गणेश पूजनाने बुध, राहू - केतू व नवग्रह शांती उपाय


दि. २२ ऑगस्ट २०२० पासून गणेश चतुर्थीसह दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरु होत आहे. हिंदू पंचांगानुसार प्रतिवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करण्यात येतो. आख्यायिकेनुसार ह्याच दिवशी भगवान श्रीगणेश ह्यांचा जन्म झाला होता. ह्या दिवशी बुद्धी, समृद्धी व सौभाग्याची देवता असलेल्या भगवान श्रीगणेशाची विधिवत पूजा - अर्चा करण्यात येते. ह्या दिवशी स्नानादी कार्यक्रम उरकल्यावर श्रीगणेश ह्यांना अबीर, बुक्का, यज्ञोपवीत, दुर्वा, फुले इत्यादी अर्पण करून लाडू किंवा गुळाने बनविलेल्या मिठाईचा नेवैद्य दाखविण्या बरोबरच दीप व उदबत्ती प्रज्वलित करून आरती करण्यास विशेष महत्व आहे. श्रीगणेशाचे विभिन्न प्रकारे पूजन करून अनेक प्रकारच्या ग्रह दोषांचे निवारण करता येते. बुध व राहू - केतू सारख्या हानिकारक ग्रहांच्या दोषांचे निवारण सुद्धा श्रीगणेश पूजनाच्या माध्यमातून करता येते. 

श्रीगणेश पूजेचे फायदे

भगवान श्रीगणेश स्वतः शुभ - लाभ व रिद्धी - सिद्धीचे दाता आहेत. ते भक्तांची बाधा, संकट, रोग - दोष, दरिद्रता ह्यांना दूर करतात. शास्त्रानुसार असे मानण्यात येते कि श्रीगणेश ह्यांच्या विशेष पूजेचा दिवस हा बुधवार आहे. भगवान श्रीगणेश हे बुध ग्रहाचे अधिपती सुद्धा आहेत. ह्या दिवशी विधीनुसार भगवान श्रीगणेश ह्यांची पूजा केल्यास  नवग्रह दोषांपासून मुक्तता होते व सर्व त्रासदायी व प्रतिकूल परिस्थितींवर मात करता येते. भगवान श्रीगणेशांच्या पूजनाने सुख, वैभव, शांती व समृद्धी प्राप्त होऊ शकते.


श्रीगणेश पूजनाने बुध ग्रहाची शांती 

शास्त्रानुसार भगवान श्रीगणेश ह्यांची विशेष पूजा करण्यासाठी उपयुक्त दिवस हा बुधवार आहे. मान्यतेनुसार बुधवारी श्रीगणेशाची पूजा व उपाय केल्यास प्रत्येक समस्येचे निराकरण होते. मारुती प्रमाणेच श्रीगणेशास सेंदुरानेच शृंगारण्यात येते, व त्यामुळे साधकाच्या सर्व समस्यांचे निराकरण होते. आपणास आम्ही काही उपाय सांगत आहोत कि ज्याने आपण आपल्या अनेक त्रासातून मुक्त होऊ शकाल. हे उपाय जर बुधवारी किंवा गणेशोत्सवा दरम्यान करण्यात आले तर त्वरित फलप्राप्ती होते. 
- बुधवारच्या दिवशी सकाळी स्नानादी कार्यक्रम उरकून भगवान श्रीगणेश ह्यांना दुर्वांच्या ११ किंवा २१ जुड्या अर्पित कराव्या. 
-  एखाद्या गरजवंतास हिरवे मूग दान करावेत. हिरव्या रंगाचा संबंध बुध ग्रहाशी असल्याने हिरवे मूग दान केल्यास बुध ग्रहाच्या दोषांचे निवारण होते.   
- जर एखाद्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ स्थितीत असेल तर बुधवारी श्रीगणेशास सेंदूर, चंदन, यज्ञोपवीत, दुर्वा अर्पित करून मोदक, लाडू किंवा गुळाच्या मिठाईचा नेवेद्य दाखवावा. 
- बुधवारच्या दिवशी धूप व दीपक प्रज्वलित करून भगवान श्रीगणेशाची आरती केल्याने सुद्धा बुध दोषाचे निवारण होते. 
- बुधवारी ह्या मंत्राचा जप करावा. 
मंत्र:- "ॐ गं गणपतये नम:" 

राहू व केतुचे दोष निवारण 

बल, बुद्धी व विवेकाचे दैवत भगवान श्रीगणेश विघ्नहर्ता असून ते धन, बुद्धी व ऐश्र्वर्याचे सुद्धा स्वामी आहेत. भगवान श्रीगणेश ह्यांचा जन्म सुद्धा दोन शरीरांच्या मिलनातून झाला आहे. राहू - केतूची स्थिती ह्याच्या विरुद्ध असलेली दिसते, जेथे एका शरीराचे दोन भाग आहेत. म्हणूनच भगवान श्रीगणेश ह्यांच्या आराधनेमुळे राहू - केतू संतुष्ट होतात. ज्योतिष शास्त्रानुसार भगवान श्रीगणेश ह्यांना अर्पण करण्यात येणाऱ्या दुर्वांचा संबंध राहूशी आहे. ज्योतिष शास्त्रात राहूची वनस्पती म्हणून दुर्वांना संबोधण्यात येते. राहू दोषाच्या शांतीसाठी श्रीगणेश द्वादश स्तोत्राचे पठन करणे उचित ठरते. ह्या स्तोत्राचे पठन करत असताना प्रत्येक नावा गणिक भगवान श्रीगणेश ह्यांना दुर्वा अर्पण करत राहावे. केतू दोष निवारणासाठी एखाद्या गरजवंतास हिरवे मूग दान करावेत. तसेच भगवान श्रीगणेश ह्यांच्या मंदिरात जाऊन यथाशक्ती दान करावे. ज्योतिष शास्त्रात भगवान श्रीगणेश ह्यांना अत्यंत शुभ व प्रभावी समजण्यात येते. जातक काही सामान्य उपाय करून नवग्रह दोषांपासून मुक्त होऊ शकतो. 

नवग्रह दोष शांती उपाय 

१. सकाळी श्रीगणेशास दुर्वा अर्पण करून घरा बाहेर पडल्यास आपल्या कार्यात येणारे अडथळे दूर होतात. 
२. श्रीगणेश ह्यांना दुर्वा वाहून मोतीचूर लाडूंचा नेवेद्य दाखवून लक्ष्मीजींच्या प्रतिमे समोर शुद्ध तुपाचा दिपक प्रज्वलित केल्यास आर्थिक चिंतांपासून मुक्ती होते. 
३. दुकान किंवा व्यावसायिक वास्तूच्या उदघाटना दरम्यान चांदीच्या वाटीत धणे भरून त्यात चांदीची लक्ष्मी व श्रीगणेश ह्यांची मूर्ती ठेवावी व हि चांदीची वाटी पूर्व दिशेस स्थापित करावी. दुकान उघडल्यावर ह्याचे पूजन केल्यास व्यवसायात उन्नती होते. 
४. रोज नियमितपणे भगवान श्रीगणेश ह्यांची पूजा करून त्यांचा मंत्र "ॐ गं गणपतये नम:" ह्याचा जप केल्यास सर्व प्रकारच्या परीक्षेत यश प्राप्ती होते. 
५. संकष्टी चतुर्थीस उपवास केल्याने चंद्राच्या शुभ फलांची प्राप्ती होते. 
६. श्रीगणेश ह्यांच्या मंत्र जपाने शनी दोषाने पीडित व्यक्तीस सुद्धा दिलासा मिळतो. 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम