नोकरीच्या शोधात आहात ? मग जाणून घ्या ज्योतिषीय उपाय व मिळवा मनासारखी नोकरी!

आपण नोकरीच्या शोधात असून आपणास एखादी मनाजोगी नोकरी मिळत नाही का ? नोकरी शोधण्यात आपल्याला काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे का ? नोकरीचा शोध घेता घेता आपली दमछाक झाली आहे का ? आपण आपला बायोडाटा पाठवता, परंतु आपणास समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही का ? आपण जर अनेक दिवसांपासून अशा समस्यांचा सामना करत असाल व आपणास एखादी चांगली नोकरी हवी असेल तर आम्ही आपल्या फायद्याचीच गोष्ट येथे सांगत आहोत. 

कारकिर्दी विषयक ज्योतिष आपली खूप मदत करू शकेल. आपले जन्म टिपण कि ज्यात जन्म दिनांक, जन्म वेळ व जन्मस्थळ ह्यांचा उल्लेख असेल त्या वरून करण्यात आलेले कारकिर्दी विषयक भविष्यकथन आपणास मना सारखी नोकरी मिळविण्यात मदतरूप ठरू शकेल. त्याच बरोबर आपल्या कारकिर्दीत सकारात्मक व उत्तम प्रगती आपण साधू शकाल. कारकिर्दी विषयक ज्योतिष शास्त्राच्या मदतीने आपण आपल्या कारकिर्दीशी निगडित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. त्याच बरोबर भविष्यातील संभाव्यतेची सुद्धा माहिती करून घेऊ शकता. 

कारकिर्दी विषयक ज्योतिषशास्त्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रावर आधारित असे एक शक्तिशाली शास्त्र आहे, ज्याच्या मदतीने आपण नोकरी मिळवू शकता. ती सुद्धा आपल्या आवडीची! ज्योतिषीय सल्ला, उपाय व समाधानाने आपण आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इच्छित लाभ मिळवू शकता. त्याच्या मदतीने आपण आपल्या मर्जीनुसार जीवन जगू शकता. त्याच बरोबर आपण २०२० चे आपले विस्तृत कारकिर्दीय विश्लेषण प्राप्त करून घेऊन ह्या वर्षाचे आपल्या कारकिर्दीचे नियोजन करून त्यात यशस्वी होऊ शकता. 


आपल्या कुंडलीच्या आधारे आपणास नोकरी केव्हा मिळेल हे आपण जाणून घेऊ शकता. आपल्या जन्म टिपणाच्या आधारावर आमचे ज्योतिषी ह्याची भविष्यवाणी करू शकतात. एखाद्या चांगल्या नोकरीची वेळ शोधण्यासाठी जेव्हा ज्योतिषी आपल्या कुंडलीचा अभ्यास करतात तेव्हा ते आपल्या कुंडलीत कोणता ग्रह व कोणती रास कोणत्या स्थानी स्थित असून, त्यांचा आपल्या कुंडलीवर काय परिणाम होत आहे ह्या सर्व बाजूंचा अभ्यास करतात. मग तो ग्रह निर्बल किंवा बलवान असो.

नोकरीसाठी काही महत्वाचे ज्योतिषीय मापदंड 

ज्योतिषशास्त्राच्या नियमांनुसार कुंडलीचे लग्न, द्वितीय, तृतीय, षष्ठ व दशम स्थानांचा विचार नोकरी, व्यवसाय, व्यापार तसेच त्यांच्या स्वरूपास कारणीभूत असतात. ह्या व्यतिरिक्त द्वितीय, षष्ठ व दशम स्थान मिळून अर्थ त्रिकोणाची निर्मिती करतात. 
लग्न स्थान:हे आपले व्यक्तिमत्व, प्राकृतिक स्वभाव, प्रवृत्ती व रुची दर्शविते. 
द्वितीय स्थान:ह्यास धनस्थान म्हणतात. ज्यावरून आर्थिक स्थिती, आर्थिक संभावना व रोख रक्कम ह्यांचा अभ्यास केला जातो. 
षष्ठ स्थान:हे स्थान सेवा, कार्यस्थळाचे वातावरण, ऋण व शत्रू इत्यादी दर्शविते. 
दशम स्थान:हे स्थान कामाचे क्षेत्र, व्यवसाय, सन्मान, प्रसिद्धी, पदोन्नती व नियुक्ती हे दर्शविते. वास्तविकतः दशमस्थान हे कारकिर्दी विषयक सर्व प्रश्नांचे सूचन करत असते. 
जन्म कुंडलीतील ह्या स्थानांचे विश्लेषण करून आपल्या कारकिर्दी विषयी अनेक गोष्टींची माहिती प्राप्त करून घेता येते. ह्या भावात स्थित असलेले ग्रह व राशी ह्यांचे विश्लेषण करून आपल्या कारकिर्दीशी संबंधित विविध शक्यतांची सुद्धा माहिती करून घेता येते. 

नोकरी मिळण्याचा अनुमानित कालावधी 

नोकरी मिळण्यासाठी ग्रहांची दशा, ग्रहांचे गोचर व त्याच बरोबर शनी व गुरु च्या गोचरीचा सुद्धा अभ्यास करण्यात येतो. ग्रह दशा जीवनातील अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीची माहिती देते. हि माहिती आपल्या कारकिर्दीसाठी सुद्धा महत्वाची असते. ग्रहांच्या स्थितीवरून आपल्या कारकिर्दी विषयी बरेच काही सांगता येते इतकेच नव्हे तर आपल्या कामा विषयी आपले विचार काय आहेत हे सुद्धा. आमचे अनुभवी ज्योतिषी तज्ञ आपणास आपल्या आवडीचे क्षेत्र व कारकीर्द शोधण्यास तसेच व्यवसाय विषयक मार्गदर्शन करण्यास आपणास मदत करू शकतात. ते आपल्या कारकीर्दीस प्रभावित करणाऱ्या लक्षणांचा सुद्धा अभ्यास करतात. ह्यामुळे आपण आपल्या कुंडलीतील अनुकूल व प्रतिकूल गुणांविषयी सुद्धा माहिती मिळवून आपली कारकीर्द उंचावून अधिक लाभ प्राप्त करू शकता. 

सारांश 

कारकिर्दीय ज्योतिषशास्त्राच्या मदतीने "आपली कारकीर्द कशी असेल ?" किंवा "आपण कोणत्या क्षेत्रात कारकीर्द घडवू शकता ?" किंवा "आपणास नोकरी केव्हा मिळू शकेल?" ह्याची माहिती करून घेऊ शकता. आपले निःशुल्क जन्म टिपण सुद्धा जन्म कुंडलीच्या आधारे आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ कारकिर्दीचा विकल्प शोधण्यास आपल्याला मदत करू शकेल. कारकिर्दीय ज्योतिषशास्त्र आपणास कारकिर्दीतील सामान्य प्रवाह व मिळणाऱ्या फायद्यांचे मार्गदर्शन करते. त्याच बरोबर आपण भविष्यात चालून येणारी संधी, व्याप्ती, प्राप्तीचा ओघ, संभाव्य अडचणी इत्यादी संबंधित बाबींची माहिती सुद्धा मिळवू शकता.

आपल्या व्यक्तिगत समाधानासाठी आत्ताच आमच्या तज्ञ ज्योतिषांशी बोला!

गणेशजींच्या कृपेने,
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम