२०१९ कामिका एकादशी व्रत कथा - विधी, दिनांक व मुहूर्त

कामिका एकादशीच्या व्रताने होते पाप क्षालन
आषाढ महिना असा सुद्धा एक पवित्र असल्याचेच समजण्यात येते. अशा वेळी एखादे व्रत किंवा सण असल्यास त्यास अधिक महत्व प्राप्त होते. आषाढ महिन्यातील एका व्रताचे नांव आहे कामिका एकादशी जी ह्या वर्षी आषाढ कृष्ण एकादशीस म्हणजेच २८ जुलै २०१९ रोजी साजरी केली जाईल. हा दिवस भगवान श्रीविष्णू ह्यांची आराधना व पूजेसाठी सर्वश्रेष्ठ असतो. कामिका एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळून इच्छित फलप्राप्ती होत असते.
कामिका एकादशी व्रत कथा
कामिका एकादशीशी संबंधित एका प्राचीन कथेनुसार एका गावात एक रागीट व्यक्ती राहात असे. एके दिवशी त्याचे एका ब्राह्मणाशी भांडण झाले व क्रोधीत होऊन त्याने त्या ब्राह्मणाची हत्या केली. आपल्या हातून ब्रह्महत्या झाल्याने दुःखी होऊन त्याने त्या मृत ब्राह्मणाचे अंतिम संस्कार करण्याची ईच्छा व्यक्त केली, मात्र इतर ब्राह्मणांनी त्यास तसे करू दिले नाही. ब्रह्म हत्येचा दोष लागल्याने ब्राह्मणांनी त्याच्या घरी भोजन घेण्यास सुद्धा नकार दिला. ह्यामुळे व्यथित होऊन त्याने एका ऋषींकडे ह्या पापातून मुक्त होण्याचा उपाय मागितला. ह्यावर त्या ऋषींनी त्यास कामिका एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. त्या नंतर ऋषींनी सांगितलेल्या विधीनुसार त्याने कामिका एकादशीचे व्रत केले. त्या नंतर तो रात्री जेव्हा झोपला होता तेव्हा त्याच्या स्वप्नात प्रत्यक्ष भगवंतानी त्याला दर्शन देऊन ब्रह्म हत्येच्या दोषातून मुक्त केले. हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळते व अश्वमेघ यज्ञ केल्या समान फळ मिळते.
व्रत विधी
- एकादशीच्या दिवशी स्नानादी कर्म उरकून व्रताचा संकल्प करावा.
- भगवान श्रीविष्णू ह्यांना फुल अर्पण करून, फळ, तीळ, दूध, पंचामृत इत्यादींचा नेवेद्य दाखवावा.
- त्या नंतर धूप, दीप, चंदन इत्यादीने त्यांची आरती करावी.
- व्रत सुरु असता निर्जळी राहून भगवान श्रीविष्णू ह्यांच्या नामाचे स्मरण करावे.
- एकादशीच्या दिवशी ब्राह्मणास भोजन देऊन दान - दक्षिणा देण्यास महत्व आहे.
- ब्राह्मणास भोजन दिल्या नंतरच स्वतः भोजन करावे.
कामिका एकादशी
२८ जुलै २०१९, रविवार
एकादशी तिथी प्रारंभ - २७ जुलै २०१९ रोजी संध्याकाळी ०७.४६ वाजता
एकादशी तिथी समाप्ती - २८ जुलै २०१९ रोजी संध्याकाळी ०६.४९ वाजता
२९ जुलै २०१९ ह्या दिवशी व्रत सोडण्याची वेळ - सकाळी ०५.४५ ते ०८.२६ पर्यंत
द्वादशी समाप्तीची वेळ - संध्याकाळी ०५.०९ वाजता