गुरु पौर्णिमा २०१९: गुरु पौर्णिमा तिथी, पूजा विधी, महत्व व कथा


गुरु महिमा कोणास माहित नाही ? भारतात गुरूंना देवांहून श्रेष्ठ समजण्यात येते. प्रतिवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेस गुरु पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येतो. ह्या वर्षी गुरु पौर्णिमा १६ जुलै २०१९ रोजी येत आहे. गुरु मोक्षाचा मार्ग दाखवीत असतात. संत कबीर ह्यांनी गुरूंचा महिमा सांगितला आहे तो असा - 
गुरु गोविंद दोऊ खड़े, काके लागूं पांय।
बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो बताएं।
ह्याचा अर्थ स्पष्ट आहे कि गुरु हे गोविंदाहून सुद्धा मोठे आहेत. ज्यांनी गोविंदाचा मार्ग दाखवला. 

गुरु पौर्णिमा २०१९: पूजा विधी व कथा 
- सकाळी लवकर उठून स्नानादी कर्मे उरकून घ्यावी. 
- घरी उत्तर दिशेस पांढरे आसन अंथरून त्यावर गुरूंची तसवीर ठेवावी. जर आपले गुरु आपल्या जवळच किंवा आश्रमात असतील तर तेथे उत्तरेस पाट मांडून त्यावर हे आसन ठेवावे. 
- आपण आपले नांव व गोत्र ह्यांचे उच्चारण करून हातात पाणी घेऊन गुरु पूजेचा संकल्प करावा. 
- भगवान श्रीविष्णू व भगवान श्रीशंकर ह्यांना स्मरून गुरूंचे पाय धुवावेत. 
- ह्या दिवशी पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करूनच गुरु पूजन करावे. 
- त्या नंतर गुरूंना फुलांचा हार अर्पण करून त्यांच्या आवडीच्या गोड पदार्थाचा नेवैद्य दाखवावा. जर गुरूंनी एखादा मंत्र दिला असेल तर त्या मंत्राचा कमीत कमी १०८ वेळा जप जरूर करावा. 
- गुरूंना वंदन करून आशीर्वाद घ्यावा. गुरूंची तसवीर किंवा साक्षात गुरूंची आरती करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. भगवान श्रीसत्यनारायण ह्यांच्या कथेचे पठन करावे. गुरु पौर्णिमा हा खरा तर गुरु महिमेचा उत्सव आहे,  परंतु ह्या दिवशी पौर्णिमा असल्याने भगवान श्रीसत्यनारायण पूजेस सुद्धा एक विशेष महत्व आहे. 
- गुरु पौर्णिमेस गुरूंचे पूजन केल्यावर भगवान श्रीसत्यनारायण ह्यांच्या कथेचे पठन करून एक वेळ उपास केल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते. ह्या दिवशी महर्षी वेद व्यास ह्यांच्या पूजनाने सुद्धा विशेष फल प्राप्ती होते. 

गुरु पौर्णिमा २०१९ - शुभ मुहूर्त 
पौर्णिमा तिथी प्रारंभ - १६ जुलै २०१९, रात्री ०१.४८ 
पौर्णिमा तिथी समाप्ती - १७ जुलै २०१९, पहाटे ०३.०७. 
शुभ मुहूर्त - १६ जुलै २०१९ दुपारी ०१.३० ते ०४.०० पर्यंत राहू काळ आहे. तत्पूर्वी गुरु पौर्णिमेचे पूजन केव्हाही करता येते. 

गुरु पौर्णिमेचे उद्धरण 
 जिसने बनाया तुम्हें ईश्वर, गुरु का करो सदा आदर
अक्षर ज्ञान ही नहीं, गुरु ने सिखाया जीवन ज्ञान, गुरुमंत्र को कर आत्मसात, हो जाओ भवसागर पार।
 एक तुम्हीं आधार सद्गगुरु, करा दो भवसागर पार।

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम