मधुस्रवा तृतीया २०१९ दिनांक, व्रत कथा व पूजा विधी


मधुस्रवा तृतीया २०१९ 
मधुस्रवा तृतीयेने होते अखंड सौभाग्य प्राप्ती 
श्रावण महिन्यातील शुक्ल तृतीयेस मधुस्रवा तृतीया ह्या नांवाने साजरी करण्यात येते. ह्यास श्रावणी तृतीया किंवा हरियाली तृतीया किंवा कजली तृतीया असे हि संबोधण्यात येते. विशेषतः उत्तर भारतातील महिला हि साजरी करतात. भगवान श्रीशंकर व माता पार्वती ह्यांचे पूजन करून सौभाग्यवती महिला हि तृतीया साजरी करतात. मुख्य म्हणजे ह्या दरम्यान संपूर्ण जमीन हिरवीगार झालेली असल्याने संपूर्ण वातावरण सुद्धा  आल्हाददायक असते. त्यामुळे झाडांवर झोपाळा सजवून सौभाग्यवती महिला व युवती झोपाळ्यावर झुलत राहून वातावरणाचा सुखद आनंद लुटत असतात. 

पूजा विधी 
- सकाळी उठून स्नानादी कर्मे उरकल्यावर धूत वस्त्र परिधान करून पूजेचा संकल्प करावा. 
- पूजेपूर्वी वाळूने भगवान श्रीशंकर, माता पार्वती व श्रीगणेश ह्यांची प्रतिमा तयार करावी. 
- त्या नंतर एका तबकात सौभाग्य सामग्री सजवून ती माता पार्वतीस अर्पण करावी. 
- भगवान श्रीशंकर ह्यांना सुद्धा वस्त्र अर्पण करावे. 
- त्या नंतर मधुस्रवा तृतीयेच्या कथेचे पठन किंवा श्रवण करावे. 

मधुस्रवा तृतीयेची व्रत कथा 
मधुस्रवा तृतीयेशी संबंधित पौराणिक कथेनुसार ह्याचा संबंध भगवान श्रीशंकर व माता पार्वती ह्यांच्या मिलनाशी येतो. भगवान श्रीशंकर ह्यांनीच माता पार्वतीस हे सांगितले होते. ह्या कथेनुसार भगवान श्रीशंकर ह्यांनी माता पार्वतीस सांगितले कि पतीच्या रूपात शंकरास प्राप्त करण्यासाठी माता पार्वती ह्यांनी १०७ वेळा जन्म घेतला परंतु, १०८ व्या जन्मात पर्वतराज हिमालय ह्यांच्या घरी जन्म घेतल्यावरच त्यांची हि मनोकामना पूर्ण झाली. भगवान श्रीशंकराने सांगितले कि त्यासाठी माता पार्वतीने कठोर तपस्या केली. त्यासाठी त्यांनी श्रावण शुक्ल तृतीयेस वाळूचे शिवलिंग निर्माण करून त्याची आराधना केली व त्यानंतरच त्यांची मनोकामना पूर्ण होऊ शकली. ह्या नंतर पर्वतराजाने भगवान श्रीशंकर व माता पार्वती ह्यांचा विवाह लावून दिला. भगवान श्रीशंकर ह्यांनी सांगितले कि श्रावण शुक्ल तृतीयेचे व्रत केल्यामुळेच हे शक्य झाले. भगवान श्रीशंकरांनी असे हि सांगितले आहे कि निष्ठापूर्वक हे व्रत केल्यास प्रत्येक स्त्रीला तिचे मनोवांछित फळ ते देतील. त्याच बरोबर हे व्रत श्रद्धापूर्वक केल्यास अखंड सौभाग्य प्राप्ती सुद्धा होईल. 

मधुस्रवा तृतीयेचा उत्सव 
साधारणपणे हा उत्सव भेटवस्तू देऊन साजरा करण्यात येतो. ह्या दिवशी माता - पिता आपल्या विवाहित मुलीस व तिच्या सासरच्या लोकांना काही भेटवस्तू देतात. 
मधुस्रवा तृतीया २०१९ 
३ ऑगस्ट, शनिवार 
तृतीया तिथी प्रारंभ - ३ ऑगस्ट २०१९ रोजी ०१.३६. 
तृतीया तिथी समाप्ती - ३ ऑगस्ट २०१९ रोजी २२.०५.