स्वार्थी राशी:१२ राशींपैकी कोणती रास स्वार्थी आहे हे जाणून घ्या

अनेकदां काही लोक अचानक क्रोधीत होतात किंवा अत्यंत स्वार्थी व्यवहार करू लागतात. अशा लोकांना आपण स्वार्थी म्हणतो. हे स्वार्थी लोक आपला व्यवहार इतक्या झपाट्याने बदलतात कि आपणास ते सहजपणे समजण्यास अवघड होऊन बसते. ह्या मागे काही ज्योतिषीय कारणे असतात. ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या विशिष्ट राशीस जन्मलेल्या जातकांचे व्यवहार वेगळे असू शकतात. हेच व्यवहार आपणास स्वार्थी बनवू शकतात. येथे आम्ही काही जास्तीत जास्त स्वार्थी मानण्यात येणाऱ्या राशीं विषयी आपणास माहिती देत आहोत. 

मीन- गोपनीयता लपवू शकत नाही. 

१२ राशींपैकी मीन हि रास अत्यंत संवेदनशील आहे. एका दृष्टीने हे चांगले असले तरी नाण्याच्या दुसऱ्या बाजूस वेगळी गोष्ट सुद्धा असू शकते. विशेषतः मीन राशीच्या व्यक्तींवर लगेचच विश्वास ठेवणे आपल्यासाठी घातक ठरू शकते. ते गोपनीयतेच्या बाबतीत इतके कमकुवत असतात कि कोणालाही ते सहजपणे सांगून टाकतात. ह्या व्यक्ती सहसा आपले मित्र किंवा नातेवाईकांच्या पाठी त्यांच्या विषयी वाईट बोलत असतात. काही लोकांच्या बाबतीत त्यांच्यात इतकी नकारात्मकता भरलेली असते कि ज्यांच्या विषयी त्यांना काहीच माहिती नसते. असे असले तरी ते फारच लवकर भावनाशील होतात व त्यांना आपल्या चुकीची जाणीव होते. 

कुंभ- तुझे - माझे करण्यातच रुची 

कुंभ राशीच्या व्यक्ती असा व्यवहार करतात कि जो वास्तविकपणे नसतोच. तोंडावर ते खूप गोड बोलणारे असतात, परंतु लोकांचा विश्वास प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतात. अचानकपणे ते कोठेही आपली थट्टा करू शकतात. मात्र, त्यांची थट्टा कोणी केल्यास त्यांना ते आवडत नाही. अशा परिस्थितीत ते आपल्या जोडीदारा बरोबर स्वार्थी व्यवहार करू लागतात. ते तुझे - माझे करण्यावर अधिक विश्वास ठेवतात. 

तूळ- प्रत्येक नात्यापासून काही हवे असते 

तूळ राशीच्या व्यक्ती अत्यंत समतोल व्यवहार करत असतात, मात्र जेव्हा ते चूक असतात व इतरांचे बरोबर असते तेव्हा सुद्धा ते आपल्या म्हणण्यावर ठाम बसतात. तूळ राशीच्या व्यक्ती एकदम कोणावरही विश्वास ठेवत नाहीत, तसेच ह्या राशीच्या व्यक्तींवर इतरांनी सुद्धा लगेच विश्वास ठेवू नये. ते इतक्या लवकर कोणाचा विश्वास संपादन करू शकत नाही. जेव्हा तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या जुन्या मित्रांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते तेव्हा लगेच ते नवीन मैत्री करू लागतात. त्यांना प्रत्येक नात्याकडून काही ना काही हवेच असते. 

वृषभ- सहजपणे क्रोधीत होतात

वृषभ राशीच्या व्यक्ती हट्टी व आळशी असतात. त्यांना बदल सहन होत नाही. त्यांना सहजपणे कोणाही विरुद्ध भडकावू शकत असल्याने त्यांचे जास्त मित्र नसतात. विशेष म्हणजे त्यांना कोणा विरुद्ध भडकवण्यासाठी जे काही सांगण्यात येते त्यावर ते सहजपणे विश्वास ठेवतात. अशा परिस्थितीत ते त्या नात्याकडे अचानकपणे पाठ फिरवतात.  

सिंह- अधिकारासाठी कोणत्याही थरावर जाऊ शकतात 

सिंह राशीच्या व्यक्ती अत्यंत आक्रमक असतात. मात्र, ते इतके स्वार्थी नसतात, परंतु जेव्हा अधिकार वाटण्यात येतो तेव्हा ते सर्वात जास्त स्वार्थी लोकांपैकी एक होतात. ते आपला अधिकार मिळविण्यासाठी कोणत्याही थरावर जाऊ शकतात. राग आल्यावर ते आपले रौद्र रूप धारण करतात. अशा वेळीस आपले कोणाशी किती दृढ नाते आहे ह्याचा त्यांना विसर पडतो. ते सहजपणे कोणत्याही कारस्थानात सहभागी होतात. 

मिथुन- नाते बदलण्यास उशीर करत नाही

मिथुन राशीच्या व्यक्ती बोलण्यात हुशार असतात. जेथे त्यांचे जास्त ऐकण्यात येते तेथे ते स्वार्थी होतात. आपले जर मिथुन व्यक्तीशी नाते असले तर आपणास त्यांना सहन करावे लागेल व सतत त्यांची बडबड ऐकत राहावे लागेल. आपण जर त्यांचे म्हणणे खोडण्याचा प्रयत्न केलात तर मिथुन राशीची व्यक्ती आपली मैत्री किंवा नाते बदलण्यास जरा सुद्धा उशीर करणार नाही. 

कन्या- अपमान करण्यात कसूर करत नाहीत 

कन्या राशीच्या व्यक्ती इतक्या स्वार्थी नसतात, जितक्या कि बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीच्या व्यक्ती असतात. असे असले तरी कन्या राशीच्या व्यक्ती पैश्यांच्या देवाण - घेवाणीच्या बाबतीत नेहमीच स्वार्थी असतात. ते आपल्या एखाद्या मित्रास गरज असल्यास एक रुपया देण्यास सुद्धा कचरतात. आपण जर त्यांना दुखावले असले तर सर्वांसमोर आपला अपमान करण्यास सुद्धा ते मागे - पुढे बघत नाहीत. 

वृश्चिक- आपल्या माणसांना माफ करू शकत नाहीत 

वृश्चिक राशीच्या व्यक्ती स्वार्थी असल्या तरी त्या अधिक स्पष्टवक्ता असतात. त्यामुळे त्यांचे जास्त लोकांशी नाते जुळत नसते. त्याच बरोबर त्यांच्यात बदला घेण्याची तीव्र भावना असते. अनेकदा ते आपल्या लोकांना सुद्धा माफ करू शकत नाहीत. आपल्या स्वार्थासाठी आपला मार्ग बदलण्या ऐवजी दुसऱ्याला आपल्या मार्गातून दूर करण्याची योजना ते आखत असतात. 

मेष- नाते तोडण्यास नेहमीच तयार 

मेष राशीच्या व्यक्ती उत्तम विवादपटू असतात. मात्र त्यांना कधीही इतरांचा दृष्टिकोन स्वीकार्य नसतो. जर ते एखाद्या ग्रुपचे सदस्य असले तर सर्वांवर आपले वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करू शकतात. जेव्हा कोणी त्यांचे म्हणणे ऐकत नाही तेव्हा त्यांची मजल नाते तोडण्या पर्यंत जाते. 

कर्क- जोडीदारा पासून आपले काम लपवतात 

कर्क राशीच्या व्यक्ती विशेष स्वार्थी नसतात. ते सहसा इतरांचे म्हणणे ऐकून घेतात व त्या नंतरच एखाद्या निर्णयाप्रत येतात. असे असले तरी सर्वात महत्वाचे हे आहे कि जेव्हा ते एखादे काम करत असतात तेव्हा ते आपल्या जोडीदारा पासून सुद्धा त्यास लपवून ठेवतात. साहजिकच आहे कि ह्या व्यवहारास इतर लोक स्वार्थी व्यवहार समजू लागतात.  

मकर- जेव्हा आपली गरज तेव्हा आपले मित्र 

मकर राशीच्या व्यक्ती सहसा आपल्यातच मग्न असतात. त्यांचा इतरांशी क्वचितच काही स्वार्थ असतो. त्यांच्या मित्रांचा ग्रुप सुद्धा लहानच असतो. ते तेव्हाच स्वार्थी होतात जेव्हा त्यांचे लक्ष्यांक पूर्ण करण्यास आपल्या मदतीची गरज असते. असे असले तरी आपले लक्ष्यांक गाठण्यास ते स्वतः प्रयत्नशील असतात. 

धनु- नात्यावर सुद्धा जुगार खेळू शकतात 

धनु राशीच्या व्यक्ती अधिक स्वार्थी असू शकतात. त्यांना आपल्या कामात कोणाचाही हस्तक्षेप सहन होत नाही. त्यांना आपल्याशी कोणी मैत्री करतो कि नाही ह्याची पर्वा नसते. ते आपला स्वार्थ साधण्यासाठी नात्यावर सुद्धा जुगार खेळू शकतात. त्यामुळेच त्यांना राशी चक्रातील एक स्वार्थी रास समजण्यात येते. 

श्री गणेशजींच्या आशीर्वादांसह
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम