एकादशी व्रत २०२१ सूची - एकादशी मंत्र, महत्व व व्रत असता काय करावे

हिंदू कालनिर्णयानुसार "एकादशी व्रत" पौर्णिमा व अमावास्ये पासून ११ व्या दिवशी करण्यात येते. त्यानुसार प्रत्येक महिन्यात २ एकादशी व्रत करण्यात येतात. एक शुक्ल पक्षात व दुसरे कृष्ण पक्षात. हिंदू शास्त्रात एकादशी तिथीला खूप मोठे महत्व देण्यात आले आहे. २०२१ दरम्यान २५ एकादशी येतील. एकादशीस भगवान श्री विष्णू ह्यांचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. एकादशी हि भगवान श्री विष्णू ह्यांची प्रिय तिथी आहे. 

सर्व एकादशींचे एक महत्व 

काहीवेळा एकादशीचे व्रत दोन दिवसांचे असते. व्रताच्या एक दिवस अगोदर व्रत करणारी व्यक्ती फक्त दुपारचे भोजन ग्रहण करते व रात्री काहीच खात नाही. ह्याचे मुख्य कारण असे आहे कि व्रत असलेल्या दिवशी पोटात अन्नाचा एकही कण असता कामा नये. एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस कडक व्रत करावयाचे असते. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदया नंतर व्रत करणारी व्यक्ती भोजन ग्रहण करू शकते. व्रत असलेल्या दिवशी कोणत्याही प्रकारचे अन्न प्राशन करावयाचे नसते. ह्या व्यतिरिक्त भक्त आपल्या सामर्थ्यानुसार निर्जला व्रत सुद्धा करू शकतो. भोजनात फक्त फलाहार घेता येतो, जो भक्ताच्या इच्छेनुसार फक्त एकदाच करता येतो. 
प्रत्येक एकादशीचे आपले एक महत्व असते. हे व्रत भक्त भगवान श्री विष्णूंच्या कृपेसाठी करतो. एकादशी व्रताचे फळ कोणत्याही होम - हवन, वैदिक कर्म कांड इत्यादींपेक्षा अधिक असते. एक अशी हि मान्यता आहे कि ह्या दिवशी व्रत केल्याने पितरांना स्वर्गाची प्राप्ती होते. 

एकादशी व्रतासाठी विष्णू मंत्र 

विष्णु मंत्र :  ॐ नमो नारायणाय ।।
              ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
विष्णु गायत्री महामंत्र - ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि, तन्नो विष्णु: प्रचोदयात्‌।।

एकादशी व्रत कसे करावे 

- सकाळी सर्वात आधी शुद्ध पाण्याने स्नान करून व्रताचा संकल्प करावा. 
- विधीनुसार भगवान श्री विष्णूंची पूजा करावी. रात्री दीपदान करावे. 
- भजन - कीर्तन ह्यासाठी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ असतो. 
- दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी भगवान श्री विष्णूंचे पूजन करून गरजवंतास भोजन द्यावे. 
- यथाशक्ती दान करून पूजेचे समापन करावे. 
काहीवेळा एकादशी हि दोन दिवस असते. अशावेळी पहिल्या दिवशी विधीनुसार व्रत करून दुसऱ्या दिवशी भोजन ग्रहण करावे. दोन दिवसांचे व्रत असता दुसरा दिवस हा संन्यासी, विधवा स्त्री व मोक्ष प्राप्तीची इच्छुक व्यक्ती ह्यांच्यासाठीचा असतो. दोन्ही दिवसांपैकी कोणत्याही दिवशी व्रत केल्यास भक्त भगवान श्री विष्णूंच्या कृपेस पात्र होतो.
 
श्री गणेशजींच्या कृपेसह 
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम