महाशिवरात्री कधी आहे व त्याची व्रत कथा तसेच पूजा विधी ह्या बद्धलची माहिती


महाशिवरात्री महाशिवरात्रीस शिव पूजन करून होते इच्छित फलप्राप्ती 

महाशिवरात्री हा हिंदूंचा एक प्रमुख उत्सव असून तो माघ कृष्ण चतुर्दशीस साजरा करण्यात येतो. सन २०२१ दरम्यान महाशिवरात्रीचा उत्सव ११ मार्च रोजी साजरा करण्यात येईल. ह्या दिवशी प्रदोष काळी भगवान शिव हे तांडव करत ब्रह्माण्डास आपल्या तिसऱ्या नेत्राच्या ज्वालाने समाप्त करतात, त्याचमुळे ह्या पर्वास महाशिवरात्री किंवा कालरात्री असे संबोधले गेले आहे. ह्या दिवशी शिव पूजन केल्यास इच्छित फलप्राप्ती होत असते. 

महाशिवरात्रीचे महत्व 

भगवान शिव हे चतुर्दशीचे स्वामी आहेत. त्यामुळेच ज्योतिष शास्त्रात ह्या दिवसाला शुभ फलदायी समजण्यात येते. तसे पाहू गेल्यास प्रत्येक महिन्यात शिवरात्र येतच असते, परंतु माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र संबोधण्यात येते. ह्या दिवसा पर्यंत सूर्यदेव उत्तरायणात आलेले असतात व ऋतू परिवर्तन सुद्धा झालेले असते. अशा वेळी ह्या मंगलमयी महाशिवरात्रीस शिव पूजन केल्यास इच्छित फलप्राप्ती होते. ज्योतिष शास्त्रानुसार कृष्ण पक्षातील चतुर्दशीस चंद्र क्षीण अवस्थेत असतो. चंद्रास भगवान शिव ह्यांनी आपल्या मस्तकावर धारण केले आहे. अशा वेळी शिव पूजन केल्यास जातकाचा चंद्र बलवान होतो. 

शिव पूजन विधी 

- सर्वात आधी मातीच्या भांड्यात पाणी भरून त्यात बिल्वपत्र, धोतऱ्याचे फुल, तांदूळ इत्यादी पदार्थ घालावेत. ह्या मिश्रणाने शिवलिंगावर अभिषेक करावा. 
- आपल्या घराच्या जवळपास जर शिवालय नसेल तर शुद्ध वाळूचे शिवलिंग तयार करून पूजन करता येते. 
- ह्या दिवशी रात्री जागरण व शिव पुराणाच्या श्रवणास महत्व आहे. 
- दुसऱ्या दिवशी सकाळी जव, तीळ, खीर व बिल्वपत्र ह्यांचे हवन करून व्रताची पूर्णाहुती करण्यात येते. 
- दिवसाच्या चौथ्या प्रहरी शिवालयात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून बिल्वपत्र अर्पण केल्यास भोलेनाथांची कृपा प्राप्त होते. 
- रात्रीच्या चौथ्या प्रहरी ब्राह्मणां द्वारा करण्यात आलेल्या वेदमंत्र संहिता, रुद्राध्याय ह्यांचे श्रवण करावे. 

महाशिवरात्री व्रत फल 

महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा केल्यास व्यवसायात वृद्धी व नोकरीत प्रगती होते. 
- शिवरात्रीस प्रदोषकाळी स्फटिक शिवलिंगास शुद्ध गंगाजळ व (दूध, दही, तूप, मध व साखर मिश्रित) पंचामृताने अभिषेक करून, तसेच धूप - दीप प्रज्वलित करून व मंत्र जप केल्यास सर्व संकटांचा नाश होतो. 
- आजारपणातून मुक्ती व प्राण रक्षणासाठी रुद्राक्षाच्या माळेने महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. 
वर्षातील तीन प्रमुख रात्रींपैकी शिवरात्री हि एक आहे. ह्या दिवशी व्रत करून पाच वेळा भगवान श्री शंकराचे दर्शन, पूजन व वंदन केल्यास शुभ फलांची प्राप्ती सहजपणे होऊ शकते. 
भगवान श्री शंकरांचा इच्छित आशीर्वाद प्राप्त करा, आत्ताच रुद्राभिषेक पूजेसाठी नांव नोंदवा 

महाशिवरात्री व्रत केव्हा करावे 

चतुर्दशीच्या आदल्या दिवशी जर महानिशिथकाल असल्यास त्याच दिवशी महाशिवरात्र साजरी करण्यात येते. रात्रीचा आठव्या प्रहरास निशिथकाल असे संबोधण्यात येते. सोप्या भाषेत सांगावयाचे म्हणजे जेव्हा चतुर्दशी हि तिथी सुरु होते व रात्रीचा आठवा प्रहर हा चतुर्दशीसच असेल तर त्या दिवशीच शिवरात्री साजरी करावी. 
- चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी जर निशिथकाल येत असेल व पहिला दिवस निशिथाने व्याप्त असेल तर पहिल्या दिवशीच महाशिवरात्री साजरी करण्यात येते. 
- वरील दोन्ही स्थितींना वगळून इतर स्थिती असता व्रत आदल्या दिवशी करण्यात येते. 

महाशिवरात्री व्रत कथा 

ह्या दिवशीच भगवान श्री शिव ह्यांचा विवाह झाला होता, म्हणूनच भगवान श्री शिव ह्यांची वरात रात्री काढण्यात येते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान श्री शिव ह्यांना पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. ह्या तपस्येचे फल म्हणून माघ कृष्ण चतुर्दशीस भगवान श्री शिव व माता पार्वती ह्यांचा विवाह संपन्न झाला. महाशिवरात्रीस अत्यंत महत्वपूर्ण व पवित्र मानण्याचे हेच प्रमुख कारण आहे. 

गरुड पुराणानुसार ह्या दिवशी निषाद आपल्या कुत्र्यासह शिकारीस गेला, परंतु त्यास शिकार मिळू शकली नाही. त्या नंतर तो भूक व तहानेने व्याकुळ होऊन एका तळ्याकाठी आला. तेथे बेलाच्या वृक्षाखाली एक शिवलिंग होते. आपल्या शरीरास थोडी विश्रांती देण्यासाठी त्याने काही बिल्वपत्र तोडली, ज्यातील काही शिवलिंगावर सुद्धा पडली. आपले पाय धुण्यासाठी त्याने तळ्याचे पाणी शिंपडले, ज्यातील काही थेंब शिवलिंगावर सुद्धा पडले. हे सर्व करत असताना त्याचा एक बाण खाली पडला, जे घेण्यास तो खाली वाकला, तर समोरच शिवलिंग होते. ह्या प्रकारे शिवरात्रीच्या दिवशी नकळतच त्याच्या हातून शिव पूजन घडले. त्याच्या मृत्यू नंतर जेव्हा यमदूत त्यास घेऊन जाण्यास आले तेव्हा भगवान श्री शिवांच्या गणाने त्याचे रक्षण करून यमास पिटाळून लावले. 

महाशिवरात्रीस व्रतस्थाचा आहार 

- भोलेनाथांना अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये, हे विशेष लक्षात ठेवावे. 
- जर भगवान श्री शिव ह्यांच्या मूर्ती शेजारी शाळीग्राम असेल तर प्रसाद खाण्यास हरकत नाही. 
- व्रताच्या आहारात सेंधव मीठ व लाल मिरची ऐवजी काळ्या मिरचीचा उपयोग करावा. 
- बटाटा, शिंगाडा, दही वडा व साबुदाणा सुद्धा खाऊ शकता. 

शिव अभिषेक कशाने करावा 

- दही - ह्याने अभिषेक केल्यास आज्ञाकारी संतती प्राप्त होते. 
- दूध - जीवनातील कष्टां पासून मुक्ती. 
- मध - श्री शंकरास अतिप्रिय. ह्याने वाणी दोष दूर होतो.  
- तूप - मोक्ष प्राप्ती. 
- पंचामृत - धन, संपत्तीची प्राप्ती. 
- चंदन पावडर - लक्ष्मी प्राप्ती. 
- तांदळाचे पीठ - कर्ज मुक्ती. 
- उसाचा रस - शत्रूं पासून मुक्ती.  
 महाशिवरात्री पर्व तिथी व मुहूर्त २०२१ 

११ मार्च २०२१ 

निशीथकाल पूजन - रात्री १२.२२ ते ०१.१०. 
पारण्याची वेळ - ०६.५१ ते ०३.०२ (१२ मार्च). 
चतुर्दशी तिथी प्रारंभ - ११ मार्च २०२१ दुपारी ०२.३९. 
चतुर्दशी तिथी समाप्ती - १२ मार्च २०२१ दुपारी ०३.०२. 

श्री गणेशजींच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम