७ मे २०१९ पासून मिथुन राशीत होईल मंगळ - राहू चा अंगारक योग, त्याचा काय परिणाम आपल्या कुंडलीवर होईल


नेहमीच ग्रह एकमेकांच्या युतीत येत असतात, मात्र ते नेहमीच नुकसानदायी नसतात. परंतु, मंगळ - राहू ची युती अनेकदा त्रासदायी ठरते. जेव्हा हि युती अशुभस्थानी असते, तेव्हा ती त्रासदायी ठरतेच. इतकेच नव्हे तर कुंडलीत जेव्हा मंगळ हा राहू किंवा केतूसह असतो तेव्हा अंगारक योग होतो. ७ मे २०१९ पासून मंगळ व राहू मिथुनेत अंगारक योग करीत आहेत. कुंडलीतील १२ स्थानांवर ह्याचा वेग - वेगळा प्रभाव असू शकतो. कुंडलीतील कोणत्याही स्थानी हि युती असल्यास "ॐ अं अंगारकाय नमः" ह्या मंत्राचा जप व हनुमान चालिसाचे पठन फायदेशीर ठरते. 

मंगळ व राहूच्या ह्या युतीमुळे आपल्या कुंडलीत अंगारक योग होत तर नाही ना ? हे जाणून घेण्यासाठी व ह्या योगाच्या प्रतिकूल परिणामांवर उपाय मिळविण्यासाठी आत्ताच आमच्या ज्योतिषांशी संपर्क करा. 

मंगळ व राहूच्या युतीमुळे होणारा परिणाम 
मंगळ व राहूच्या युतीमुळे नुकसान होण्या बरोबरच भांडण, दुर्घटना, तणावग्रस्त परिस्थिती व इतर अनेक प्रकारचे त्रास होत असतात. ज्योतिषशास्त्रात मंगळास क्रोध, वाद - विवाद, भांडण - तंटा, शस्त्र, दुर्घटना, अग्नी, विद्युत इत्यादींचा तर राहूस आकस्मिक घटना, शत्रू, षडयंत्र, नकारात्मक ऊर्जा, तामसी प्रवृत्ती, वाईट विचार, छळ - कपट व वाईट सवयी ह्यांचा कारक मानण्यात येते. ह्याच कारणास्तव ज्योतिषशास्त्रात मंगळ व राहूच्या योगास अधिक नकारात्मक व दुष्परिणाम देणारा योग मानण्यात येते. 

मंगळ व राहूने होतो अंगारक योग
मंगळ व राहू कुंडलीत कोणत्याही स्थानी एकत्र असल्यास अंगारक योग होतो. हा योग अनुकूल व प्रतिकूल असे दोन्ही फले देत असतो. मात्र, ज्या स्थानी हा योग होत असतो ते स्थान पीडित होते. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात भांडण - तंट्याची स्थिती उदभवत असते. अंगारक योगामुळे व्यक्तीचा स्वभाव आक्रमक, हिंसक व नकारात्मक होतो. आपली भावंडे, मित्र व इतर नातेवाईक ह्यांच्याशी सुद्धा संबंध बिघडतात. आर्थिक त्रास सुद्धा होत असतात. जर एखाद्या स्त्री कुंडलीत हा योग होत असला तर तिला संतती प्राप्तीत अडचणी येतात. ह्या योगाचे जर उपाय केले नाही तर दीर्घकाळा पर्यंत संकटाना सामोरे जावे लागते. 

जर आपल्या कुंडलीत सुद्धा अंगारक योग होत असला तर आमच्या ज्योतिषांशी संपर्क साधून त्यावरील उपाय प्राप्त करून घेऊ शकता. 

कुंडलीतील १२ भाव व अंगारक योग
- लग्नी - पोटाचे विकार, शारीरिक दुखापत, मानसिक अस्थैर्य व कौर्य. 
उपाय - वाहत्या पाण्यात बत्तासे टाकावेत. दर मंगळवारी गाईस गूळ खाऊ घालावा. 
- द्वितीयात - आर्थिक चढ - उतार. 
उपाय - डाव्या हाताच्या करंगळीत चांदीची अंगठी घालावी. 
- तृतीयात - भावंडांशी संबंधात कटुता असते, दगाबाजी करून यशप्राप्ती.
उपाय - घरात हस्तिदंत ठेवावा. 
- चतुर्थात - मातेस क्लेश व भूमी संबंधित वाद. 
उपाय - सोने, चांदी व तांब्याची अंगठी धारण करावी. 
- पंचमात - संतानहीनता व जुगार - सट्टा ह्यातून लाभ. 
उपाय - रात्री झोपताना उशाशी एका भांड्यात पाणी भरून ठेवावे व सकाळी उठल्यावर ते झाडांना घालावे. 
- षष्ठात - कर्ज काढून प्रगती होते, व्यक्ती खुनी किंवा सर्जन सुद्धा होऊ शकतो. 
उपाय - मुलींना दूध व चांदी दान करावी. मंगळवारी सुंदरकांडाचे पठन करावे. 
- सप्तमात - वैवाहिक जीवनात त्रास, अनैतिक संबंध, वैधव्य योग. मात्र भागीदारीतून लाभ सुद्धा होऊ शकतो. 
उपाय - चांदीची गोळी बाळगावी.  
- अष्टमात - पैतृक संपत्ती लाभ, रस्त्यावर एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असते. 
उपाय - एका बाजूने भाजलेली गोड पोळी कुत्र्यास खाऊ घालणे. 
- नवमात - भाग्यहीनता, शंकाशीलता, रूढीवादी व तंत्रमंत्र ह्यात प्राविण्य. 
उपाय - मंगळवारी मारुतीस शेंदूर लावावा. दर मंगळवारी गाईस गूळ खाऊ घालावा. 
- दशमात - व्यक्ती अतिशय कर्मठ, कष्टाळू, खेळाडू असता अत्याधिक यश प्राप्ती. 
उपाय - पोवळे धारण करावे. 
- लाभात - संपत्ती पासून लाभ तर होतोच, मात्र जातक चोर, कपटी व दगाबाज असतो. 
उपाय - घरात मातीच्या भांड्यात सेंदूर ठेवावा. 
- व्ययात - आयात - निर्यातीतून व लाचखोरीतून लाभ होतात. अशी व्यक्ती बलात्कारी सुद्धा असू शकते. 
उपाय - गळ्यात चांदीचा हत्ती धारण करावा. दर मंगळवारी गाईस गूळ खाऊ घालावा.  

मंगळ - राहू युती (अंगारक योग) चा विविध राशींवर होणारा परिणाम 
मकर रास 
- मकरेत मंगळ - राहू युतीचा परिणाम खूपच चांगला होतो. जेथे मंगळ उच्चीचा असतो  तेथे राहू उच्चीच्या मंगळा प्रमाणे फले देतो. ह्याच्या प्रभावामुळे व्यक्ती अतिशय परिश्रम करणारी होते व नेहेमी कायद्याच्या चौकटीत राहून काम करते. 
कर्क रास 
- कर्केत मंगळ निचीचा होत असल्याने त्याचे फल अत्यंत प्रतिकूल मिळत असते, व राहू बलहीन मंगळाचे फल अधिक प्रतिकूल करतो. त्यामुळे व्यक्ती रागीट होते व सहजपणे ती शारीरिक हाणामारीत सुद्धा सहभागी होते. 
मेष, सिंह, धनु व मीन रास
- ह्या राशीत मंगळ उत्तम स्थितीत असतो व राहू त्यास अधिक बलवान करतो. अशी व्यक्ती धाडसी व नेहेमी सक्रिय असते. त्याची महत्वाकांक्षा उच्च असते व त्याची कामे उत्तम प्रकारे होऊ शकतात. 
वृश्चिक रास 
- येथे मंगळ जरी स्वराशीस असला तरी राहूच्या उपस्थितीमुळे व्यक्तीच्या जीवनात अप्रत्यक्षपणे चढ - उतार येतील. मात्र, मंगळामुळे ह्या सर्व चढ - उतारांवर मात करण्याचे धाडस व इच्छाशक्ती प्राप्त होईल. रहस्य विज्ञानात अशी व्यक्ती खूपच प्रगती करू शकते. 
मिथुन, कन्या व कुंभ रास 
- येथे मंगळ शत्रू राशीस असल्याने व्यक्तीकडे कार्य करण्यास योग्य विचार व दिशा ह्यांचा अभाव असतो. 
वृषभ व तूळ रास 
- येथे मंगळ तटस्थ असतो. त्यामुळे कोणतेही चांगले किंवा वाईट फल मिळत नाही.  मात्र, कोणत्याही भाव किंवा राशी प्रमाणे ह्या राशीत मंगळ - राहू युती व्यक्तीस कुंडलीतील भाव व राशीशी संबंधित फलांप्रती कष्टाळू बनवेल, परंतु त्या भावाशी वा राशीशी संबंधित व्यक्तीस हानीकारक ठरेल. 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम