्दीशी व व्यवसायाशी संबंधित अनेक गोष्टींवर परिणाम करू शकतो. ह्या दरम्यान कुंभ व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायात अधिक व्यस्त राहतील. असे असले तरी आपण आपली कामे ठराविक वेळेत पूर्ण करू शकणार नाही. जी कामे आपल्या कडून होऊ शकत नसतील ती आपण हाती घेऊ नये. कामा निमित्त परदेश प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान खर्च वाढण्याची शक्यता आहे. वायफळ बाबीत स्वतःला गुंतवून घेऊ नये. मकर राशीतील मंगळ, गुरु व शनी ह्यांची महायुती आपल्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम करण्याची शक्यता आहे. तसेच ह्या दरम्यान प्रणयी जीवनात सुद्धा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येते. ह्या दरम्यान आपल्या प्रिय व जिवलग व्यक्तीशी आपले मतभेद वाढण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान अनिश्चितता व भ्रम सुद्धा पसरविला जाऊ शकतो. त्यामुळे आपले संबंध व नात्यांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. हि महायुती असता कोणताही मोठा आजार किंवा दुर्घटना होण्याची शक्यता नसली तरी आपली आंतरिक उत्कंठा आपणास त्रासदायी ठरू शकते. ह्या दरम्यान आपणास मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

मीन रास 
मकर राशीत मंगळ, गुरु व शनी ह्यांची होत असलेली महायुती हि आपल्या लाभस्थानात होत आहे. ह्या स्थानाचा संबंध दैनंदिन लाभ, इच्छाशक्ती, मंगल कार्य, यश, कीर्ती, सार्वजनिक जीवन, अधिक लाभ, महत्वाकांक्षा व विकास ह्यांच्याशी येतो. मकर राशीत होणारी मंगळ, गुरु व शनीची महायुती मीन व्यक्तींच्या कारकिर्दीय व व्यावसायिक जीवनासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. ह्या दरम्यान आपण दृढ संकल्पित, समर्पित व भावनाशील व्हाल. सहकाऱ्यांचे उत्तम समर्थन व महत्वाच्या बाबीत भाग्याची साथ आपणास प्रगती करण्यास प्रेरित करेल. ह्या दरम्यान आपणास आर्थिक स्थैर्य लाभू शकते. ह्या दरम्यान आर्थिक लाभ होण्याची शक्यता प्रबळ होत असल्याचे दिसत आहे. असे असले तरी मकर राशीत होणारी मंगळ, गुरु व शनीची हि महायुती प्रणयी जीवनात व नाते संबंधात सावध राहण्याचे आपणास सूचित करत आहे. ह्या दरम्यान आपल्या जोडीदाराशी निष्कारण वाद किंवा चर्चा टाळण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल. ह्या दरम्यान आपल्या संबंधात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हि महायुती कोणत्याही प्रकारच्या आरोग्य विषयक समस्येचा सामना करण्यास आपणास मदतरूप ठरेल. ह्या दरम्यान आपण उर्जावान व उत्साहित राहाल. ह्या कालखंडात आपले आरोग्य स्थिर ठेवण्यासाठी आपणास स्वयं प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 

आपल्या व्यक्तिगत समाधानासाठी आमच्या तज्ञ ज्योतिषांशी आत्ताच बोला! 

गणेशकृपेने,
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम