कजरी तृतीया व्रत २०१९: शुभ मुहूर्त, व्रत नियम व कथा


वैवाहिक जीवनातील सुख - समृद्धीचे प्रतीक म्हणून कजरी तृतीया 

एका वर्षात महिला अनेक सण साजऱ्या करत असतात. त्यात काही प्रमुख आहेत. त्यातलीच एक आहे कजरी तृतीया जी मधुस्रवा तृतीये नंतर येत असते. श्रावण महिना संपताच भाद्रपद महिन्याच्या सुरवातीस हि तृतीया येते. साधारणपणे रक्षाबंधन झाल्यावर तीन दिवसा नंतर व कृष्ण जन्माष्टमीच्या पाच दिवस अगोदर हि तृतीया साजरी करण्यात येते. ह्या वर्षी ती १८ ऑगस्ट २०१९ ह्या दिवशी साजरी केली जाईल. 

उत्तर भारतातील आहे हा एक प्रमुख सण  
विशेषतः हा सण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व बिहार सहित हिंदी भाषिक क्षेत्रात प्रामुख्याने साजरा करण्यात येतो. हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात सुख - समृद्धी प्राप्त होते अशी एक मान्यता आहे. ह्या दिवशी महिला उपास करतात व चंद्र पूजन करून तो सोडतात. 

कजरी तृतीयेची परंपरा 
- सौभाग्यवती महिला पतीला दिर्घायुष्य लाभावे म्हणून तर कुमारिका मनपसंत पती लाभावा म्हणून हे व्रत करतात. 
- ह्या दिवशी विविध पक्वान्न बनविण्यात येतात. चंद्रोदय झाल्यावर भोजन करून उपास सोडण्याची प्रथा आहे. 
- तत्पूर्वी चंद्रास अर्घ्य देण्यात येतो. 
- ह्या दिवशी गायीचे पूजन सुद्धा करण्यात येते. 
- महिला एका जागी गोळा होऊन झुल्यावर झुलतात व नाच - गाण्यात सहभागी होतात. 

व्रत नियम 
- साधारणपणे महिला निर्जळी राहून हे व्रत करतात. मात्र, गर्भवती महिला फलाहार करू शकतात. 
- चंद्रोदय होऊन सुद्धा चंद्र दर्शन होऊ शकत नसल्यास रात्री साधारण ११.३० ला आकाशाकडे बघून अर्घ्य देऊन व्रताची पूर्णाहुती करता येते.
- कजरी तृतीयेचा उपास करणाऱ्या महिलांनी सूर्योदयापूर्वी उठून काहीतरी खाऊन घेतले पाहिजे. म्हणजे दिवसभर निर्जळी राहता येईल. 

कजरी तृतीया व्रत कथा 
एका गावात गरीब ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहात होता. ब्राह्मणाच्या पत्नीने हे व्रत केले होते. पूजेसाठी तिने आपल्या पतीला कोठूनही चणे व सातू आणावयास सांगितले. हे ऐकून ब्राह्मण दुःखी झाला. मग तो एका दुकानात गेला. पैसे नसल्याने स्वतःच सातू बनवून तो निघू लागला. ह्या दरम्यान दुकानातील नोकरांनी त्या ब्राह्मणास पकडले व दुकानदारा समोर हजर केले. त्यावर ब्राह्मणाने आपल्या पत्नीच्या व्रता विषयी कथन करून त्याने फक्त सातूच घेतल्याचे सांगितले. त्या नंतर सर्वानी त्या ब्राह्मणाची झडती घेतली, मात्र त्याच्याकडे सातू शिवाय काहीच मिळाले नाही. त्या नंतर दुकानदाराने ब्राह्मण पत्नीस आपली बहीण मानून ब्राह्मणास सातू व्यतिरिक्त दागिने, द्रव्य इत्यादी देऊन त्याची पाठवणी केली. मग सर्वानी कजरी मातेचे पूजन केले. 

कजरी तृतीया २०१९ 
१८ ऑगस्ट २०१९, रविवार 
तृतीया तिथी प्रारंभ - १७ ऑगस्ट २०१९ रात्री १०.४८ वाजता 
तृतीया तिथी समाप्ती - १९ ऑगस्ट २०१९ पहाटे ०१.१३ वाजता