सूर्य ग्रहण २०२० चा आपल्या राशीवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

२१ जून २०२० रोजी होणारे सूर्य ग्रहण अनेक कारणांनी महत्वपूर्ण ठरणार असून ते मिथुन राशीतून होत आहे. ज्या वेळेस मिथुनेत सूर्य ग्रहण होईल त्यावेळेस सूर्य, बुध व राहू ह्यांच्या युतीत येईल. त्याच बरोबर सूर्य ग्रहणाच्या दिवशी सहा ग्रह वक्री अवस्थेत असणार आहेत. वैदिक ज्योतिषात अशा स्थितीस अशुभ मानण्यात येते. असे असले तरी काही ज्योतिषांच्या मतानुसार कंकणाकृती ग्रहण असल्याने संसर्गाने फैलावणाऱ्या रोगांना नियंत्रित करण्यास त्याची मदत होईल व आगामी काळात संसर्गजन्य आजारांचा उच्छाद कमी होण्याची अपेक्षा आहे. 

जून २०२० ला होणारे वर्षातील हे पहिलेच सूर्य ग्रहण देशातील जवळ जवळ सर्व ठिकाणांहून दिसेल. हे एक कंकणाकृती ग्रहण असेल ज्यात सूर्य एखाद्या मोठ्या कंकणा सारखा दिसू शकेल. हे सूर्य ग्रहण देशातील सर्व राज्यातून दिसणार असल्याने ग्रहणाशी संबंधित सर्व धार्मिक नियम त्यास लागू होतील. सूर्य ग्रहण २०२० शी संबंधित अन्य माहितीसाठी येथे क्लिक करा. राशिचक्रानुसार सूर्य ग्रहण हे मिथुन राशीतून होणार आहे. मिथुन राशीत बुध व राहू आधी पासूनच उपस्थित आहेत. त्याचमुळे ह्या सूर्य ग्रहणाचा परिणाम राशीचक्रातील प्रत्येक राशीवर होणार आहे. 

जून २०२० रोजी होणाऱ्या सूर्य ग्रहणाचा सर्व राशींवर होणाऱ्या परिणामांची माहिती करून घ्या 


मेष रास 
मेष राशीच्या तृतीय स्थानातून हे ग्रहण होत आहे. कुंडलीतील तृतीय स्थान हे पराक्रम स्थान ह्या नांवाने ओळखले जाते. ह्या भावात राहू आधीपासूनच स्थित आहे. ह्या भावातून ग्रहण होत असल्याने आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायातील लक्ष्यांक पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. आपण जर शासन किंवा शासनाशी संबंधित कार्य करत असल्यास आपणास विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ग्रहण काळा दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींनी सतत गायत्री मंत्राचा जप करावा व ग्रहण समाप्ती झाल्यावर लाल रंगांच्या वस्तू, लाल कपडे, मसूर डाळ इत्यादींचे दान करावे. 

वृषभ रास 
वृषभ राशीच्या द्वितीय स्थानातून हे ग्रहण होत आहे. द्वितीय स्थानी बुध व राहू हे आधीपासूनच स्थित आहेत. द्वितीय स्थानाचा संबंध कुटुंब, पैतृक संपत्ती, वाणी व धन ह्यांच्याशी येतो. द्वितीयेतून ग्रहण होत असल्याने वृषभ राशीच्या जातकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर पैतृक संपत्तीशी संबंधित एखादा विवाद असेल तर त्याचे निराकरण होण्याची शक्यता धूसर होईल. ह्या दरम्यान आपणास आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. ग्रहण काळा दरम्यान आपण "ॐ महालक्ष्मये नमः" मंत्राचा सतत जप करावा. ह्या व्यतिरिक्त ग्रहण समाप्ती नंतर दूध, दही, तांदूळ व इतर पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे. 

मिथुन रास
२१ जून रोजी होणारे सूर्य ग्रहण भारतातील प्रत्येक राज्यातून दिसणार असून त्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. हे ग्रहण आपल्याच राशीतून होणार आहे. मिथुन राशीत बुध व राहू हे आधीपासूनच विराजमान झालेले आहेत. बुध स्वगृही असल्याने ह्या ग्रहणाचा नकारात्मक परिणाम कमी प्रमाणात होईल. असे असले तरी ग्रहणकाळात कोणत्याही प्रकारची व्यावसायिक किंवा आर्थिक कामे केल्यास आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. ह्या व्यतिरिक्त आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी वाटत राहील. ग्रहणामुळे आपला आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. ग्रहणाच्या दोन दिवस अगोदर पासूनच कोणत्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरवात करू नये. ग्रहणाचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी हिरवे मूग किंवा हिरवे कपडे, हिरव्या रंगाच्या भाज्या एखाद्या गरजवंतास दान केल्यास बराच फायदा होईल. ह्या व्यतिरिक्त ग्रहणाच्या वेध काळापासून ते ग्रहण समाप्ती पर्यंत "ॐ क्लीं कृष्णाय नमः" ह्या मंत्राचा जप केल्यास आपल्यासाठी फायदेशीर होईल. ह्या सरळ उपायांनी आपण निश्चितच ग्रहणाच्या दुष्परिणामां पासून आपले रक्षण करू शकाल. 

कर्क रास 
कर्क राशीसाठी २१ जून रोजीचे सूर्य ग्रहण कुंडलीच्या व्यय स्थानातून होत आहे. ह्या स्थानाचा संबंध परदेश प्रवास किंवा व्यापाराशी येतो. ह्या ग्रहणामुळे आपणास विनाकारण खर्च करावा लागेल. आपण एखाद्या कामासाठी कर्जाची मागणी सुद्धा करू शकाल. त्याच बरोबर काही लोक आपणास भ्रमित करून आपल्या कडून उधारीवर पैसे घेण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांपासून आपणास सावध राहावे लागेल. आपण जर कोणत्याही प्रकारे विदेशाशी व्यापारा निमित्त संबंधित असाल तर आपणास त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. विनाकारण प्रवास केल्यास आपणास संसर्गजन्य विकार होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. ग्रहणाचा दुष्प्रभाव टाळण्यासाठी भगवान शंकरास दुधाचा अभिषेक करावा. त्याच बरोबर पांढऱ्या वस्तू उदाहरणार्थ दूध, चांदीची एखादी वस्तू इत्यादी गरजवंतास दान करावी. ह्या उपायांमुळे ग्रहणाचे दुष्परिणाम कमी होऊन संभाव्य नकारात्मकता दूर होईल.

सिंह रास 
आपल्यासाठी हे ग्रहण नुकसानदायी नसले तरी ग्रहण हे ग्रहणच असते, म्हणून आपण अतिरिक्त लाभाची अपेक्षा बाळगू नये. एखाद्या नातेवाईकास किंवा मित्रास जामीन राहू नये, अन्यथा आपली प्रतिमा मलीन होण्याची किंवा संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जागा व सार्वजनिक जीवना पासून शक्यतो अंतर राखावे. कोर्ट - कचेरी किंवा वरिष्ठांशी व्यवहार करताना नम्रता राखावी.  

कन्या रास 
२१ जून रोजी होणारे ग्रहण हे आपल्या केंद्रस्थानातून होत असल्याने ग्रहणकाळा दरम्यान आपणास सावध राहावे लागेल. ह्याच्या प्रभावामुळे आपल्या कारकिर्दीत किंवा व्यवसायात चढ - उतार संभवतात. वरिष्ठांशी आपले संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. वडील व शासनाशी असलेल्या संबंधात जपून पाऊल टाकावे लागेल. जर एखाद्या कार्यात यश प्राप्त न झाल्यास निराश न होता शांतपणे त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. 

तूळ रास 
हे ग्रहण आपल्या भाग्यस्थानातून होत असल्याने उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येऊ शकतात. आपणास नशिबाची साथ मिळत नसल्याचे किंवा कष्टाचे योग्य फळ मिळत नसल्याचे जाणवेल. पित्याशी वैचारिक मतभेद संभवतात. हे ग्रहण आपल्या नवम स्थानातून होत आहे. ह्या स्थानाचा संबंध धर्म व भाग्याशी येतो. ग्रहणकाळा दरम्यान आपणास आपल्या इष्टदेवतेचे अनुष्ठान करण्याचा सल्ला देण्यात येत असून शक्य असल्यास आज आपण उपास सुद्धा करावा. ह्या व्यतिरिक्त ग्रहणकाळा दरम्यान "ॐ अरुणाय नमः" ह्या मंत्राचा जप केल्यास चांगले फळ प्राप्त होऊ शकेल. 

वृश्चिक रास 
आपल्यासाठी हे ग्रहण नुकसानदायी स्थानातून होत असल्याने अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ग्रहणाच्या मागील - पुढील दिवशी प्रवास टाळावा. ह्या दरम्यान आपण मोठे निर्णय घेणे टाळावे. विशेषतः आर्थिक व वारसागत संपत्तीशी संबंधित कोणत्याही कामात ग्रहणाच्या एक आठवड्या नंतर पुढाकार घेतल्यास लाभ होऊ शकेल. आपल्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप अत्यंत परिणामकारक ठरेल. जर आपणास सूर्याशी संबंधित एखादा त्रास असल्यास आपण "ॐ आदित्याय नमः" ह्या मंत्राचा जप करावा. 

धनु रास 
हे ग्रहण आपल्या सप्तमातून होत आहे. हे स्थान वैवाहिक जोडीदार किंवा व्यावसायिक भागीदाराचे आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ह्या दरम्यान आपल्या संबंधाची काळजी घ्यावी लागेल. तसेच संबंधात एखाद्या घटनेने दीर्घकाळासाठी कटुता निर्माण होऊ नये ह्याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. कोर्ट - कचेरी व सार्वजनिक जीवनात सुद्धा जपून मार्गक्रमण करावे लागेल. वयस्कर पुरुषांना प्रजननाशी संबंधित अवयवांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपण जर पाण्याशी संबंधित काम करत असाल किंवा समुद्र मार्गे प्रवास करणार असाल तर ग्रहणकाळात त्यास टाळण्याचा प्रयत्न करावा. आपल्यासाठी  "ॐ अच्युताय नमः" मंत्राचा जप करणे उपयुक्त ठरेल. 

मकर रास 
हे सूर्य ग्रहण आपल्या षष्ठ स्थानातून होत आहे. षष्ठ स्थान हे नोकरी किंवा दैनिक प्राप्तीशी संबंधित असल्याने ग्रहणाचा परिणाम त्यावर होऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या वरिष्ठांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करून ठेवावेत. आपल्या दैनंदिन कार्यात अडथळे येऊ शकतात. आपण जर एखादा व्यवसाय करत असाल तर आपल्या कर्मचाऱ्यांशी कटुता निर्माण होऊ शकते. आपल्या मातुल घराण्यात एखादी घटना घडू शकते. ह्या दरम्यान उधारीचे व्यवहार तसेच शस्त्रक्रिये सारखी कार्ये टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपणास आतड्यांचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहाराची काळजी घ्यावी. आपल्यासाठी ग्रहणकाळात आदित्यहृदय स्तोत्राचे पठन करणे हितावह होईल. 

कुंभ रास 
हे सूर्य ग्रहण आपल्या पंचमातून होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. हे ग्रहण कोणत्याही प्रकारे गर्भवती स्त्रियांनी बघितल्यास त्यांच्यासाठी ते त्रासदायी ठरू शकते. गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण दूरदर्शन किंवा सामाजिक माध्यमांच्या मदतीने बघणे सुद्धा नुकसानदायी होऊ शकते. आपणास आपल्या संतती संबंधी एखादी चिंता सतावेल. प्रेम - प्रकरणात यश प्राप्त होणे अवघड आहे. ह्या व्यतिरिक्त शेअर्स बाजाराशी किंवा सट्टा सदृश्य बाबीं पासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 

मीन रास 
ह्या जातकांनी मातेचे स्वास्थ्य व तिच्याशी असलेल्या संबंधातील सौहार्दता ह्यांची काळजी घ्यावी. जमीन - घर - बांधकाम ह्यांच्याशी संबंधित कार्ये न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी मोठाले सौदे करू नये, व जर करावयाचेच असेल तर त्याची कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. मनात एक प्रकारचा उद्वेग होऊ शकतो. ज्या जातकांना हृदयाशी संबंधित विकार असतील त्यांनी घरा बाहेर पडू नये, अन्यथा त्यांचा रक्तदाब वाढू शकतो. पोटदुखी, यकृत किंवा पाठीशी संबंधित दुखण्या पासून जपून राहावे. कोणत्याही प्रकारचे प्रवास टाळावेत. जर प्रवास करावाच लागला तर वाहन हळू चालविण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपल्यासाठी "ॐ भानवे नमः" ह्या मंत्राचा जप करणे उपयुक्त ठरेल. 


गणेशजींच्या कृपेने, 
ऍस्ट्रो लोकमत डॉट कॉम