२०१९ चे चंद्र ग्रहण व त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव


नुकतेच जगातील काही भागात सूर्य ग्रहण पाहावयास मिळाले होते. आता निसर्गाची अद्भुत कलाकृती चंद्र ग्रहणाच्या स्वरूपात पाहावयास मिळेल. ह्या वर्षी १६ जुलै २०१९ रोजी भारता सहित अनेक शेजारील राष्ट्रात खग्रास चंद्र ग्रहण पाहावयास मिळेल. हे ग्रहण १६ जुलै व १७ जुलै च्या दरम्यान रात्री ०१.३० ते ०४.३० पर्यंत राहील. भारतात ह्या ग्रहणास धार्मिक दृष्ट्या महत्व आहे. ग्रहणकाळी अनेक प्रकारच्या  हानिकारक व नकारात्मक किरणांचा प्रभाव सरळ सरळ मानवी जीवनावर होत असल्याने ह्या दरम्यान देवतांच्या मंत्रांचे जप करावेत. 

चंद्र ग्रहणाच्या दुष्प्रभावा पासून असे मुक्त व्हा 
- चंद्र ग्रहणाच्या ९ तासा आधीपासून त्याचे वेध लागलेले असतात. अशा वेळी घरातील पवित्र स्थानांना झाकून ठेवावे. ह्या कालखंडात पूजा - पाठ करू नये. मात्र, देवतांच्या मंत्रांचे जप करत राहावे. ह्या दरम्यान भगवान श्रीशंकर ह्यांच्या मंत्रांने विशेष फायदा होतो. 
- ग्रहण असता खाणे - पिणे व स्नान वर्जित आहे. ह्या दरम्यान प्रवासास जाऊ नये. 
- ज्या राशींवर ग्रहणाचा अशुभ प्रभाव होणार आहे त्यांनी ते पाहू नये. 
- चंद्र ग्रहणाच्या दिवशी एखाद्या गरिबास चंद्राशी संबंधित पांढऱ्या वस्तू, पांढऱ्या रंगाची मिठाई ह्यांचे दान केल्यास त्या दानास श्रेष्ठत्व प्राप्त होते.  
- गर्भवती स्त्रियांनी चंद्र ग्रहण असता कोणत्याही परिस्थितीत घराच्या बाहेर पडू नये. 

चंद्र ग्रहणाचा प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव व त्यावरील उपाय
मेष रास 
चंद्र ग्रहणाचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडू शकतो. तणावामुळे आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबीत त्रास संभवतो. आपले अचानक नुकसान होऊ शकते. 
उपाय - गूळ व मसूर डाळ ह्यांचे दान करावे. 
वृषभ रास 
चंद्र ग्रहणाचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडू शकतो. जर पूर्वी आपणास आरोग्या संबंधी काही त्रास झाला असेल तर तो पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. 
उपाय - श्रीसूक्ताचे पठन करावे. 
मिथुन रास 
चंद्र ग्रहणा दरम्यान आपले मानसिक स्थैर्य भंग पावेल. त्यामुळे आपण कितीही काम केलेत तरीही त्याचा अपेक्षित परिणाम मिळवू शकणार नाहीत. 
उपाय - ह्या दिवशी गाईला चारा खाऊ घालणे. 
कर्क रास 
ह्या ग्रहणाचा आपल्यावर  पडणारा प्रभाव हा शुभ असेल. ह्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिगत व कौटुंबिक संबंधांवर पडताना दिसून येईल. मात्र, घरातील सदभावना भंग होऊ  शकते. 
उपाय - भगवान श्रीशंकराचे पूजन करावे. 
सिंह रास
चंद्र ग्रहणाचा अशुभ परिणाम आपल्यावर होणार आहे. व्यक्तिगत व कौटुंबिक जीवना बरोबरच जीवनातील शांती भंग पावेल. 
उपाय - गायत्री मंत्राच्या २१ माळांचा जप करणे. 
कन्या रास 
ह्या दरम्यान आपणास मानसिक ताण व बेचैनी जाणवेल. आपण जर त्वरित एखाद्या गोष्टीत समाधान होण्याची अपेक्षा बाळगत असाल तर तसे होणे अशक्यप्राय होईल. 
उपाय - किन्नरास हिरव्या रंगाच्या बांगड्या दान कराव्यात. 
तूळ रास
ह्या ग्रहणाचा आपल्यावर  पडणारा प्रभाव हा शुभ असेल. आर्थिक प्राप्तीत वाढ होईल, मात्र अनियोजित खर्चामुळे आलेला पैसा जाऊ सुद्धा शकतो. कोणाला उसने पैसे देऊ नये. 
उपाय - श्रीसूक्ताचे ११ वेळा पठन करावे. 
वृश्चिक रास 
चंद्र ग्रहण असता व्यवहार कुशलता दाखवूनच कठीण परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकाल. कुटुंबात शांतता व सदभावना टिकवून ठेवण्याची मोठी जवाबदारी आपल्यावर असेल. 
उपाय - मारुतीची आराधना करावी. 
धनु रास 
ह्या दरम्यान कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीं बरोबरचे आपले असलेले संबंध किंवा आपली स्थिती ह्याने आपण समाधानी राहणार नाही. प्रकृतीत बिघाड होऊन त्यावरील   उपचारांवर खर्च होण्याची शक्यता आहे. 
उपाय - विष्णू सहस्रनामाचे पठन करावे. 
मकर रास
चंद्र ग्रहणाचा अशुभ परिणाम आपल्यावर होणार आहे. आपले कुटुंबीय व मुलां दरम्यान उग्र वाद होऊ शकतात. अपेक्षित परिणाम प्राप्त करण्यात आपण अयशस्वी व्हाल. 
उपाय - सुंदरकांडाचे पठन करावे. 
कुंभ रास 
चंद्र ग्रहणाचा अशुभ परिणाम आपल्यावर सुद्धा होणार आहे. विविध प्रकारच्या आरोग्य विषयक तक्रारी निर्माण होऊन शारीरिक नुकसान होऊ शकते. 
उपाय - हनुमान चालिसाचे पठन करावे.  
मीन रास 
ह्या ग्रहणाचा आपल्यावर  पडणारा प्रभाव हा शुभच असेल. आपणास कुटुंबीय व प्रियजनांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. आपणास अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 
उपाय - भगवान श्रीविष्णू ह्यांचे पूजन करावे. 

आचार्य कृष्णमूर्ती ह्यांच्या इनपुटसह
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम