वृषभ राशीतून होणार अंगारक दोष: आपल्या राशीवर त्याचा काय परिणाम होईल व त्यावर काय उपाय करावा हे जाणून घ्या

सध्या मेष राशीतून भ्रमण करत असलेला सौर मंडळाचा सेनापती मंगळ हा २२ फेब्रुवारी २०२१ रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. येथे तो १३ एप्रिल २०२१ पर्यंत राहील. वृषभेत आधीच राहू बिराजमान असल्याने, मंगळाचे वृषभ राशीतील भ्रमण हे त्याच्या इतर गोचर भ्रमणांहून अधिक महत्वाचे आहे. हे दोघे एकत्र आल्याने वृषभेत अंगारक दोष निर्माण होणार आहे. असे असले तरी अंगारक दोषा वरील उपाय केल्याने त्याच्या दुष्परिणामातून मुक्तता होऊ शकते. येथे आपण मंगळ - राहूने निर्माण झालेल्या अंगारक दोषाचा विविध राशींवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊ या. 

विविध राशींवर मंगळ - राहू (अंगारक दोष) चा प्रभाव 


मेष रास 

मेष राशीसाठी हा दोष द्वितीय स्थानातून होत आहे. मंगळ व राहू हे निसर्गतः शत्रू ग्रह असल्याने त्यांचा एकमेकांशी असलेला सहवास विशेष अनुकूल समजला जात नाही. ह्या दोघांच्या सहवासाने अंगारक दोषाची निर्मिती होते. मेष राशीच्या जातकांना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्या पासून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत संपर्कांशी संबंधित त्रासांना सामोरे जावे लागू शकते. ह्या दरम्यान आपणास लोकांशी संवाद साधताना काळजी घ्यावी लागेल. विशेषतः आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात आपले सहकारी, मित्र, वरिष्ठ, व कनिष्ठ ह्यांच्याशी संवाद साधताना अधिक साधे व सरळ राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. मंगळ व राहू ह्यांचा सहवास असता आपण कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नये. ह्या दरम्यान आपली किंवा आपल्या कुटुंबीयांपैकी एखाद्याची प्रकृती बिघडू शकते. आपणास नेत्र विकार किंवा पायदुखीचा त्रास होऊ शकतो. हा कालावधी प्रणयी जीवनासाठी चांगला आहे. आपण आपल्या कुटुंबियांसह किंवा प्रिय व्यक्तीसह एखादा प्रवास करू शकाल. संपत्तीशी संबंधित कामात अडथळे येऊ शकतात. विद्यार्थ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. असे असले तरी अंगारक दोष निवारणाचे उपाय करून मंगळ - राहूच्या दुष्परिणामां पासून सुटका करून घेता येऊ शकते. 

वृषभ रास 

मंगळ - राहुचा सहवास आपल्याच राशीतून होत असल्याने आपल्यासाठी हा सहयोग विशेष असणार आहे. मंगळ - राहूचा सहवास आपल्याच राशीतून अंगारक दोष निर्माण करत असल्याने आपणास आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपल्याच राशीतून होणारा हा दोष आपणास अनपेक्षितपणे एखादा अप्रिय असा प्रवास करावयास लावू शकतो. ह्या राशीच्या विद्यार्थ्यांना मात्र हा दोष त्यांच्या कष्टाचा चांगला परिणाम मिळवून देऊ शकेल. ह्या राशीच्या महिलांसाठी हा दोष विशेष अनुकूल असून ह्या दरम्यान त्यांना आपल्या कुटुंबीयांसह अधिक वेळ घालविण्याची संधी मिळेल. ह्या दरम्यान ह्या राशीच्या विवाहेच्छुकांनी विवाहा संबंधी निर्णय घेण्याची घाई करू नये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एप्रिल पर्यंत त्यांच्या योग्य अशी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी १२ फेब्रुवारी ते २० मार्च हा कालावधी खूपच चांगला आहे. 

मिथुन रास 

मंगळ - राहूचा सहवास आपल्या व्ययस्थानातून होत आहे. ह्या स्थानास मोक्षस्थान असे हि संबोधण्यात येते. आपल्या व्ययातून अंगारक दोष असता आपणास आपल्या दीर्घकाळा पासून चालत आलेल्या कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या दरम्यान आपली फसवणूक होण्याच्या शक्यतेमुळे कोणाला उसने पैसे देताना किंवा कोणाकडून कर्ज घेताना सुद्धा सावध राहावे. ह्या राशीच्या महिलांना गुप्त रोगांना सामोरे जावे लागू शकते. वडीलधाऱ्यांना गुढघे दुखीचा त्रास संभवतो. ह्या दरम्यान आपणास आपल्या आरोग्याची व वाहन चालवताना सुद्धा काळजी घ्यावी लागेल. व्यापाऱ्यांना तसेच निर्मिती क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या जातकांना थोडा धीर धरावा लागेल. ह्या दरम्यान आपणास कामाची नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी कष्ट वाढवावे लागतील. ह्या दरम्यान संघर्षरत अभिनेता किंवा स्टंट करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. 

कर्क रास 

कर्क राशीच्या लाभस्थानातून मंगळ - राहूचे एकत्रितपणे भ्रमण होत आहे. लाभस्थानातून होणारे हे भ्रमण आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. ह्या दरम्यान दीर्घकाळा पासून आजारी असलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपले कौटुंबिक वातावरण सुद्धा चांगले राहील. तसेच ह्या दरम्यान आपण एखाद्या नवीन घराची किंवा संपत्तीची खरेदी करू शकाल. ह्या दरम्यान व्यापारी व वाणिज्य सेवेशी संबंधित जातकांना चांगला लाभ होऊ शकतो. ह्या दरम्यान शेअर्स बाजाराशी संबंधित कार्यात सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपल्या खर्चात सुद्धा वाढ होईल. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड उत्तम आहे. प्रेमीजनांना ह्या कालखंडात लाभ होईल. आपणास विवाहाचा प्रस्ताव मान्य होऊ शकतो. कुटुंबीय व प्रिय व्यक्तीच्या सहवासात आपला वेळ चांगला जाईल. 

सिंह रास 

आपल्या दशमातून मंगळ - राहूचे भ्रमण होत आहे. दशमस्थान हे कुंडलीतील एक केंद्रस्थान असून आपले कर्म व पित्याशी ह्याचा संबंध येतो. ह्या कालखंडात आपणास आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आपल्या आहारात पौष्टिक व आरोग्यदायी वस्तूंचा समावेश करून मसालेदार भोजना पासून दूर राहावे. आपल्या पैतृक संपत्तीशी संबंधित कार्यात आपले नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे हि कामे टाळण्याचा प्रयत्न करावा. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. नवीन संपत्ती किंवा घर घेण्यासाठी हे दिवस अनुकूल असले तरी त्यात सतर्क व सावध राहावे. नागरी सेवेशी संबंधित जातकांना आपल्या वरिष्ठांशी वाद न घालण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या कालखंडात आपणास जीवनात अचानकपणे होणाऱ्या बदलास सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल.

कन्या रास 

आपल्यासाठी मंगळ - राहूचा हा सहवास आपल्या नवमातून होत आहे. नवमस्थान हे भाग्यस्थान ह्या नांवाने ओळखण्यात येते. ह्या दरम्यान आपणास आरोग्याची काळजी करावी लागणार नाही. आरोग्या विषयी आपण निश्चिन्त राहू शकता. ह्या दरम्यान आपल्या व्यवहारात मात्र काही बदल होऊ शकतो. ह्या बदलांवर लक्ष देऊन त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करावा. आवेशात येऊन किंवा रागारागाने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा. भागीदारीत काम करणाऱ्यांना आपल्या भागीदाराशी असलेल्या संबंधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. वडिलधाऱ्यांनी दूरवरचे प्रवास टाळावेत. आपल्या प्रणयी जीवनास पुढे नेण्यासाठी हे दिवस अनुकूल आहेत. असे असले तरी आपल्या जोडीदाराच्या विचारांना आपणास मान द्यावा लागेल. 

तूळ रास 

मंगळ - राहूचा सहवास हा आपल्या अष्टमातून होत आहे. हा भाव आयुष्य किंवा मृत्यू स्थान ह्या नांवाने सुद्धा ओळखले जाते. हे दिवस आपल्यासाठी काहीसे आव्हानात्मक असू शकतात. ह्या दरम्यान आपल्या जीवनात ज्या व्यक्ती येतील त्या आपल्यासाठी योग्य नसतील. त्याच बरोबर आपणास काही आर्थिक समस्यांना सुद्धा सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थी आपल्या कारकिर्दीचे लक्ष्यांक गाठण्याच्या जवळ येऊन पोचल्याने त्यांच्यासाठी हे दिवस खूपच अनुकूल आहेत. ह्या दरम्यान आपण काही मित्रांपासून दुरावले जाण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक रास 

वृश्चिक राशीच्या सप्तमातून मंगळ - राहूचे एकत्रितपणे भ्रमण होत आहे. सप्तमस्थान हे वैवाहिक जीवना खेरीज सर्व प्रकारच्या भागीदारीशी संबंधित स्थान आहे. हे भ्रमण चालू असता वृश्चिक राशीच्या वडीलधाऱ्या व्यक्तींनी आपल्या प्रकृतीची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. घशाशी संबंधित शस्त्रक्रिया किंवा स्त्री रोगाशी संबंधित समस्या होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय किंवा नवीन योजना ह्यांचे काम सुरु करण्यासाठी हे दिवस अनुकूल आहेत. मानसिक शांततेसाठी आपण आध्यात्मिक मार्गाने जाऊ शकता. व्यावसायिक व नोकरी करणाऱ्यांसाठी हे भ्रमण समतोल साधणारा आहे. ह्या दरम्यान नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या कामात चढ - उतारांचा सामना आपणास करावा लागेल. हि परिस्थिती काही काळा पुरतीच असल्याने त्यास धैर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न करावा. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. 

धनु रास 

धनु राशीच्या षष्ठ स्थानातून मंगळ - राहूचे भ्रमण होत आहे. षष्ठ स्थान ह्यास शत्रू स्थान असे हि म्हणण्यात येते. हे भ्रमण धनु राशीच्या जातकांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता दर्शवित आहे. ह्या दरम्यान आपण आपल्या गुप्त शत्रूंवर मात करू शकाल. तसेच आपणास काही अनपेक्षित लाभ सुद्धा होऊ शकतात. चिकित्सा क्षेत्राशी संबंधित जातकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास यशस्वी होतील. ह्या दरम्यान धनु राशीच्या विद्यार्थ्यांना आपल्या अध्ययनावर लक्ष केंद्रित करावे लागेल व आपले कष्ट वाढवावे लागतील. तसेच त्यांच्या पालकांना त्यांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल. वडीलधाऱ्या व्यक्ती आपल्या कुटुंबियांसाठी व स्वतःसाठी काही महत्वाचे निर्णय घेऊ शकतील. प्रेमीजनांसाठी सुद्धा हे दिवस अनुकूल आहेत. अंगारक दोषांच्या उपायाने दोष निवारण करता येऊ शकेल. 

मकर रास 

मंगळ - राहूचे भ्रमण हे आपल्या पंचमातून होत आहे. पंचमस्थान हे विद्या व संततीशी संबंधित स्थान आहे. हा कालखंड आपल्यासाठी काहीसा प्रतिकूल असू शकतो. आपल्या जीवनात काही अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घाईघाईत कोणताही निर्णय न घेण्याचा व निर्णय घेण्यापूर्वी सारासार विचार करण्याचा प्रयत्न करावा. ह्या दरम्यान यश प्राप्तीची शक्यता कमी असल्याने नवीन व्यवसायाची सुरवात किंवा नोकरीत बदल करू नये. आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन योग्य ती काळजी घ्यावी. ह्या दरम्यान आपण नवीन मैत्री करू शकाल. हि मैत्री आपणास इच्छित लक्ष्यांक गाठण्यासाठी मदतरूप होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हे दिवस अनुकूल असल्याने त्यांनी ह्या स्थितीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. वैद्यकीय किंवा तांत्रिक विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी हे दिवस जास्त अनुकूल असून त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. 

कुंभ रास 

अंगारक दोष हा आपल्या चतुर्थ स्थानातून होत आहे. चतुर्थ स्थानाचा संबंध सुख व मातेशी येतो. मंगळ - राहूचे हे भ्रमण आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. ह्या दरम्यान आपण नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी व प्रेमीजनांसाठी हे दिवस अनुकूल आहेत. कुंभ राशीच्या ज्या व्यक्ती जाहिरात क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा एखाद्या कारखान्यात काम करत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे दिवस अनुकूल आहेत. कुंभ राशीच्या व्यक्ती आध्यात्मिकतेकडे अधिक प्रमाणात वळतील व जास्तीत जास्त धार्मिक प्रवृत्तीत सहभागी होतील. आपण स्वतःला सामाजिक प्रवृत्तीत सुद्धा व्यस्त ठेवू शकाल. ह्या दरम्यान आपल्या आर्थिक समस्या दूर होतील. 

मीन रास 

मंगळ - राहूचे भ्रमण हे आपल्या तृतीय स्थानातून होत आहे. तृतीय स्थान हे पराक्रम व शौर्य ह्यांच्याशी संबंधित आहे. आपल्यासाठी हे भ्रमण आरोग्य व आर्थिक दृष्ट्या अत्यंत चांगले असू शकते. मीन राशीचे जे जातक नवीन काही करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता प्रदान करणारा आहे. ह्या दरम्यान आपणास नृत्य, चित्रकला, गायन, बागायत, मातीची भांडी इत्यादी गोष्टी शिकण्याची इच्छा होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे दिवस अनुकूल आहेत. योग्य दिशेने मेहनत करून शासकीय नोकरीचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते. अभिनय व बँकिंग क्षेत्राशी संबंधित जातकांसाठी सुद्धा हे दिवस अनुकूल व लाभदायी आहेत. प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. आपण आपल्या जोडीदारासह मिणमिणत्या दिव्याखालील रात्री भोजन, प्रेमालाप व दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल.   

अंगारक दोष निवारणासाठीचे उपाय 

- मंगळवारी उपवास करावा. तसेच मंगळ ग्रहाच्या बीज मंत्राचा जप केल्यास अंगारक दोषाचे दुष्परिणाम दूर होतात. 
- मारुतीचे पूजन व त्यांची आराधना करून अंगारक दोषाचे दुष्परिणाम दूर करता येतात. 
- मंगळ व राहुशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने सुद्धा अंगारक दोषाचे निवारण होऊ शकते. 
- उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करावा. 
- काळ्या कुत्र्यास गूळ किंवा साखर मिश्रित गोड पोळी खाऊ घालावी. 
- एखाद्या चांदीच्या वस्तूचे दान करावे.
- राहूसाठी दोन रंगाचे ब्लॅंकेट व मंगळासाठी लाल रंगाच्या वस्तू दान कराव्यात. 

श्री गणेशजींच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम