मकर संक्रांति २०१९: सूर्य पूजनाने उघडा द्वार यशाचे


सूर्य आहे तर हे जीवन आहे. त्यामुळेच, सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीस जाण्यास वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एक विशेष महत्व प्राप्त होते. सूर्यदेव ज्या दिवशी धनु राशीतून मकर राशीत जातात तेव्हा त्यास मकर संक्रांति असे संबोधिले जाते. सूर्य मकरेत येताच मलमासाची समाप्ती होते. ह्या दिवसा पासूनच  देवतांच्या दिवसास प्रारंभ होतो, जो आषाढ महिन्या पर्यंत असतो. दक्षिणायन हि देवतांच्या रात्रीची वेळ असते. बरोबर ह्या दिवसा पासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. मकर संक्रांतीस उत्तरायण असे हि संबोधले जाते, कारण ह्या दिवसा पासून सूर्य उत्तर दिशेकडे जात असतो. 
मकर संक्रात गुजरात मध्ये उत्तरायण, पंजाबात लोहडी पर्व, गढवालात खिचडी संक्रांत व केरळात पोंगल अशा विविध नावाने साजरी केली जाते. तर सिंधी लोक ह्यास तिरमौरी असेही संबोधतात. ह्या दिवशी गुजरात सहित अनेक राज्यात पतंग सुद्धा  उडविण्यात येतात. ह्या दिवशी दिवस मोठा व रात्र छोटी असून त्याच्या जोडीस वातावरण थंडी कडून गरमीकडे बदलू लागते. 

पौराणिक दृष्टया मकर संक्रांतीचे महत्व 
१. कपिल मुनींनी क्रोधीत होऊन राजा सागराच्या ६०,००० पुत्रांना भस्मित केले होते. मकर संक्रांतीच्या दिवशीच महाराज भगीरथाने आपल्या भावंडांचे तर्पण करून गंगा स्नानाने त्यांना मुक्ती मिळवून दिली होती. त्यामुळेच मकर संक्रांतीस प्रयागराज येथे गंगा, यमुना व सरस्वती नदीच्या त्रिवेणी  संगमावर माघ स्नानाच्या पर्वाचे विशेष महत्व असते. 
२. महाभारत कालीन महानायक भीष्म पितामह ह्यांनी उत्तरायण काळातच आपला देह त्याग केला होता. 

२०१९ साली मकर संक्रांत केव्हा आहे:

मकर संक्रांति पर्व हे दरवर्षी जानेवारी महिन्यात साजरे केले जाते. १४ जानेवारी २०१९ ह्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. 

मकर संक्रांतीचा मुहूर्त २०१९ 

पुण्य काळ मुहूर्त: ०७. १९ ते १२. ३० 
अवधी: ५ तास ११ मिनिटे 
संक्रांतीची वेळ: २०.०५, १४ जानेवारी २०१९.
 
महा पुण्य काळ मुहूर्त: ०७. १९ ते ०९. ०३
अवधी: १ तास ४४ मिनिटे. 

मकर संक्रांत कशी साजरी करावी:
१. ह्या दिवशी पवित्र नदीत पूर्ण श्रद्धेने स्नान करावे. त्या नंतर पूजा - पाठ, दान व यज्ञ क्रिया करावी. 
२. प्रातः काळी स्नान करून भगवान शंकराचे पूजन तेलाच्या दीपकाने करावे. भोलेनाथास प्रिय असलेल्या वस्तू जशा कि धोत्र्याची फुले, आघाडा, बिल्वपत्र इत्यादी अर्पित करावे.
३. सूर्यदेवास अर्घ्य द्यावा. आदित्य हृदय स्तोत्राचे १०८ वेळा पठण करावे. 
४. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सिद्ध सूर्य यंत्रास सूर्य मंत्राचा जप करून धारण केल्यास सूर्यदेव आपल्या प्रगतीचा मार्ग सोपा करतात. 
५. तीळ युक्त खिचडी, रेवडी, लाडू स्वतः खावेत व इतरांना सुद्धा खाऊ घालावेत. 
६. ब्राह्मणास गूळ व तीळ ह्यांचे दान करावे व खिचडी खाऊ घालावी. त्याने कारकिर्दीत व सामाजिक दर्जात प्रगती होईल. 
७. वेदात वर्जित कार्य जसे कि इतरां संबंधी वाईट विचार करणे किंवा बोलणे, वृक्ष कापणे व इंद्रिय सुख प्राप्तीचे कार्य इत्यादी ह्या दिवशी वर्ज्य करावे. 
८. यथाशक्ती गरजवंतास कांबळी, वस्त्र, छत्री, पादत्राणे इत्यादींचे दान करावे. 

संक्रांति हे एक पुण्य पर्व आहे 
भारतीय परंपरा व मान्यतेनुसार ह्या दिवशी शुभ कार्यास आरंभ होतो. देव प्रतिष्ठा, पूजा अनुष्ठान, गृह प्रवेश, विवाह, साखरपुडा इत्यादी मंगल कार्यांसाठी हि योग्य अशी वेळ असते. ह्या दरम्यान ऋतुमानातील बदलामुळे आजारपणाची भीती अधिक असते. त्यामुळे तीळ व गुळाचे सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती अनेक पटीने वाढते. 
ज्योतिषशास्त्रात सूर्यास आत्मा म्हटले आहे. गणेशास्पीक्स. कॉम च्या ज्योतिषाचार्यांच्या मतानुसार नेतृत्व, तंदुरुस्ती, सरकारी क्षेत्र, पिता व अधिकारी वर्गाची कृपा, कारकिर्दीतील यश व सामाजिक यश, मान, प्रतिष्ठा इत्यादी गोष्टी सूर्य अनुकूल असला तरच संभवू शकतात. तेव्हा रोज सूर्य पूजन अवश्य करावे. 

मकर संक्रांतीच्या दिवशी केलेली सूर्य उपासना सूर्याच्या प्रतिकूलते पासून मुक्ती देऊन आपल्या जीवनात यश, मान व सफलता प्राप्त करून देते. 

श्री गणेशजींच्या आशीर्वादांसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी