गणेश चतुर्थी २०२०: तिथी, महत्व, कहाणी व उत्सव

गणाधिपती श्रीगणेश ह्यांना गणांचे ईश अर्थात गणांचे ईश्वर ह्या रूपात पूजण्यात येते. ते सर्वात प्रथम पूजनीय देवता आहेत. हिंदू धर्मात कोणत्याही मंगल कार्याची सुरवात श्रीगणेशांच्या पुजेनेच होत असते. प्रतिवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करण्यात येतो. ह्या वर्षी २०२० दरम्यान गणेश चतुर्थी हि २२ ऑगस्ट ह्या दिवशी साजरी करण्यात येईल. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत भगवान श्रीगणेशांची विशेष पूजा व आराधना करण्यात येते. देशभरात दहा दिवसां पर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र व विशेषतः मुंबईत गणेश उत्सव विशेष उत्साहात साजरा करण्यात येतो. असे असले तरी बऱ्याच जणांना गणेश उत्सवाचे महत्व किंवा गणेश उत्सव का साजरा करण्यात येतो हे माहित नसते. आमच्या वाचकांची हि जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी आम्ही येथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. 

गणेश चतुर्थी केव्हा व का साजरी करण्यात येते ?

शिव पुराण व गणेश पुराण ह्यांच्या अनुसार भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थीस श्रीगणेश ह्यांचा जन्म झाला होता. देशात स्वातंत्र्य चळवळी दरम्यान लोकांना संघटीत करण्याच्या एकमेव उद्देशाने लोकमान्य टिळक ह्यांनी देशात गणेशोत्सवाची सुरवात केली. ह्या नंतर हा उत्सव घरा घरात श्रीगणेशाच्या स्थापनेने साजरा होऊ लागला. हिंदू कालगणनेनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी ह्या नांवाने ओळखण्यात येते. मान्यतेनुसार ह्याच दिवशी भगवान श्रीगणेश ह्यांचा जन्म झाला होता. शिव पुराणातील चतुर्थ खंडात दर्शविण्यात आले आहे कि माता पार्वतीने आपल्या अंग रक्षकाच्या रूपात भगवान श्रीगणेश ह्यांना आपल्या शरीरावर असलेल्या उबटनाच्या लेपाने तयार करून त्यास प्राणांकित केले. तेव्हा पासून भाद्रपद शुक्ल चतुर्थी हि भगवान श्रीगणेश ह्यांच्या जन्मोत्सवाच्या स्वरूपात साजरी करण्यात येते. 

गणेशोत्सव दहा दिवस का असतो ?

गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीगणेश ह्यांचा जन्म झाल्यामुळे त्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. परंतु, गणेशोत्सव दहा दिवसां पर्यंत का साजरा करण्यात येतो ? ह्याचे उत्तर अनेक पौराणिक ग्रंथात विविध प्रकारे देण्यात आले आहे. मात्र, ह्यात सर्वात प्रचलित व मान्यताप्राप्त कथेचा संबंध हा महाभारताशी आहे. धार्मिक ग्रंथांनुसार जेव्हा महर्षी वेदव्यास ह्यांना महाभारताचे ज्ञान प्राप्त झाले तेव्हा त्यांना त्याच्या लेखनासाठी एका महा विद्वान व्यक्तीची आवश्यकता होती कि जी त्यांच्या शब्दांच्या उच्चारणासह शब्दात लिहू शकेल. बोलताना ते विश्रांती घेऊ शकत नव्हते, अन्यथा महाभारताचे ज्ञान लुप्त झाले असते. त्यासाठी तिन्ही लोकात सर्वात उपयुक्त व्यक्ती होती ती म्हणजे भगवान श्रीगणेश. त्यांनी महर्षी वेदव्यास ह्यांचे आव्हान स्वीकारले व भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते चतुर्दशी पर्यंत सतत दहा दिवस महाभारताचे लेखन केले. परंतु, निरंतर दहा दिवस लेखन केल्याने त्यांच्या शरीराचे तापमान खूपच वाढले, त्यामुळे महर्षी वेदव्यासांनी श्रीगणेश ह्यांना जवळच असलेल्या एका कुंडात स्नान घातले कि ज्यामुळे त्यांचे तापमान सामान्य झाले. महर्षी वेदव्यास व महाभारत ह्यांच्याशी संबंधित ह्या आख्यायिकेमुळे गणेशोत्सव दहा दिवस साजरा करण्यात येतो व दहा दिवसां नंतर गणेशमूर्तीचे पाण्यात विसर्जन करण्यात येते. 


श्रीगणेश स्थापना मुहूर्त व विधी 

देशातील विविध भागात गणेशोत्सवाचा हा कालखंड सुविधेनुसार कमी जास्त करण्यात येतो. काहीजण दोन दिवस, पाच दिवस किंवा आठ दिवसांसाठी सुद्धा श्रीगणेशजींची स्थापना करतात. ह्या वर्षी गणेश चतुर्थी हि शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२० ह्या दिवशी साजरी केली जाईल. आता श्रीगणेश स्थापनेचे मुहूर्त जाणून घेऊ. 

गणेश चतुर्थी २२ ऑगस्ट २०२०. 

माध्यान्ह गणेश पूजन - ११.०७ ते १३.४१. 
चंद्र दर्शन टाळण्याची वेळ - ०९.०७ ते २१.२६ (२२ ऑगस्ट २०२०).
चतुर्थी तिथी आरंभ - २३.०३ (२१ ऑगस्ट २०२०).
चतुर्थी तिथी समाप्ती - १९.५७ (२२ ऑगस्ट २०२०).

श्रीगणेश स्थापना २०२० चे शुभ मुहूर्त 

दिवसा असलेले मुहूर्त 
शुभ - उत्तम - ०७.३१ ते ०९.०४.
चर - सामान्य - १२.१२ ते १३.४५.
लाभ - उन्नती - १३.४५ ते १५.१९. 

रात्रीचे मुहूर्त 

लाभ - उन्नती - १८.२६ ते १९.२५.
शुभ - उत्तम - २१.१९ ते २२.४५. 
अमृत - सर्वोत्तम - २२.४५ ते २४.१२. 
( विविध स्थळांचे मुहूर्त तेथील सूर्योदयानुसार वेगळे असू शकतात. वर दिलेले मुहूर्त हे सामान्य मुहूर्त आहेत ).

दहा दिवस करा ह्या गणेश मंत्रांचा जप 

भगवान श्रीगणेश हे रिद्धी - सिद्धी दाता असल्याने त्यांच्या निव्वळ स्मरणाने सुद्धा जीवनातील सर्व समस्येतून मुक्तता होते. गणेश चतुर्थी पासून पुढील दहा दिवसां पर्यंत गणेश मंत्रांच्या जपाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यातच श्रीगणेशजींच्या १२ नावांचे सतत जप करून व प्रत्येक नावासह श्रीगणेश ह्यांना दुर्वा अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या कार्यात यश प्राप्त होते. हि १२ नांवे ह्या प्रमाणे आहेत.
१.. ॐ सुमुखाय नम:
२. ॐ एकदंताय नम:
३. ॐ कपिलाय नम:
४. ॐ गजकर्णाय नम:
५. ॐ लंबोदराय नम:
६. ॐ विकटाय नम:
७. ॐ विघ्ननाशाय नम:
८. ॐ विनायकाय नम:
९. ॐ धूम्रकेतवे नम:
१०. ॐ गणाध्यक्षाय नम:
११. ॐ भालचंद्राय नम:
१२. ॐ गजाननाय नम:

श्री गणेशजींच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम