गुढी पाडवा २०१९ : गुढी पाडवा केव्हा व का साजरा करण्यात येतो

आआे, नूतन वर्ष मना लें!
गृह-विहीन बन वन-प्रयास का 
तप्त आंसुआें, तप्त श्वास का, 
एक आैर युग बीत रहा है, 
आआे इस पर हर्ष मना लें
आआे, नूतन वर्ष मना लें।। 


श्री. हरिवंश राय बच्चन ह्यांची हि सुंदर कविता गुढी पाडव्या निमित्त लोकात नवीन उत्साह व स्फूर्ती निर्माण करणारी आहे. गुढी पाडव्या पासून हिंदू धर्मीयांच्या नवीन वर्षास सुरवात होते. गुढीचा अर्थ आहे, "विजय पताका". असा समज आहे कि शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या पुत्राने मातीचे सैनिक तयार करून त्यांच्यात सिद्ध मंत्राने प्राणार्पण केले. त्या नंतर ह्या सैनिकांनी युद्धात शत्रूंवर विजय मिळविला. ह्याच विजयाचे प्रतीक म्हणून "शालिवाहन शक" ह्याची सुरवात झाल्याचे मानण्यात येते. हा सण आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यात "उगादी" तर महाराष्ट्रात "गुढी पाडवा" ह्या नावाने दणक्यात साजरा केला जातो. 

हिंदू नव वर्ष सुरु झाल्याचे गुढी पाडवा हे एक प्रतीक आहे 
गुढी पाडवा हा सण मुख्यत्वे महाराष्ट्रात हिंदू नववर्षाचा आरंभ म्हणून आनंदात साजरा केला जातो. हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदे पासून सुरु होणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरवातीच्या दिवशीच साजरा करण्याची परंपरा आहे. गुढी पाडव्याचा सण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व गोवा ह्या सहित दक्षिण भारतीय राज्यात हर्षोल्लासात साजरा करण्यात येतो. गुढीचा अर्थ ध्वज म्हणजेच झेंडा व पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी. असा समाज आहे कि ब्रह्मदेवाने ह्याच दिवशी सृष्टीची रचना केली होती. ह्याच दिवसा पासून चैत्री नवरात्रीस सुद्धा प्रारंभ होतो.

२०१९ साली गुढी पाडव्याचा सण 
भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार ह्या वर्षी गुढी पाडवा हा सण ६ एप्रिल रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा ह्या तिथीस आहे. ६ एप्रिल पासूनच चैत्र नवरात्रीस व हिंदू नववर्षास सुरवात होत आहे. सर्व युगात प्रथम असलेल्या सतयुगाची सुरवात सुद्धा ह्या तिथी पासूनच झाली. पौराणिक कथेनुसार चैत्र नवरात्रीच्या प्रथम दिवशी आदिशक्ती प्रगट झाली होती. भारतीय कालगणनेनुसार चैत्र हा वर्षाचा पहिला महिना असतो. 

हिंदू पंचांगाच्या रचनेचा काळ 
असे समजण्यात येते कि भारताचे महान गणितज्ञ व खगोलशास्त्री श्री. भास्कराचार्य ह्यांनी सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंतचा दिवस, महिने व वर्ष ह्यांची गणना करून भारतीय पंचांगाची रचना केली. 

गुढी पाडव्याशी संबंधित पौराणिक कथा
दक्षिण भारतात गुढी पाडवा हा सण खूपच लोकप्रिय आहे. पौराणिक मान्यतेनुसार सतयुगात दक्षिण भारतात राजा बालीचे राज्य होते. जेव्हा प्रभू श्रीराम ह्यांना लंकापती रावण ह्याने सीतामातेचे हरण केल्याचे समजले तेव्हा सीतेचा शोध घेत असता ज्यावेळेस ते दक्षिण भारतात पोचले त्यावेळेस त्यांची भेट सुग्रीवाशी झाली. सुग्रीवाने श्रीराम ह्यांना बालीच्या कुशासनाची माहिती देऊन आपण त्यांची मदत करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. त्या नंतर प्रभू श्रीराम ह्यांनी बालीचा वध करून दक्षिण भारतीय लोकांना बालीच्या त्रासातून मुक्त केले. अशी मान्यता आहे कि तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता. ह्या मुळेच ह्या दिवशी गुढी म्हणजेच पताका फडकवण्यात येते. 

एका दुसऱ्या कथेनुसार शालिवाहनाने मातीतून सैन्य बनवून त्यांच्यात प्राणार्पण करून शत्रूचा पराभव केला. त्या दिवसा पासून शालिवाहन शकास प्रारंभ झाल्याचे समजण्यात येते. ह्या दिवशी लोक आंब्याच्या तोरणाने घरास सजवतात. आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात ह्या दिवशी उत्साह दिसून येतो. 

सृष्टीचा निर्माण दिवस 
असे म्हणतात कि गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेस ब्रह्माने सृष्टीच्या निर्मितीचे कार्य हाती घेतले होते. ह्याच कारणास्तव ह्यास सृष्टीचा प्रथम दिवस म्हणून समजण्यात येते. ह्या दिवशी नवरात्र घटस्थापना, ध्वजारोहण, संवत्सर पूजन इत्यादी करण्यात येते. ह्यास हिंदू दिनदर्शिकेचा पहिला दिवस सुद्धा म्हटले जाते. आता आपण विचारात पडला असाल कि नवीन वर्ष तर सर्वत्र १ जानेवारीस साजरे होते तर मग हिंदू दिनदर्शिकेचा अर्थ काय? परंतु आम्ही आपणास हे सांगत आहोत कि १ जानेवारीस साजरे होणारे नवीन वर्ष हे पाश्चात्य संस्कृतीचे प्रतीक आहे. सृष्टीच्या निर्मितीचा हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी एक विशेष असा आहे. ज्यात बारा महिने क्रमश: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन हे होय. 

गुढी पाडव्याचे महत्व 
आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा गुढी पाडव्यास खूप महत्व आहे. ह्या दिवशी शिजविण्यात येणारे भोजन ज्यात आंध्र प्रदेशात शिजविण्यात येणारी पचडी असेल किंवा महाराष्ट्रात बनविण्यात येणारी पुरण पोळी असेल, हे सर्वच पदार्थ स्वास्थ्यवर्धक असतात. असे समजले जाते कि अनशा पोटी पचडी खाल्यास त्वचा विकार दूर होण्या बरोबरच प्रकृती उत्तम होते. तसेच पुरण पोळीत असलेला गूळ आरोग्यास उपयुक्त असतो. ह्या दिवशी लोक सकाळी कडुलिंबाची पाने सुद्धा खातात. असे मानले जाते कि त्याने रक्तशुद्धी होते. 

गुढी पाडव्याची परंपरा 
गुढी पाडव्याच्या दिवशी लोक आपल्या घराची स्वच्छता करून दारात रांगोळी काढतात व दारास तोरण बांधून सजावट करतात. घरा समोर गुढी उभारण्यात येते. ह्या दिवशी सूर्याची आराधना करण्या व्यतिरिक्त सुंदरकांड, रामरक्षा स्तोत्र व भगवती देवीच्या मंत्रांचा जप करण्याची सुद्धा परंपरा आहे. 

गुढी पाडवा कसा साजरा करण्यात येतो हे जाणून घ्या 
- सकाळी स्नानादी कर्म आटपून गुढी सजविण्यात येते. 
- लोक घराची स्वच्छता करतात. खेडेगावात घर लिंपण्यात येते. 
- ह्या दिवशी सूर्योदयाचे वेळी अभ्यंग स्नान अवश्य करावे. 
- सूर्योदया नंतर लगेचच गुढीची पूजा करण्याची प्रथा आहे. 
- दारा समोर रांगोळी काढून फुलांनी घर सुशोभित करावे. 
- ह्या दिवशी प्रामुख्याने मराठी महिला ९ वारी साडया नेसतात तर पुरुष भगवी किंवा लाल रंगाची पगडी घालून त्या खाली कुर्ता - पायजमा किंवा धोतर - कुर्ता घालतात. 
- ह्या दिवशी नवीन वर्षाचे भविष्यफल ऐकण्याची - ऐकवण्याची सुद्धा पद्धत आहे. 
- संध्याकाळी लोक लेझीम नावाचा पारंपरिक खेळ सुद्धा खेळतात. 

विभिन्न स्थानी गुढी पाडवा 
१. गोवा व केरळ येथे कोकणी समुदाय ह्यास संवत्सर पडवो ह्या नावाने साजरा करतात. 
२. कर्नाटकात हा सण उगादी ह्या नावाने साजरा केला जातो. 
३. आंध्र प्रदेश व तेलंगणात गुढी पाडव्यास उगादी ह्या नावाने संबोधले जाते. 
४. काश्मिरी हिंदू ह्या दिवसास नवरेह म्हणून साजरा करतात. 
५. मणिपूरात हा दिवस सजीबू नोंगमा पानबा किंवा मेइतेई चेड्राओबा ह्या नावाने साजरा केला जातो. 
६. ह्या दिवसा पासूनच चैत्री नवरात्रीस सुरवात होते. 

गुढी म्हणजे काय 
महाराष्ट्रात गुढी उभारण्यात येते. त्यासाठी एक काठी घेऊन त्यावर सोवळे बांधून व  तांब्या उलटा ठेवून गुढी उभारण्यात येते. लांबून सुद्धा गुढी दिसावी म्हणून तिला उंच उभारण्यात येते. गुढीची यथोचित पूजा करून त्यास रंगीत फुले वाहण्यात येतात. 
- असा समज आहे कि सम्राट शालिवाहन ह्याने शत्रूंचा पराभव केल्या नंतर लोकांनी घरावर गुढी उभारून आनंद साजरा केला होता. 
- छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या विजयाची स्मृती म्हणून सुद्धा गुढी उभारण्यात येते. 
- अशी मान्यता आहे कि ब्रह्माने ह्या दिवशी सृष्टीची रचना केली होती. म्हणून गुढीस ब्रह्मध्वज असे सुद्धा संबोधले जाते. 
- काही काही ठिकाणी प्रभू श्रीराम आपला १४ वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येस परतल्याच्या आनंदाने सुद्धा गुढी उभारण्यात येते. 
- अशी एक मान्यता आहे कि गुढी उभारल्याने घराची भरभराट होते. 
- शेतकरी रब्बी पिके काढून पुन्हा पेरणी करण्याच्या आनंदात हा सण साजरा करतात. 
- हिंदू लोकात वर्षभरातील साडे तीन मुहूर्त अत्यंत शुभ मानले जातात, ज्या पैकी गुढी पाडवा हा एक होय. ह्या व्यतिरिक्त अक्षय तृतीया व दसरा हे पूर्ण तर दिवाळीस अर्धा मुहूर्त मानण्यात येते. 

पकवान्न हे सुद्धा विशेष महत्वाचे 
आंध्र प्रदेशात "उगादी" व महाराष्ट्रात "गुढी पाडवा" ह्या नावाने साजरा करण्यात येणाऱ्या सणाच्या दिवशी घरा घरात विशिष्ट पकवान्न बनविण्यात येते. ज्यात आंध्र प्रदेशातील घरात विशिष्ट प्रकारचे पेय पदार्थ "पचडी किंवा प्रसादम" हे तीर्थ स्वरूपात देण्यात येते. असा समज आहे कि हे अनशा पोटी सेवन केल्याने मनुष्य निरोगी राहतो. त्याने त्वचा विकार दूर होतात. तर महाराष्ट्रात ह्या दिवशी पुरण पोळी बनविण्यात येते, ज्यात गूळ असतो. जो आरोग्यास उत्तम असतो. 

गुढी पाडव्याचा मुहूर्त 
- चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षी ज्या दिवशी सूर्योदयास प्रतिपदा असेल त्या दिवसा पासून नवीन वर्षांची सुरवात होते. 
- जर दोन दिवसांच्या सूर्योदयी प्रतिपदा असल्यास त्यातील प्रथम दिवशी गुढी पाडवा साजरा करण्यात येतो. 
- जर कोणत्याही दिवशी सूर्योदयास प्रतिपदा नसेल तर प्रतिपदेच्या आरंभी किंवा समाप्तीस येत असणाऱ्या दिवशी नवीन वर्ष साजरे करण्यात येते. 

गुढी पाडवा मुहूर्त २०१९ 
शालिवाहन शके १९४१ सुरु 

प्रतिपदा तिथी प्रारंभ - ५ एप्रिल २०१९ ह्या दिवशी ११.५० 
प्रतिपदा तिथी समाप्ती - ६ एप्रिल २०१९ ह्या दिवशी १२.५३

श्री गणेशजींच्या आशीर्वादांसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी