जागतिक योग दिवस: योगासनाने ग्रहांचे दुष्परिणाम दूर सारा

दर वर्षी जागतिक योग दिनी जगभरातील लोक योग करत असतात. तसे पाहू गेल्यास फार पूर्वी पासून ऋषी - मुनी योग साधना करून निरोगी रहात असत, मात्र आता सर्व साधारण लोक सुद्धा उत्तम आरोग्यासाठी योगासनांचा आधार घेताना आढळतात. अलीकडच्या काही वर्षांपासून योग व योगासन ह्यांची लोकप्रयियता व स्वीकार्यता वाढत आली आहे. योग आपणास निव्वळ शारीरिक व मानसिक दृष्ट्याच निरोगी ठेवत नसून विविध योगासनांमुळे आपण आपले आरोग्य टिकवून ठेवण्या खेरीज ग्रहांचे होणारे दुष्परिणाम सुद्धा दूर करू शकतो. तेव्हा आपण येथे हे पाहू कि जागतिक योग दिनी कोणत्या योगासनाने कोणत्या ग्रहाचा दुष्परिणाम दूर सारून आपण कोणत्या शारीरिक समस्यांचे निराकरण करू शकतो ते. 
रवीसाठी योगासन - सूर्य नमस्कार, अनुलोम - विलोम व अग्नीसार 
जर कुंडलीत रवी बलहीन असेल तर आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो. तसेच, त्यामुळे नेत्र विकार, स्नायूंचे विकार, हृदय विकार व रक्ताशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांचे निराकरण करण्यासाठी नियमितपणे सूर्य नमस्कार, अनुलोम - विलोम व अग्नीसार इत्यादी योग करावेत. 
चंद्रासाठी योगासन - अनुलोम - विलोम व भस्त्रिका प्राणायाम 
चंद्र बलहीन असता जातकास नेहमी ताण व बेचैनी जाणवते. अशा परिस्थितीत स्वतःला तणावमुक्त ठेवण्यासाठी व चंद्रास बलवान करण्यासाठी नियमितपणे अनुलोम - विलोम व भस्त्रिका प्राणायाम करावा. ह्या व्यतिरिक्त शक्य तितके जास्त पाणी प्यावे. 
मंगळासाठी योगासन - पद्मासन, मयूरासन व शीतलीकरण प्राणायाम 
मंगळ बलहीन असता त्याचा नकारात्मक परिणाम होतो. जीवनात एखादी गोष्ट अधिक किंवा अल्प प्रमाणात मिळत असते. हा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी पद्मासन, मयूरासन व शीतलीकरण प्राणायाम केल्याने लाभ होतो. 
बुधासाठी योगासन - अनुलोम - विलोम व भस्त्रिका
बुध बलहीन असता जातकास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ह्या समस्यांपासून सुटका होण्यासाठी अनुलोम - विलोम व भस्त्रिका उपयुक्त ठरतात. 
गुरुसाठी योगासन - कपाल भाती, सर्वांगासन व अग्नीसार ह्या व्यतिरिक्त सूर्य नमस्कार 
गुरु बलहीन असता अनेक प्रकारच्या व्याधी होतात. जातकास मधुमेह व कॅंसर होण्याची शक्यता असते. ह्या व्याधी टाळण्यासाठी नियमितपणे कपाल भाती, सर्वांगासन व अग्नीसार ह्या व्यतिरिक्त सूर्य नमस्कार उपयुक्त होतात. 
शुक्रासाठी योगासन - धनुरासन, हलासन व मूलबंध 
शुक्र बलहीन असता अनेक प्रकारच्या व्यक्तिगत समस्यांना सामोरे जावे लागते. स्त्रीयांना अनेक प्रकारचे रोग उदभवतात. त्यातून सुटका मिळविण्यासाठी धनुरासन, हलासन व मूलबंध नियमितपणे करणे हितावह ठरते. 
शनीसाठी योगासन - कपाल भाती, अनुलोम - विलोम, अग्नीसार व भ्रामरी 
शनीच्या नकारात्मक प्रभावामुळे वात प्रकोप, पित्त प्रकोप, संधिवात, उच्च रक्तदाब व हृदय विकार संभवतात. ह्या व्यतिरिक्त इतर त्रास सुद्धा होऊ शकतात. ह्यासाठी कपाल भाती, अनुलोम - विलोम, अग्नीसार व भ्रामरी लाभदायी होते. 
राहूसाठी योगासन - अनुलोम - विलोम, भ्रामरी व भस्त्रिका
राहू हा नकारात्मक ग्रह आहे. बुधा प्रमाणे राहू सुद्धा आपले मस्तक व विचारधारा ह्यावर परिणाम करतो. ह्यासाठी ध्यान धारणा करावी लागते. मात्र, नियमितपणे अनुलोम - विलोम, भ्रामरी व भस्त्रिका केल्याने सुद्धा लाभ होत असतो. 
केतूसाठी योगासन - अनुलोम - विलोम व कपाल भाती 
केतूच्या नकारात्मक प्रभावामुळे ऍनिमिया ह्यासह पोटाचे विकार व स्नायू संबंधित विकार होतात. ह्याचा प्रभाव कमी करण्यासाठी नियमितपणे अनुलोम - विलोम व कपाल भाती केल्यास त्याचा फायदा होतो. 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम